मुख्य मजकुरावर जा

Hell बद्दल बायबलमधील वचने: The future abode of the wicked

42 वचने · 31 पैलू

The future abode of the wicked बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मूर्खपणा एक स्वैर स्त्री आहे; ती साधीभोळी आहे आणि तिला काहीच समज नाही.

  2. ती तिच्या घराच्या दारात बसून राहते, तसेच नगराच्या सर्वात उंच ठिकाणावर ती बसते.

  3. तिच्याजवळून जाणाऱ्या, जे सरळ त्यांच्या मार्गाने जातात, त्यांना ती बोलाविते,

  4. “जे साधे भोळे आहेत त्या सर्वांनी माझ्या घरी यावे!” जे विवेकशून्य आहेत त्यांना ती म्हणते,

  5. “चोरलेले पाणी गोड लागते; गुप्तपणे खाल्लेले अन्न चविष्ट लागते!”

  6. परंतु त्यांना हे माहीत नसते की तिथे मेलेले लोक आहेत, आणि तिचे पाहुणे आता मृतांच्या खोल जगात आहेत.

  7. मुलाला अनुशासन करण्यास संकोच करू नकोस; जर तू छडीने त्यांना शिक्षा करशील तर ते मरणार नाहीत.

  8. छडीचा वापर करून त्यांना शिक्षा कर आणि मृत्यूपासून त्यांचे रक्षण कर.

  9. जर तुमचा उजवा डोळा तुम्हाला अडखळण करीत असेल तर तो उपटून फेकून द्या. तुमचे संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एक भाग गमविणे अधिक उत्तम आहे;

  10. आणि जर तुमचा उजवा हात तुम्हाला अडखळण करीत असेल, तर तो कापून टाक. संपूर्ण शरीर नरकात जाण्याऐवजी तुम्ही तुमच्या शरीराच्या एका भागाला मुकणे अधिक हिताचे होईल.

  11. “अरुंद दाराने प्रवेश करा, कारण नाशाकडे नेणारा दरवाजा रुंद व पसरट आहे. पुष्कळ लोक त्याच दरवाजातून प्रवेश करतात.

  12. तरी जीवनाकडे नेणारा दरवाजा लहान असून मार्गही अरुंद आहे आणि अगदी थोडक्यांना तो सापडतो.

  13. मी तुम्हाला सांगतो की, अनेकजण पूर्व आणि पश्चिमेकडून येतील, आणि स्वर्गीय राज्यात चाललेल्या मेजवानीत, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याबरोबर आपल्या जागा घेतील.

  14. परंतु राज्याची प्रजा बाहेर अंधकारात टाकली जाईल, जिथे रडणे आणि दातखाणे असेल.”

  15. जग हे शेत आहे आणि चांगले बी हे परमेश्वराच्या राज्याचे लोक आहेत. रानगवत सैतानाच्या लोकांचे प्रतीक आहे.

  16. गव्हामध्ये रानगवताचे बी पेरणारा शत्रू म्हणजे सैतान आहे. हंगाम म्हणजे युगाचा अंत आणि कापणी करणारे म्हणजे देवदूत आहेत.

  17. “जसे रानगवत उपटून अग्नीत जाळण्यात आले, त्याचप्रमाणे युगाच्या शेवटी होईल.

  18. मानवपुत्र त्यांचे देवदूत पाठवेल आणि पाप व दुष्टाई करणार्‍या सर्वांना त्यांच्या राज्यातून बाहेर काढेल.

  19. त्यांना जळत्या भट्टीत टाकण्यात येईल जिथे रडणे आणि दातखाणे चालेल.

  20. युगाच्या शेवटीही असेच होईल देवदूत येतील आणि वाईट लोकांना नीतिमान लोकांतून वेगळे करतील.

  21. आणि त्यांना जळत्या भट्टीत टाकण्यात येईल जिथे रडणे आणि दातखाणे चालेल.

  22. तुझा हात किंवा पाय तुम्हाला अडखळण करीत असेल तर तो कापून टाकून दे. दोन पाय असून शाश्वत अग्नीत टाकले जावे, यापेक्षा एका पायाने अपंग होऊन जीवनात प्रवेश करणे हे तुझ्या हिताचे आहे

  23. जर तुझा डोळा तुला अडखळण करीत असेल, तर तो उपटून फेकून दे. दोन डोळ्यांसह अग्नीच्या नरकात जाण्यापेक्षा एका डोळ्याने जीवनात जाणे उत्तम आहे.

  24. मग संतप्त झालेल्या प्रभूने त्या दुष्ट मनुष्याला, तो सर्व कर्ज फेडीपर्यंत तुरुंगामध्ये कोंडून ठेवले.

  25. “जर तुम्ही तुमच्या भावाची व बहिणीची मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गीय पिताही याचप्रकारे तुम्हा प्रत्येकाला वागवेल.”