Skip to content

Hell बद्दल बायबलमधील वचने

48 वचने · 31 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुझा हात किंवा पाय तुम्हाला अडखळण करीत असेल तर तो कापून टाकून दे. दोन पाय असून शाश्वत अग्नीत टाकले जावे, यापेक्षा एका पायाने अपंग होऊन जीवनात प्रवेश करणे हे तुझ्या हिताचे आहे

  2. जर तुझा डोळा तुला अडखळण करीत असेल, तर तो उपटून फेकून दे. दोन डोळ्यांसह अग्नीच्या नरकात जाण्यापेक्षा एका डोळ्याने जीवनात जाणे उत्तम आहे.

  3. मग संतप्त झालेल्या प्रभूने त्या दुष्ट मनुष्याला, तो सर्व कर्ज फेडीपर्यंत तुरुंगामध्ये कोंडून ठेवले.

  4. “जर तुम्ही तुमच्या भावाची व बहिणीची मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गीय पिताही याचप्रकारे तुम्हा प्रत्येकाला वागवेल.”

  5. “ ‘तर त्या सोन्याची थैली त्याच्याकडून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा थैल्या आहेत त्याला द्या.

  6. कारण ज्यांच्याजवळ आहे त्यांना अधिक दिले जाईल, म्हणजे त्यांना विपुलतेने मिळेल. ज्यांच्याकडे नाही, त्यांच्याजवळ जे काही असेल ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल.

  7. आता त्या कुचकामी सेवकाला बाहेरच्या अंधारात फेकून द्या; ज्या ठिकाणी रडणे आणि दातखाणे चालेल.’

  8. जर तुझा हात अडखळण करीत असेल, तर तो कापून टाक. दोन हात असून नरकात जावे व न विझणार्‍या अग्नीत जाण्याऐवजी एका हाताने अधू होऊन जीवनात प्रवेश करणे अधिक हिताचे होईल.”

  9. ज्या ठिकाणी त्यांना खाणारे किडे कधी मरत नाहीत किंवा तेथील अग्नी कधी विझत नाही.

  10. जर तुझा पाय अडखळण करीत असेल, तर तो कापून टाक. दोन पाय असून नरकात टाकले जावे, यापेक्षा एका पायाने अपंग होऊन जीवनात प्रवेश करणे हे तुझ्या हिताचे आहे.

  11. ज्या ठिकाणी त्यांना खाणारे किडे कधी मरत नाहीत किंवा तेथील अग्नी कधी विझत नाही.

  12. जर तुझा डोळा तुला अडखळण करीत असेल, तर तो उपटून फेकून दे. दोन डोळ्यांसह अग्नीच्या नरकात जाण्यापेक्षा एका डोळ्याने परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे हे उत्तम आहे.

  13. ज्या ठिकाणी, “ ‘त्यांना खाणारे किडे कधी मरत नाहीत, किंवा तेथील अग्नी कधी विझत नाही.’

  14. आणि त्याचा आत्मा अधोलोकात गेला. तिथे तो यातना भोगीत असताना, तिथून त्याने दूर अंतरावर लाजराला अब्राहामाच्या जवळ असलेले पाहिले.

  15. त्याने त्याला हाक मारली, ‘हे पित्या अब्राहामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठीव यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी, कारण या अग्निज्वालांमध्ये मी कासावीस झालो आहे.’

  16. “परंतु अब्राहामाने उत्तर दिले, ‘मुला, तुझ्या आयुष्यात तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या, पण लाजराला वाईट गोष्टी मिळाल्या, म्हणून तो आता सांत्वन पावत आहे आणि तू क्लेश भोगीत आहेस.

  17. आणि याव्यतिरिक्त, आमच्या आणि तुमच्यामध्ये एक मोठी दरी स्थापलेली आहे, जे येथून तुझ्याकडे जाण्याची इच्छा करतात ते जाऊ शकत नाहीत किंवा तिथून आम्हापर्यंत ती दरी ओलांडून कोणीही येऊ शकत नाही.’

  18. मग पाचव्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा जो तारा आकाशातून पृथ्वीवर पडला होता आणि ज्या तार्‍याला अथांग कूपाची किल्ली देण्यात आली होती, त्याला मी पाहिले.

  19. तेव्हा त्याने अथांग कूप उघडले आणि प्रचंड भट्टीच्या धुरासारखा धूर त्यातून वर आला. त्या अगाध कूपाच्या धुरामुळे सूर्य व आकाश अंधकारमय झाले.

  20. त्या प्रत्येकाला परमेश्वराच्या क्रोधाचा द्राक्षमद्याचा प्याला, त्याची तीव्रता कमी न करता प्यावा लागेल. पवित्र देवदूत व कोकरा यांच्यासमक्ष या सर्वांचा जळत्या गंधकाने छळ करण्यात येईल.

  21. त्यांच्या छळाचा धूर युगानुयुग वर चढत राहील आणि त्यातून त्यांची रात्री किंवा दिवसा कधीच सुटका होत नाही. कारण त्यांनी त्या पहिल्या पशूला व त्याच्या मूर्तीला नमन केले, आणि त्याच्या नावाची सांकेतिक खूण गोंदून घेतली.

  22. जे लोक समुद्रात मरण पावले होते, त्यांना समुद्रांनी परत दिले. पृथ्वी व अधोलोक यांनीही आपल्यातील मृतांना बाहेर सोडले. त्या प्रत्येकाच्या कृत्यांप्रमाणे त्यांचा न्याय करण्यात आला.

  23. मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आली. अग्नीचे सरोवर म्हणजेच दुसरे मरण होय.