मुख्य मजकुरावर जा

Babylon बद्दल बायबलमधील वचने: Captivity of the Jews by

13 वचने · 73 पैलू

"Babylon" साठी शोधा

Captivity of the Jews by बद्दल वचने

  1. याहवेह असे म्हणतात: मी तुला स्वतःकरिता व तुझ्या मित्राकरिता दहशत असे करेन; ते सर्व शत्रूंच्या तलवारींनी बळी पडलेले तू आपल्या नजरेने पाहशील. मी संपूर्ण यहूदीया प्रांत बाबेलच्या राजाच्या स्वाधीन करेन, तो या लोकांना गुलाम करून बाबेलला नेईल किंवा त्यांना ठार मारेल.

  2. मी या नगरातील सर्व संपत्ती त्यांच्या शत्रूंच्या हातात देईन—सर्व उत्पादन, सर्व जडजवाहीर आणि यहूदीयाच्या राजांचा सर्व खजिना. ते त्यांना लुटतील आणि बाबेलला ते घेऊन जातील.

  3. आणि हे पशहूरा, तू स्वतः व तुझ्यासह तुझ्या घरात राहणारे सर्वजण बाबेलमध्ये बंदिवासात जाल. तू तिथेच मरशील व पुरला जाशील, तू व ज्यांच्याकडे तू खोटी भविष्यवाणी केलीस त्या तुझ्या सर्व मित्रगणाची गतही तशीच होईल.”

  4. “लबानोनात जा व विलाप करा, बाशानात तुमचा आवाज ऐकू आला पाहिजे, अबारीमाहून आरोळी मारा, कारण तुमचे सर्व मित्र चिरडले गेले आहेत.

  5. तुम्हाला सुरक्षित वाटत होते, तेव्हाच मी तुम्हाला सावधगिरीचा इशारा दिला होता, परंतु तुम्ही उत्तर दिले, ‘मी ऐकणार नाही!’ लहानपणापासून तुम्ही असेच आहात; तुम्ही आज्ञापालन केलेच नाही!

  6. आता वार्‍याच्या झोतासरशी तुझे मेंढपाळ उडून जातील, तुमच्या सर्व मित्रांना बंदिवासात नेण्यात येईल. मग तुम्ही शरमिंदे व्हाल व तुमच्या सर्व दुष्टपणामुळे तुम्ही तुमची प्रतिष्ठा घालवाल.

  7. तुम्ही जे लबानोनच्या गंधसरूच्या राजवाड्यात रहिवास करीत होते, जेव्हा तुम्हाला वेदना सहन कराव्या लागतील तेव्हा तुम्ही तळमळाल; एखादी स्त्री प्रसूती वेदनांनी व्याकूळ होऊन तळमळते तसे तुमचे होईल!

  8. “मी माझ्या जिवाची शपथ घेऊन सांगतो,” असे म्हणून याहवेह जाहीर करतात, यहूदीयाचा राजा यहोयाकीम याचा पुत्र कोन्याह, तू माझ्या उजव्या हातातील मुद्रिकेसारखा असलास, तरीही मी तुला ओढून काढेन,

  9. आणि तुझा वध करू पाहणार्‍यांच्या हाती देईन, ज्यांची तुला भयंकर भीती वाटते—जसे खास्द्यांचा राजा नबुखद्नेस्सर आणि बाबेलची प्रजा.

  10. तू व तुझी माता, यांना मी अशा देशाबाहेर भिरकावून टाकेन, जिथे तुमचा जन्म झाला नव्हता आणि त्या देशात तुम्हाला मरण येईल.

  11. मी उत्तरेकडील सर्व लोक व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यांना एकवटेन. त्याच्या सर्व सैन्यांना मी या देशावर, येथील लोकांवर व तुमच्या आसपासच्या इतर राष्ट्रांवर आणेन. मी त्यांचा संपूर्ण नायनाट करून त्यांना दहशत, तिरस्कार व नाशाचा कायमचा विषय करेन,” याहवेह म्हणतात,

  12. “त्यांचे हर्ष व त्यांच्या आनंदोत्सवाचे स्वर, वर आणि वधूंचे स्वर, त्यांच्या जात्यांचे आवाज व त्यांच्या दिव्यांचा प्रकाश मी नाहीसा करेन.

  13. हा सर्व देश ओसाड व पडीक असा होईल. हे देश सत्तर वर्षे बाबेलच्या राजाची सेवा करतील.