Skip to content

Babylon बद्दल बायबलमधील वचने: Conquests by

36 वचने · 73 पैलू

Conquests by बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यावर यिर्मयाहने उत्तर दिले, “सिद्कीयाहला सांगा,

  2. ‘इस्राएलचे परमेश्वर याहवेह म्हणतात की तुम्हाला ज्या बाबेलच्या राजाने व खाल्डियन लोकांनी वेढा घातला आहे, त्यांच्याशी लढताना मी तुमची शस्त्रे तुमच्याच विरुद्ध करेन. मी तुमच्या शत्रूंना या नगराच्या आत एकत्रित करणार आहे.

  3. माझ्या अतिक्रोध व भयानक कोपामुळे माझा उगारलेला हात व शक्तिशाली भुजा घेऊन मी स्वतःच तुमच्याविरुद्ध लढणार आहे.

  4. या नगरात राहणाऱ्या सर्वांवर—मनुष्य व प्राणी या दोघांवर—मी भयानक मरी पाठवेन आणि ते मरतील.

  5. त्यानंतर याहवेहने ही घोषणा केली, मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह, त्याचे अधिकारी, व मरीमधून वाचलेल्या या नगरातील सर्व लोकांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व त्यांचे शत्रू, जे त्यांचा प्राण घेऊ पाहतात त्यांच्या हाती देईन. तो त्यांना तलवारीने ठार करेल; तो त्यांच्यावर कोणतीही दया, करुणा वा कृपा करणार नाही.’

  6. “पुढे या लोकांना सांग, ‘याहवेह म्हणतात: पाहा मी तुमच्यासमोर जीवनाचा मार्ग आणि मरणाचा मार्ग ठेवला आहे.

  7. या नगरात जे कोणी राहतील ते तलवारीने, दुष्काळाने, मरीने मरतील. परंतु जे कोणी ज्यांनी तुम्हाला वेढा घातला आहे त्या खास्द्यांच्या सैन्यास समर्पण करतील ते जगतील; त्यांचा जीव वाचेल.

  8. कारण मी या नगराचे भले नाही, तर विध्वंस करण्याचा निर्धार केला आहे, ही याहवेहची घोषणा आहे. हे नगर बाबेलच्या राजाच्या हाती देण्यात येईल आणि तो ते अग्नीने जाळून भस्म करेल.’

  9. याहवेहनी मला असे म्हटले आहे: “चामड्याच्या वाद्यांचा व गुणाकार चिन्हाच्या सळयांचा एक जू तयार कर आणि तो तुझ्या मानेवर ठेव.

  10. मग एदोम, मोआब, अम्मोन, सोर व सीदोन यांच्या राजांना, यरुशलेममध्ये यहूदीयाचा राजा सिद्कीयाहकडे आलेल्या दूतांसह हा संदेश पाठव,

  11. त्यांच्या अधिकार्‍यांसाठी एक संदेश दे आणि सांग, ‘इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह, असे म्हणतात: “तुमच्या धन्यांना सांगा की:

  12. माझ्या महान शक्तीने व उगारलेल्या भुजेने मी पृथ्वी, सर्व मानवजात, व प्राणिमात्रेस निर्माण केले आणि या सर्वगोष्टी मी माझ्या इच्छेस येईल त्याला देतो.

  13. यास्तव आता तुमचे सर्व देश, मी माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या हवाली केले आहेत. मी सर्व वनपशूदेखील त्याच्या अधीन होतील असे केले आहे.

  14. केदार व हासोरची राज्ये ज्यांच्यावर बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने हल्ला केला त्याविषयी: याहवेह असे म्हणतात: “सज्ज व्हा, व केदारवर हल्ला करा आणि पूर्वेच्या लोकांना नष्ट करा.

  15. त्यांचे कळप व त्यांचे तंबू उचलून नेण्यात येतील; त्यांची आश्रयस्थाने, सर्व घरगुती सामान व उंटही हस्तगत केले जातील. लोक त्यांच्यावर ओरडून म्हणतील, ‘प्रत्येक बाजूला आतंक पसरला आहे!’

  16. “लवकर दूर पळा! हासोरवासीयांनो, खोल गुहेत दडून बसा,” कारण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने तुमच्याविरुद्ध कट केला आहे; नबुखद्नेस्सर, त्याने तुमच्याविरुद्ध कारस्थान रचले आहे, याहवेह जाहीर करतात.

  17. “सज्ज हो आणि सुखात राहणार्‍या राष्ट्रांवर हल्ला कर, जे आत्मविश्वासाने जगतात,” याहवेह जाहीर करतात. “ज्या राष्ट्रांना प्रवेशद्वार नाही वा सळया नाहीत; त्यातील लोक धोक्यांपासून दूर राहतात.

  18. त्यांचे सर्व उंट लुटून नेले जातील, व त्यांचे मोठमोठे कळप युद्धाची लूट सामुग्री होतील. या मूर्तिपूजक लोकांची मी वाऱ्यागत पांगापांग करेन मी त्यांच्यावर चहूकडून अरिष्ट आणेन. याहवेह असे जाहीर करतात.

  19. हासोरात कोल्हे संचार करतील, ते कायमचे ओसाड होईल. तिथे पुन्हा कोणीही राहणार नाही; मनुष्य तिथे वस्ती करणार नाही.”

  20. “मानवपुत्रा, बाबेलच्या राजाच्या तलवारीसाठी दोन रस्ते आखून घे, दोन्ही एकाच देशातून निघतील. शहराकडे जाताना जिथे दुहेरी वाटा निघतात तिथे चिन्हस्तंभ लाव.

  21. अम्मोन्यांच्या राब्बाहविरुद्ध येणार्‍या तलवारीसाठी एक वाट आणि यहूदाह व तटबंदीच्या यरुशलेमच्या विरुद्ध येणार्‍या तलवारीसाठी दुसरी वाट आखून ठेव.

  22. कारण बाबेलचा राजा शकुन पाहण्यासाठी दुहेरी वाटेच्या मधोमध, त्या दोन वाटांच्या चौकात थांबेल: तो बाणांनी चिठ्ठ्या टाकेल, तो मूर्तींचा सल्ला घेईल आणि काळजाची परीक्षा करून शकुन पाहील.

  23. त्याच्या उजव्या हातात यरुशलेमची चिठ्ठी निघेल, जिथे तो युद्धाची यंत्रे लावेल, यासाठी की वध करण्याची आज्ञा द्यावी, युद्धाची घोषणा करावी, द्वारांना युद्धाची यंत्रे लावावी, मोर्चे बांधावे व तट उभारावे.

  24. ज्यांनी त्याच्याशी निष्ठेने शपथ वाहिली त्यांना तो शकुन खोटा वाटेल, परंतु तो त्यांना त्यांच्या दोषाची आठवण करून देईल व त्यांना कैद करून नेईल.

  25. “यास्तव सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘तुम्ही लोकांनी उघड बंड करून आणि तुम्ही जे काही करता त्याद्वारे तुमचे अपराध उघड करून, तुमच्या मनात दोष आणला आहे; आणि तुम्ही असे केले आहे म्हणून तुम्ही बंदिवासात नेले जाल.