Skip to content

Hypocrisy बद्दल बायबलमधील वचने

246 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “तुम्हाला काय वाटते? एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो मोठ्या मुलाला म्हणाला, ‘मुला, आज द्राक्षमळ्यामध्ये जा व काम कर.’ ”

  2. मुलगा म्हणाला, “ ‘मी द्राक्षमळ्यात जाणार नाही,’ पण नंतर त्याने आपले मन बदलले आणि तो गेला.

  3. “मग पिता धाकट्या मुलालाही तसेच म्हणाला. मुलगा म्हणाला, ‘मी जातो, बाबा.’ पण तो गेलाच नाही.”

  4. मी विचारतो, “पित्यास जे पाहिजे होते ते या दोन मुलांपैकी कोणत्या मुलाने केले?” “वडील मुलाने,” त्या लोकांनी उत्तर दिले. मग येशू आपल्या दाखल्याचा खुलासा करीत म्हणाले, “मी खरे सांगतो, जकातदार लोक आणि वेश्या तुमच्या आधी परमेश्वराच्या राज्यात जात आहेत.

  5. कारण योहान नीतिमत्वाचा मार्ग दाखवित तुम्हाकडे आला, पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही; उलट जकातदार लोक आणि वेश्यांनी तसे केले. हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले असतानाही, तुम्ही पश्चात्ताप करण्याचे आणि विश्वास ठेवण्याचे नाकारले.

  6. राजाने त्या मनुष्याला विचारले, ‘मित्रा, लग्नाच्या पोषाखाशिवाय तू आत कसा आलास?’ तो मनुष्य स्तब्ध झाला.

  7. “मग राजा आपल्या नोकरास म्हणाला, ‘या मनुष्याचे हातपाय बांधा आणि त्याला बाहेरच्या अंधारात फेकून द्या. त्या ठिकाणी रडणे आणि दातखाणे चालेल.’

  8. “नियमशास्त्राचे शिक्षक आणि परूशी मोशेच्या सिंहासनावर बसतात.

  9. त्यांच्या सांगण्याप्रमाणे करा, पण ते जसे करतात तसे आचरण करू नका, कारण ते सांगतात त्याप्रमाणे करीत नाहीत.

  10. ते जड, अवघड ओझी बांधतात व इतर लोकांच्या खांद्यावर लादतात, परंतु ती हालविण्यास स्वतःचे बोटही लावण्याची त्यांची इच्छा नसते.

  11. “जे काही करतात ते सर्व लोकांना दाखविण्यासाठी असते: ते वचने लिहिलेल्या चामड्याच्या पट्ट्या लोकांना दिसाव्या म्हणून रुंद करतात आणि आपल्या झग्यांचे गोंडे लांब करतात.

  12. मेजवान्यात मानाची स्थाने आणि सभागृहांमध्ये प्रमुख जागेवर बसणे त्यांना प्रिय आहे.

  13. बाजारात लोकांकडून आदरपूर्वक अभिवादन घेणे आणि ‘रब्बी’ संबोधन त्यांना फार आवडते.

  14. “परंतु तुम्ही स्वतः ‘रब्बी,’ म्हणून घेऊ नका, कारण तुमचा गुरू एकच आहे आणि तुम्ही सर्व एकमेकांचे भाऊ आहात.

  15. आणि या पृथ्वीवर कोणालाही ‘पिता’ म्हणून संबोधू नका, कारण तुम्हाला एकच पिता आहेत व ते स्वर्गात आहेत.

  16. स्वतःला ‘मार्गदर्शक’ म्हणवून घेऊ नका, कारण एकटे ख्रिस्त हे एकच तुमचे ‘मार्गदर्शक’ आहेत.

  17. जो तुम्हामध्ये सर्वात मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक व्हावे.

  18. कारण जे स्वतःला उच्च करतात, त्यांना नम्र केले जाईल आणि जे स्वतःला नम्र करतात, ते उंच केले जातील.

  19. “अहो परूश्यांनो, आणि नियमशास्त्र शिक्षकांनो, ढोंग्यांनो तुम्हाला धिक्कार असो. कारण तुम्ही लोकांच्या तोंडावर स्वर्गाचे द्वार बंद करता, स्वतःही प्रवेश करीत नाही, आणि जे प्रवेश करू इच्छितात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत.

  20. जे देखाव्यासाठी लांबलचक प्रार्थना करतात आणि विधवांची घरे लुबाडतात. अशा लोकांना अधिक शिक्षा होईल.

  21. “अहो नियमशास्त्र शिक्षकांनो आणि परूश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुम्हाला धिक्कार असो. एका माणसाचे परिवर्तन करण्याकरिता तुम्ही भूमार्गाने आणि जलमार्गाने प्रवास करता आणि जेव्हा त्याचे परिवर्तन होते, तेव्हा तुम्ही त्याला आपल्यापेक्षा दुप्पट प्रमाणात नरकपुत्र बनविता.

  22. “आंधळ्या मार्गदर्शकांनो, तुमचा धिक्कार असो! ‘परमेश्वराच्या मंदिराची शपथ घेऊन तुम्ही म्हणता, मंदिराची शपथ मोडली तरी चालेल, पण मंदिरातील सोन्याच्या शपथेने मात्र तो बांधील आहे.’

  23. अहो आंधळ्या मूर्खांनो! ते सोने श्रेष्ठ आहे की त्या सोन्याला पवित्र करणारे ते मंदिर श्रेष्ठ आहे?

  24. तुम्ही असेही म्हणता, ‘मंदिरातील वेदीची शपथ घेतली आणि ती मोडली तरी चालेल,’ पण वेदीवरील दानाची शपथ घेतली तर तो त्यास बंधनकारक आहे.

  25. अहो आंधळ्यांनो, ती देणगी श्रेष्ठ आहे की त्या देणगीला पवित्र करणारी वेदी श्रेष्ठ आहे?