Skip to content

Hypocrisy बद्दल बायबलमधील वचने: General references

246 वचने · 1 पैलू

General references बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जे सर्व परमेश्वराला विसरतात त्यांचा शेवट असाच होतो; देवहीन मनुष्याची आशा नष्ट होते.

  2. ठिसूळ गोष्टींवर त्यांची भिस्त असते, ज्यावर ते अवलंबून राहतात ते मकडीच्‍या जाळासारखे आहे.

  3. ते जाळ्यावर विसंबून राहतील, परंतु ते टिकून राहवयाचे नाही; ते त्याला बिलगतील, परंतु ते मजबूत राहत नाहीत.

  4. न पिकलेले द्राक्ष झडून गेलेल्या द्राक्षवेलीसारखा, बहर गाळून टाकत असलेल्या जैतुनाच्या झाडासारखा तो होईल.

  5. कारण देवहीनांचे सोबती निष्फळ होतील, आणि लाच घेणार्‍यांचे डेरे अग्नी जाळून टाकील.

  6. “पुरातन काळापासूनची वस्तुस्थिती आणि मानवाची पृथ्वीवर उत्पत्ती झाली, तेव्हापासूनच्या गोष्टी तुला खचित माहीत आहेत,

  7. की दुष्टाचा उल्हास हा अल्पकालीन आहे, देवहीन व्यक्तीचा आनंद क्षणभंगुर आहे.

  8. जरी देवहीन मनुष्याचा गर्व आकाशापर्यंत पोहोचला आणि त्याचे डोके आभाळाला जाऊन भिडले,

  9. तरी तो आपल्या स्वतःच्या विष्ठेप्रमाणे नष्ट होणार; जे त्याला ओळखीत होते, ते विचारीत राहतील, ‘तो कुठे आहे?’

  10. तो स्वप्नासारखा विरून जाईल आणि पुन्हा सापडणार नाही. रात्रीच्या दृष्‍टांताप्रमाणे तो नाहीसा होईल.

  11. ज्यांनी त्याला पाहिले होते, ते त्याला पुन्हा पाहणार नाहीत; त्याचे स्थान त्याच्याकडे पुन्हा पाहणार नाही.

  12. त्याची मुलेबाळे गरिबांची नुकसान भरपाई करतील; आणि स्वतःच्या हातांनी आपली संपत्ती परत करतील.

  13. तारुण्याचा जो जोम त्याच्या हाडात भरलेला आहे तो त्याच्याबरोबरच धुळीत मिळेल.

  14. “जरी दुष्टपणा त्याच्या जिभेला गोडवा देते आणि तो आपल्या जिभेखाली ते दाबून ठेवतो,

  15. ती चव नाहीशी होऊ नये असे त्याला वाटते म्हणून हळूहळू चघळत राहतो,

  16. तरीही त्याने खाल्लेले अन्न त्याच्या पोटात आंबट होऊन त्याला पचत नाही; त्याच्या पोटात ते सापाच्‍या विषासारखे होईल.

  17. गिळून घेतलेली सर्व संपत्ती त्याला थुंकावी लागणार; परमेश्वरच त्याच्या पोटातून त्याला ते ओकायला लावेल.

  18. तो सापाचे विष चोखून घेईल; विषारी सापाचा दंश त्याला जिवे मारेल.

  19. मधाने भरलेल्या नद्या आणि झरे जे लोण्याच्‍या प्रवाहाने वाहतात, त्यांचा उपभोग त्याला घेता येणार नाही.

  20. ज्यासाठी त्याने परिश्रम केले, त्याची चव त्याला मिळणार नाही; त्याच्या व्यापाराचा नफा त्याला मिळणार नाही.

  21. कारण परमेश्वराने जर देवहीनाला छेदून टाकले, आणि त्याचा प्राण घेतला तर त्यांना काय आशा आहे?

  22. जेव्हा त्यांच्यावर संकट येईल, तेव्हा परमेश्वर त्यांची आरोळी ऐकेल काय?

  23. सर्वसमर्थामध्‍ये त्यांना संतोष मिळणार काय? सर्वदा ते परमेश्वराचा धावा करतील काय?

  24. “दुष्टासाठी परमेश्वर जे नेमून देतात ते हेच आहे, कठोर मनुष्याला सर्वसमर्थाच्या हातून हाच वारसा मिळतो:

  25. त्याला कितीही मुलेबाळे असली, तरी त्यांचा शेवट तलवारीने होणार; त्याच्या संततीस कधीही पुरेसे अन्न मिळणार नाही.