Skip to content

Hell बद्दल बायबलमधील वचने

48 वचने · 31 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते आपल्या कबरांमध्ये मेंढरांप्रमाणे पडून राहतात; मृत्यू त्यांचा मेंढपाळ होईल (प्रातःकाळी नीतिमान लोक प्रभुत्व करतील) त्यांचे देह कबरेत उतरतील, कारण त्यांना कोणताच आधार राहिला नाही.

  2. परंतु परमेश्वर मला मृत्यूच्या सामर्थ्यापासून सोडवतील आणि माझा स्वीकार करतील. सेला

  3. मूर्खपणा एक स्वैर स्त्री आहे; ती साधीभोळी आहे आणि तिला काहीच समज नाही.

  4. ती तिच्या घराच्या दारात बसून राहते, तसेच नगराच्या सर्वात उंच ठिकाणावर ती बसते.

  5. तिच्याजवळून जाणाऱ्या, जे सरळ त्यांच्या मार्गाने जातात, त्यांना ती बोलाविते,

  6. “जे साधे भोळे आहेत त्या सर्वांनी माझ्या घरी यावे!” जे विवेकशून्य आहेत त्यांना ती म्हणते,

  7. “चोरलेले पाणी गोड लागते; गुप्तपणे खाल्लेले अन्न चविष्ट लागते!”

  8. परंतु त्यांना हे माहीत नसते की तिथे मेलेले लोक आहेत, आणि तिचे पाहुणे आता मृतांच्या खोल जगात आहेत.

  9. मुलाला अनुशासन करण्यास संकोच करू नकोस; जर तू छडीने त्यांना शिक्षा करशील तर ते मरणार नाहीत.

  10. छडीचा वापर करून त्यांना शिक्षा कर आणि मृत्यूपासून त्यांचे रक्षण कर.

  11. गर्तेत जाणार्‍यांबरोबर त्याला मी अधोलोकात आणले, त्यात तो पडला तेव्हा त्याच्या आवाजाने राष्ट्रे थरथर कापले. तेव्हा एदेनातील सर्व झाडे, लबानोनातील सर्वोत्तम, पाण्याचा पुष्कळ पुरवठा असलेली झाडे, पृथ्वीच्या खाली सांत्वन पावले.

  12. मोठ्या देवदारूप्रमाणे ते सुद्धा मृतलोकात, राष्ट्रांच्या लोकांमध्ये त्याच्या सावलीखाली राहत होते त्या हत्यारबंदी लोकांबरोबर तलवारीने मारले गेले.

  13. जर तुमचा उजवा डोळा तुम्हाला अडखळण करीत असेल तर तो उपटून फेकून द्या. तुमचे संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एक भाग गमविणे अधिक उत्तम आहे;

  14. आणि जर तुमचा उजवा हात तुम्हाला अडखळण करीत असेल, तर तो कापून टाक. संपूर्ण शरीर नरकात जाण्याऐवजी तुम्ही तुमच्या शरीराच्या एका भागाला मुकणे अधिक हिताचे होईल.

  15. “अरुंद दाराने प्रवेश करा, कारण नाशाकडे नेणारा दरवाजा रुंद व पसरट आहे. पुष्कळ लोक त्याच दरवाजातून प्रवेश करतात.

  16. तरी जीवनाकडे नेणारा दरवाजा लहान असून मार्गही अरुंद आहे आणि अगदी थोडक्यांना तो सापडतो.

  17. मी तुम्हाला सांगतो की, अनेकजण पूर्व आणि पश्चिमेकडून येतील, आणि स्वर्गीय राज्यात चाललेल्या मेजवानीत, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याबरोबर आपल्या जागा घेतील.

  18. परंतु राज्याची प्रजा बाहेर अंधकारात टाकली जाईल, जिथे रडणे आणि दातखाणे असेल.”

  19. जग हे शेत आहे आणि चांगले बी हे परमेश्वराच्या राज्याचे लोक आहेत. रानगवत सैतानाच्या लोकांचे प्रतीक आहे.

  20. गव्हामध्ये रानगवताचे बी पेरणारा शत्रू म्हणजे सैतान आहे. हंगाम म्हणजे युगाचा अंत आणि कापणी करणारे म्हणजे देवदूत आहेत.

  21. “जसे रानगवत उपटून अग्नीत जाळण्यात आले, त्याचप्रमाणे युगाच्या शेवटी होईल.

  22. मानवपुत्र त्यांचे देवदूत पाठवेल आणि पाप व दुष्टाई करणार्‍या सर्वांना त्यांच्या राज्यातून बाहेर काढेल.

  23. त्यांना जळत्या भट्टीत टाकण्यात येईल जिथे रडणे आणि दातखाणे चालेल.

  24. युगाच्या शेवटीही असेच होईल देवदूत येतील आणि वाईट लोकांना नीतिमान लोकांतून वेगळे करतील.

  25. आणि त्यांना जळत्या भट्टीत टाकण्यात येईल जिथे रडणे आणि दातखाणे चालेल.