- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Hypocrisy बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही वेदीची शपथ वाहता, त्यावेळी वेदीबरोबर वेदीवरील सर्व वस्तूंचीही शपथ वाहता.
आणि ज्यावेळी तुम्ही मंदिराची शपथ वाहता, त्यावेळी मंदिराबरोबरच मंदिरात राहणार्या परमेश्वराचीही शपथ वाहता.
ज्यावेळी तुम्ही स्वर्गाची शपथ वाहता, त्यावेळी तुम्ही परमेश्वराच्या सिंहासनाची आणि खुद्द परमेश्वराची शपथ वाहता.
“तुम्हा परूश्यांचा व नियमशास्त्र शिक्षकांचा धिक्कार असो, अहो ढोंग्यांनो! तुम्ही पुदिना, बडीशेप आणि जिरे या मसाल्यांचा दशांश देता, परंतु न्याय, दया आणि विश्वासूपणा या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता. या गोष्टी तर तुम्ही कराव्यात, पण त्याचबरोबरच ज्या अधिक महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याकडे दुर्लक्ष करू नये.
तुम्ही आंधळे मार्गदर्शक! तुम्ही एक चिलट गाळून काढता, पण उंट गिळून टाकता.
“तुम्हा परूश्यांचा आणि नियमशास्त्र शिक्षकांचा धिक्कार असो, अहो ढोंग्यांनो! तुम्ही आपले ताट व वाटी बाहेरून स्वच्छ करता पण तुमची मने लोभ व असंयम यांनी भरलेली आहे.
आंधळ्या परूश्यांनो! पहिल्यांदा थाळी व प्याला आतून स्वच्छ करा म्हणजे ती बाहेरून देखील स्वच्छ होतील.
“अहो परूश्यांनो आणि नियमशास्त्र शिक्षकांनो, अहो ढोंग्यांनो, तुमचा धिक्कार असो; कारण तुम्ही चुन्याचा लेप लावलेल्या कबरांप्रमाणे आहात. ज्या बाहेरून सुंदर दिसतात, पण आत मृतांच्या हाडांनी व सर्वप्रकारच्या अशुद्धतेने व दुष्कृत्याने भरलेल्या असतात.
त्याचप्रमाणे तुम्ही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, पण आतून कबरांसारखे आहात, ढोंगाने आणि दुष्कृत्याने भरलेले.
“अहो परूश्यांनो आणि नियमशास्त्र शिक्षकांनो, अहो ढोंग्यांनो, तुमचा धिक्कार असो. तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता आणि नीतिमानांच्या कबरा सजविता
तुम्ही म्हणता, ‘आम्ही आमच्या वाडवडीलांच्या काळात राहत असतो, तर संदेष्ट्यांचे रक्त सांडण्यामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर कधीही भाग घेतला नसता.’
पण असे बोलताना, तुम्ही स्वतःविरुद्ध साक्ष देता की तुम्ही संदेष्ट्यांचे खून करणार्या वाडवडीलांची संताने आहात.
मग जा आणि ज्याचा तुमच्या पूर्वजांनी आरंभ केला होता ते पूर्ण करा.
“अहो सापांनो! विषारी सापांच्या पिलांनो! नरक-दंडापासून स्वतःची सुटका कशी कराल?
तर त्या दासाचा धनी, तो अपेक्षा करीत नाही आणि तो सावध नाही अशा घटकेला येईल.
त्या दासाचे तुकडे करेल व ढोंग्यांबरोबर जिथे रडणे व दातखाणे होईल तिथे त्याला वाटा देईल.
“नंतर तो त्याच्या डावीकडे असलेल्या लोकांना म्हणेल, ‘अहो शापग्रस्त लोकांनो, तुम्ही माझ्यापुढून निघून जा. सैतान आणि त्याच्या दूतांसाठी जो सार्वकालिक अग्नी तयार ठेवला आहे त्यात जा.
कारण मी भुकेला होतो, तेव्हा तुम्ही मला काही खावयास दिले नाही; तान्हेला होतो, तेव्हा तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही.
परका होतो, तेव्हा तुम्ही मला घरात घेतले नाही; वस्त्रहीन होतो तेव्हा तुम्ही मला वस्त्र दिले नाही; आजारी होतो, तुरुंगात होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली नाही.’
“ते सुद्धा असे उत्तर देतील, ‘प्रभूजी तुम्ही भुकेले, तहानलेले, परके, उघडे, आजारी किंवा तुरुंगात असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि तुमची मदत केली नाही?’
“तो त्यांना उत्तर देईल, ‘खरोखर, या कनिष्ठांना करण्याचे तुम्ही नाकारले, तेव्हा तुम्ही माझ्यासाठी करण्याचे नाकारले.’
माझी उपासना ते व्यर्थपणे करतात; त्यांची शिकवण केवळ मानवी नियम आहेत.’
तुम्ही परमेश्वराने दिलेल्या आज्ञा टाळता आणि मनुष्याच्या परंपरेला चिटकून बसता.”
येशू शिकवीत होते, ते म्हणाले, “या नियमशास्त्राच्या शिक्षकांबाबत खबरदारी बाळगा! त्यांना लांब झगे घालून बाजारात लोकांकडून आदरपूर्वक अभिवादन घेणे,
सभागृहामध्ये आणि मेजवान्यामध्ये उत्तम व मानाच्या जागा मिळविणे फार आवडते.