मुख्य मजकुरावर जा

Babylon बद्दल बायबलमधील वचने: Treatment of the Jews in

9 वचने · 73 पैलू

Treatment of the Jews in बद्दल वचने

  1. यहूदीयाचा राजा यहोयाखीनच्या बंदिवासातील सदतिसाव्या वर्षी, एवील-मरोदख हा बाबेलचा राजा झाला, तेव्हा त्याने यहूदीयाचा राजा यहोयाखीनची बंदिवासातून सुटका केली. त्याने हे बाराव्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी केले.

  2. तो त्याच्याशी कृपेने बोलला आणि त्याचे राजासन जे राजे त्याच्यासोबत बाबेल येथे होते, त्यांच्या राजासनापेक्षा उंच केले.

  3. यहोयाखीनने तुरुंगातील कपड्यांचा त्याग केला आणि आयुष्यभर राजाच्या मेजावर भोजन केले.

  4. यहोयाखीन जिवंत असेपर्यंत राजा त्याला प्रती दिवस नियमित पुरवठा करीत असे.

  5. मग राजाने आपल्या दरबारातील प्रमुख अधिकारी अश्पनजास राजघराण्यातील काही इस्राएली आणि कुलीन लोकांना राजाच्या सेवेत आणण्याचा आदेश दिला—

  6. शारीरिक दोष नसलेले तरुण पुरुष, देखणे, सर्वप्रकारच्या विद्येत निष्णात, ज्ञानसंपन्न, समजण्यास त्वरित आणि राजाच्या महालात सेवा करण्यास पात्र. त्याने त्यांना खाल्डियन भाषा व विद्या शिकवावी.

  7. राजाने स्वतःच्या भोजनातून रोजचे भोजन आणि द्राक्षारसातून देण्याचा आदेश दिला. त्यांना तीन वर्षे प्रशिक्षित करावे आणि त्यानंतर त्यांना राजाच्या सेवेत आणावे.

  8. जे निवडलेले होते, त्यामध्ये काही यहूदाह वंशातील होते: दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्‍याह.

  9. अश्पनज अधिकार्‍याने त्यांना नवीन नावे दिली: त्याने दानीएलला बेलटशास्सर; हनन्याहला शद्रख; मिशाएलला मेशख; आणि अजर्‍याहला अबेदनगो.