Skip to content

Holy Spirit बद्दल बायबलमधील वचने

145 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मला आपल्या समक्षतेतून दूर करू नका व तुमचा पवित्र आत्मा मजमधून काढून घेऊ नका.

  2. तुमच्या तारणाचा आनंद मला पुनरपि द्या आणि स्वतःला सावरून घेण्यासाठी मला राजीपणाचा आत्मा द्या.

  3. कारण मी तहानलेल्या भूमीवर पाण्याचा वर्षाव करेन, आणि शुष्क जमिनीला झरे देईन; तुमच्या मुलाबाळांवर मी माझा आत्मा ओतेन व तुमच्या वंशजांना आशीर्वाद देईन.

  4. कुरणातील गवतासारखे ते उगवतील वाहत्या झऱ्याच्या काठावरील वाळुंजाच्या वृक्षासारखे ते वाढतील.

  5. तरीही त्यांनी बंड केले व याहवेहच्या पवित्र आत्म्याला खिन्न केले. म्हणून याहवेह मागे वळले व त्यांचे शत्रू झाले आणि याहवेहने स्वतः त्यांच्याविरुद्ध लढा दिला.

  6. मग त्यांच्या लोकांना पूर्वीचे दिवस आठवले, मोशे आणि त्यांच्या लोकांचे दिवस— ज्यांनी त्यांच्या मेंढपाळासह पूर्ण कळपाला समुद्रमार्गी बाहेर काढले, ते कुठे आहेत? त्यांच्यामध्ये आपला पवित्र आत्मा पाठविणारे ते कुठे आहेत?

  7. “आणि त्यानंतर, मी माझा आत्मा सर्व लोकांवर ओतेन. तुमचे पुत्र व तुमच्या कन्या भविष्यवाणी सांगतील, व तुमचे वृद्ध स्वप्ने पाहतील, तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील.

  8. माझ्या दासांवर म्हणजेच, स्त्री आणि पुरुष दोघांवरही, त्या दिवसांत मी माझा आत्मा ओतेन.

  9. मग जो याहवेहचा स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता, तो परत आला व त्याने मला जागे केले, जणू काय मी झोपेतच होतो.

  10. त्याने मला विचारले, “तुला आता काय दिसते?” मी उत्तर दिले, “सात दिवे असलेला एक ठोस सोन्याचा दीपवृक्ष मला दिसत आहे. त्याच्या वरच्या टोकाला एक कटोरा असून, त्यात सात दिवे होते व त्याला लावलेल्या नळ्यांमधून त्या दिव्यांना तेल पुरविले जाई.

  11. या कटोर्‍याच्या उजव्या बाजूस एक व डाव्या बाजूस एक अशी दोन जैतुनाची झाडे मला दिसतात.”

  12. तेव्हा जो स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता, त्याला मी विचारले, “माझ्या प्रभू, हे काय आहे?”

  13. त्यावर देवदूताने उत्तर दिले, “हे काय आहे तुला माहीत नाही काय?” तेव्हा मी म्हणालो, “नाही, प्रभू.”

  14. मग तो मला म्हणाला, “जरूब्बाबेलासाठी याहवेहचा हा संदेश आहे: ‘बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल,’ असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  15. “हे विशाल पर्वता, तू कोण आहेस? जरूब्बाबेलापुढे तू सपाट मैदान असा होशील. मग तो शिखरशिलेस बाहेर आणून प्रचंड गजर करेल, ‘याहवेह आशीर्वादित करो! याहवेह आशीर्वादित करो!’ ”

  16. येशूंचा बाप्तिस्मा झाल्याबरोबर ते पाण्यातून वर आले. त्याक्षणीच स्वर्ग उघडला आणि त्यांनी परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा आपल्यावर उतरतांना आणि स्थिरावताना पाहिला;

  17. आणि स्वर्गातून वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र; त्याच्यावर मी संतुष्ट आहे.”

  18. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक प्रकारचे पाप किंवा निंदा यांची क्षमा होऊ शकेल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध केलेल्या निंदेची क्षमा होणार नाही.

  19. जो कोणी मानवपुत्राच्या विरुद्ध बोलेल त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करेल, त्याला या युगात आणि येणार्‍या युगात कधीही क्षमा होणार नाही.

  20. यरुशलेम येथे शिमोन नावाचा एक मनुष्य होता, तो नीतिमान आणि भक्तिमान होता व इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत असून पवित्र आत्मा त्याजवर होता.

  21. कारण प्रभू ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तुला मरण येणार नाही, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते.

  22. पवित्र आत्म्याने प्रवृत्त होऊन तो मंदिराच्या परिसरात गेला. तेव्हा आईवडिलांनी नियमशास्त्रात सांगितलेला विधी पूर्ण करण्यासाठी येशू बाळाला मंदिरात आणले,

  23. येशूंनी उत्तर दिले, “मी तुला निश्चित सांगतो, पाण्याने आणि पवित्र आत्म्याने जन्म झाल्याशिवाय कोणीही परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करू शकणार नाही.

  24. शरीर शरीरालाच आणि आत्मा आत्म्याला जन्म देतो.

  25. शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे, जे कोणी माझ्यावर विश्वास ठेवतात, त्यांच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.”