मुख्य मजकुरावर जा

Holy Spirit बद्दल बायबलमधील वचने

145 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ, ज्यांनी विश्वास ठेवला त्या प्रत्येकाला पवित्र आत्मा दिला जाणार होता. परंतु त्यावेळेपर्यंत तो आत्मा दिला गेला नव्हता, कारण येशूंचे गौरव अद्याप झाले नव्हते.

  2. आणि मी पित्याजवळ मागेन, ते तुम्हाला मदत करण्यासाठी दुसरा कैवारी देतील, जो तुम्हाबरोबर सर्वकाळ राहील—

  3. सत्याचा आत्मा. त्याला जग स्वीकारणार नाही, कारण जग त्याला पाहत नाही व ओळखत नाही. परंतु तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो आणि तुम्हामध्ये राहील.

  4. परंतु खरी गोष्ट सांगतो की, माझे जाणे हे तुमच्या हितासाठीच आहे. मी जर गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही; पण मी जर गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवेन.

  5. जेव्हा तो येईल, तेव्हा पापाविषयी, नीतिमत्त्वाविषयी व न्यायनिवाड्या विषयी जग कशी चूक करत आहे हे तो सिद्ध करेल.

  6. पापाविषयी, कारण जगातले लोक मजवर विश्वास ठेवीत नाहीत;

  7. नीतिमत्त्वाविषयी, कारण मी पित्याकडे जात आहे आणि तुम्ही मला यापुढे पाहणार नाही;

  8. न्यायनिवाड्या विषयी, कारण या जगाच्या अधिपतीला दोषी ठरविण्यात आले आहे.

  9. “मला तुम्हाला बरेच काही सांगावयाचे आहे, पण आता ते तुमच्याने ग्रहण होणार नाही.

  10. परंतु जेव्हा तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्गदर्शन करून पूर्ण सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे काहीही सांगणार नाही; तर त्याने जे काही ऐकले आहे, तेच तुम्हाला सांगेल. तो तुम्हाला जे काही घडणार आहे ते सांगेल.

  11. कारण तो माझ्यापासून आहे, म्हणून माझे गौरव करेल आणि माझ्यापासून जे त्याला मिळेल ते तो तुम्हाला प्रकट करेल.

  12. एकाएकी स्वर्गातून प्रचंड सोसाट्याच्या वार्‍यासारखा आवाज आला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व घर त्याने भरले.

  13. त्यावेळी अग्नीच्या जिभांसारख्या दिसणार्‍या जिभा वेगवेगळ्या होऊन प्रत्येकावर एकएक अशा स्थिरावताना त्यांना दिसल्या.

  14. तिथे उपस्थितीत असलेले सगळे जण पवित्र आत्म्याने भरले आणि आत्म्याने हे करण्यास त्यांना समर्थ केल्यामुळे ते वेगवेगळ्या भाषेत बोलू लागले.

  15. परंतु पेत्र म्हणाला, “हनन्याह, सैतानाने तुझे हृदय एवढे कसे भरले की तू पवित्र आत्म्याशी लबाडी केलीस व मालमत्ता विकून आलेल्या पैशातून काही पैसे तुझ्या स्वतःसाठी ठेवून घेतलेस?

  16. संपत्ती विकण्यापूर्वी ती तुझ्या मालकीची नव्हती का आणि ती विकल्यानंतर, त्या पैशाचा वापर कसा करावा हे देखील तुझ्या अधिकारात नव्हते का? तर मग असे करण्याचे तुझ्या मनात कसे आले? तू केवळ मनुष्याबरोबर नाही तर परमेश्वराबरोबर लबाडी केली आहेस.”

  17. ते तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी तेथील नवीन विश्वासणार्‍यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना केली,

  18. कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही पवित्र आत्मा आलेला नव्हता; केवळ प्रभू येशूंच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा झाला होता.

  19. मग पेत्र व योहानाने आपले हात त्यांच्यावर ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला.

  20. शिमोनाने पाहिले की प्रेषितांनी हात ठेवले म्हणजे पवित्र आत्म्याचे दान मिळते, तेव्हा त्याने प्रेषितांना पैसे देऊ केले

  21. आणि म्हणाला, “मला देखील हे सामर्थ्य मिळू द्या म्हणजे ज्या कोणावर मी आपले हात ठेवेन तेव्हा त्यांना पवित्र आत्मा लाभेल.”

  22. पेत्राने उत्तर दिले: “तुझ्या पैशांचा तुझ्याबरोबर नाश होवो, कारण परमेश्वराचे दान पैशाने विकत घेता येईल असा तू विचार केला!

  23. या सेवेत तुला भाग किंवा सहभाग नाही, कारण तुझे हृदय परमेश्वराच्या दृष्टीने बरोबर नाही.

  24. तू तुझ्या या दुष्टतेबद्दल पश्चात्ताप कर आणि प्रभूकडे प्रार्थना कर, या आशेने की, कदाचित ते तुझ्या हृदयातील विचारांबद्दल तुला क्षमा करतील;

  25. इकडे पेत्र त्या दृष्टान्ताविषयी विचार करीत असताना, आत्मा त्याला म्हणाला, “शिमोना, तीन माणसे तुला शोधत आहेत.