मुख्य मजकुरावर जा

Holy Spirit बद्दल बायबलमधील वचने

145 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यात उद्देश असा होता की, आपण ज्यांनी ख्रिस्तावर प्रथम आशा ठेवली होती, त्यांनी त्यांच्या गौरवाच्या स्तुतीचे साधन व्हावे.

  2. जेव्हा तुम्ही सत्याचा संदेश ऐकला, आणि तारणाच्या शुभवार्तेवर विश्वास ठेवला, तेव्हा तुमचा ख्रिस्तामध्ये समावेश झाला व तुम्हावरही वचनदत्त पवित्र आत्म्याचा शिक्का मारला गेला,

  3. आणि हा आत्मा परमेश्वराच्या लोकांसाठी खंडणी व आपल्याला वतनाचा विसार म्हणून त्यांच्या गौरवाच्या स्तुतीसाठी दिला आहे.

  4. शांतीच्या बंधनात व पवित्र आत्म्याद्वारे ऐक्य टिकविण्यास झटावे.

  5. जसे एक शरीर व एक आत्मा, तसेच आपल्याला एकाच गौरवी आशेसाठी पाचारण करण्यात आले होते.

  6. तारणाचे शिरस्त्राण, आणि आत्म्याची तरवार म्हणजे परमेश्वराचे वचन हे देखील घ्या.

  7. सर्वदा प्रार्थना करा. पवित्र आत्म्यामध्ये प्रत्येक प्रसंगी, सर्वप्रकारच्या प्रार्थनेने आणि विनवणीने, प्रभूच्या लोकांसाठी जागृत राहून अगत्याने प्रार्थना करीत राहा.

  8. कारण आमची शुभवार्ता तुमच्याकडे केवळ शब्दाने नव्हे, परंतु शक्तीने, पवित्र आत्म्याने आणि पूर्ण खात्रीने आली. तुमच्याकरिता तुम्हामध्ये तुमच्याबरोबर राहत असताना आम्ही कसे राहिलो हे तुम्हाला माहीतच आहे.

  9. पवित्र आत्म्याने जो आनंद तुम्हाला दिला आहे, त्याद्वारे तुम्ही अतिशय क्लेशांमध्ये असतानाही संदेशाचा स्वीकार केला आणि आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाले;

  10. यास्तव, जो कोणी या निर्देशाचा तिरस्कार करतो, तो मनुष्यांचा नव्हे परंतु ज्या परमेश्वराने आपल्याला पवित्र आत्मा दिला आहे त्या परमेश्वराचा तिरस्कार करतात.

  11. एकमेकांवर प्रीती करण्याविषयी तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाही, कारण एकमेकांवर प्रीती करावी हे स्वतःच तुम्ही परमेश्वरापासून शिकला आहात.

  12. तेव्हा त्यांनी आपले तारण केले, कारण हे आपण केलेल्या नीतिच्या कृत्यामुळे झाले नाही, तर ते त्यांच्या दयेने झाले आणि आपल्याला नवीन जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण दिले आहे.

  13. त्यांनी आपले तारणकर्ता येशू ख्रिस्ताद्वारे आपल्यावर विपुलतेने पवित्र आत्मा ओतला आहे,

  14. त्यांच्यामध्ये असणार्‍या ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे त्यांनी ख्रिस्ताचे दुःखसहन आणि त्यानंतर येणार्‍या गौरवी गोष्टीबद्दल भविष्य केले, तेव्हा त्यांनी ती वेळ आणि परिस्थिती शोधण्याचा प्रयत्न केला.

  15. ते त्यांना यासाठी प्रकट केले होते की, ते स्वतःची सेवा नव्हे तर तुमची करीत होते. ते ज्या गोष्टींविषयी बोलले होते, त्या गोष्टी तुम्हाला स्वर्गातून पाठविलेल्या पवित्र आत्म्याद्वारे, ज्यांनी शुभवार्तेची घोषणा केली त्यांच्याद्वारे तुम्हाला आता सांगितल्या आहेत. स्वर्गदूतांना सुद्धा या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा होती.

  16. पाणी आणि रक्त यांच्याद्वारे जे आले तेच येशू ख्रिस्त आहेत. ते केवळ पाण्याच्याद्वारे आले नाहीत, परंतु पाण्याच्या आणि रक्ताच्याद्वारे आले. जो साक्ष देतो तो परमेश्वराचा आत्मा आहे, कारण आत्मा सत्य आहे.

  17. याबद्दल तिघे जण साक्ष देतात:

  18. आत्मा, पाणी आणि रक्त या तिघांमध्ये एकमत आहे.

  19. हे लोक तुमच्यामध्ये फूट पाडणारे, उपजत स्वभावाने वागणारे आणि पवित्र आत्मा नसलेले आहेत.

  20. परंतु तुम्ही, प्रिय मित्रांनो, स्वतःला परमपवित्र विश्वासाच्या पायावर बांधा आणि पवित्र आत्म्याद्वारे प्रार्थना करा.