Skip to content

Integrity बद्दल बायबलमधील वचने

96 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. निश्चित तुम्ही त्यांना निसरड्या भूमीवर ठेवले आहे; तुम्ही त्यांना सर्वनाशाकडे खाली लोटून द्याल.

  2. क्षणार्धात त्यांच्या नाश होईल, भयानकता त्यांच्या वाट्याला येईल.

  3. जसे जागे होणाऱ्या मनुष्याला स्वप्न पडते; त्याचप्रमाणे हे प्रभू, तुम्ही जागे व्हाल तेव्हा त्यांचे दुस्वप्न तुच्छ जाणाल.

  4. जेव्हा माझे हृदय दुःखित झाले आणि माझा आत्मा कटुतेने भरून गेला होता,

  5. त्यावेळस मी मूर्ख आणि अज्ञानी होतो; मी तुमच्यापुढे जनावरासारखा होतो!

  6. प्रीती आणि विश्वासूपणा तुला कधीही न त्यागोत; त्यांना तू आपल्या गळ्याभोवती बांध, त्यांना तुझ्या हृदयाच्या पटलावर लिहून ठेव.

  7. तेव्हा तुला परमेश्वराकडून आणि मानवाकडून अनुग्रह आणि सत्कीर्ती प्राप्त होतील.

  8. तुझ्या डोळ्यांनी तू समोरच पाहा; तुझी नजर एकटक सरळ बघेल असे लक्ष ठेव.

  9. तुझ्या पावलांसाठी असलेल्या मार्गाचा काळजीपूर्वक विचार कर, आणि तुझ्या सर्व मार्गामध्ये तू स्थिर राहा.

  10. उजवीकडे किंवा डावीकडे वळू नकोस; वाईटाकडे जाण्यापासून तुझी पावले दूर ठेव.

  11. जे नीतीने चालतात आणि जे योग्य तेच बोलतात, जे पिळवणूक करून मिळविलेला लाभ नाकारतात आणि लाच घेण्यापासून त्यांचे हात लांब ठेवतात, खुनाच्या कारस्थानाबाबत जे त्यांचे कान बंद ठेवतात दुष्टतेचा बेत करण्याबाबत त्यांचे डोळे बंद करतात—

  12. ज्यांचा आश्रय पर्वतावरील गड असेल, तेच उच्चस्थानी वास करतील. त्यांच्या भाकरीचा पुरवठा केला जाईल, आणि त्यांना पाण्याची कमतरता पडणार नाही.

  13. तो कोणावर अत्याचार करीत नाही, तर उसने देताना घेतलेले गहाण परत करतो. जो लुटत नाही तर आपले अन्न भुकेल्यांस देतो आणि वस्त्रहीनांना कपडे पुरवितो.

  14. व्याजावर कोणाला उसने देत नाही त्यांच्याकडून आपला नफा करून घेत नाही. वाईट करण्यापासून आपला हात आवरतो आणि दोन गटांमधील न्याय सत्याने करतो.

  15. तो माझे विधी पाळतो आणि विश्वासूपणे माझे नियम राखतो. तो मनुष्य न्यायी आहे; तो निश्चित जगेल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  16. योहानाने उत्तर दिले, “जे जमा करावयाचे आहे, त्यापेक्षा अधिक घेऊ नका.”

  17. काही शिपायांनी विचारले, “आम्ही काय करावे?” योहानाने उत्तर दिले. “धमक्या देऊन किंवा खोटे आरोप रचून पैसा उकळू नका आणि आपल्या वेतनात संतुष्ट राहा.”

  18. दासांनो, तुम्ही पृथ्वीवरील आपल्या धन्यांचे प्रत्येक गोष्टीत आज्ञापालन करा, केवळ त्यांची नजर तुमच्यावर असतानाच त्यांची कृपादृष्टी व्हावी म्हणून नाही, तर सत्य मनाने प्रभूचे भय बाळगून करा.

  19. जे काही तुम्ही करता, ते पूर्ण मनाने करा, मनुष्यांसाठी नव्हे, तर प्रभूसाठी म्हणून करा.

  20. अध्यक्ष हे परमेश्वराच्या घराचे कारभारी आहेत म्हणून त्यांचे जीवन निर्दोष असावे. तर स्वच्छंदी अथवा लवकर रागास येणारे, मद्यपी अथवा भांडखोर, किंवा अनीतीने धन मिळविणारे नसावेत.

  21. ते पाहुणचार करण्याची आवड असणारे, चांगल्या गोष्टींवर प्रेम करणारे, इंद्रियदमन करणारे, सरळ, पवित्र आणि शिस्तबद्ध असावे.