मुख्य मजकुरावर जा

Answers To Prayer बद्दल बायबलमधील वचने

195 वचने · 85 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परमेश्वराने त्यांचे रडणे ऐकले आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी त्यांनी केलेल्या कराराचे त्यांना स्मरण झाले.

  2. मग मोशेने याहवेहकडे आरोळी मारली, “मी या लोकांचे काय करू? ते तर मला धोंडमार करण्याच्या तयारीत आहेत.”

  3. मग याहवेहने मोशेला सांगितले, “लोकांच्या समोर जा. काही इस्राएली वडिलजनांना आपल्याबरोबर घे आणि नाईल नदीवर ज्या काठीने मारले ती आपल्या हाती घे आणि नीघ.

  4. होरेबातील खडकाकडे मी तुझ्यापुढे उभा राहीन. त्या खडकाला काठीने मार आणि त्यातून लोकांना प्यावयास पाणी येईल.” मग मोशेने इस्राएलाच्या वडिलांदेखत तसे केले.

  5. जोपर्यंत मोशे आपले हात वर करीत असे, इस्राएली लोकांचा विजय होत असे, पण जेव्हा ते खाली करी, अमालेक्यांचा विजय होत असे.

  6. जेव्हा मोशेचे हात थकून गेले, त्यांनी एक दगड घेतला व मोशे त्यावर बसला. अहरोन एका बाजूने व हूर दुसर्‍या बाजूने असे त्यांनी त्याचे हात वर धरून ठेवले; व सूर्यास्तापर्यंत त्याचे हात स्थिर राहिले.

  7. आणि यहोशुआने अमालेकी सैन्याला तलवारीने ठार केले.

  8. पण याहवेह त्याचे परमेश्वर यांची कृपादृष्टी व्हावी म्हणून विनंती करत मोशे म्हणाला, “याहवेह, तुमचे लोक ज्यांना तुम्ही महान सामर्थ्याने आणि बलवान हाताने इजिप्तमधून बाहेर आणले, त्यांच्याविरुद्ध तुमचा राग का पेटावा?

  9. इजिप्तच्या लोकांनी असे का म्हणावे की, याहवेहने त्यांना डोंगरात मारून टाकावे व या पृथ्वीतून नाहीसे करावे अशा दुष्ट हेतूने बाहेर काढले? आपल्या तीव्र कोपापासून माघार घ्या; सौम्य व्हा आणि आपल्या लोकांवर आपत्ती आणू नका.

  10. आपले सेवक अब्राहाम, इसहाक व इस्राएल यांची आठवण करा, ज्यांच्याशी आपण स्वतःच्या नावाने शपथ घेतलीः ‘मी तुझे वंशज आकाशातील तार्‍यांइतके करेन, आणि त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे हा सर्व देश मी त्यांच्या वंशजांना देईन, आणि तो सदासर्वकाळासाठी त्यांचे वतन राहील.’ ”

  11. तेव्हा याहवेहने त्याविषयी अनुताप केला व जी विपत्ती आपल्या लोकांवर आणण्याचे म्हटले होते ती आणली नाही.

  12. त्याला अतिशय तहान लागली होती, तेव्हा त्याने याहवेहचा धावा केला, “तुम्ही आपल्या सेवकाला हा मोठा विजय दिला आहे. आता मी तहानेने मरावे काय आणि बेसुंती लोकांच्या हाती पडावे काय?”

  13. तेव्हा परमेश्वराने लेहीतील खोलगट जागा दुभंगली आणि त्यातून पाणी बाहेर आले. जेव्हा शमशोन ते पाणी प्याला, तेव्हा त्याची शक्ती परत आली आणि तो ताजातवाना झाला. मग त्याने त्या ठिकाणाचे नाव एन-हक्कोरे असे ठेवले. आज देखील तो झरा लेही येथे आढळतो.

  14. या बाळासाठी मी प्रार्थना केली, आणि याहवेहकडे मी जे मागितले त्यांनी ते मला दिले आहे.

  15. मग शमुवेलाने एक दूधपिते कोकरू घेतले व त्याचा याहवेहला संपूर्ण होमार्पण म्हणून यज्ञ करून, इस्राएलच्या वतीने याहवेहकडे विनंती केली आणि याहवेहने ती ऐकली.

  16. शमुवेल शौलास म्हणाला, “मला वर आणून तू मला का त्रास दिला आहेस?” शौलाने उत्तर दिले, “मी फार मोठ्या संकटात आहे, पलिष्टी माझ्याविरुद्ध लढाई करत आहेत आणि परमेश्वराने मला सोडून दिले आहे. परमेश्वर मला संदेष्ट्यांच्या अथवा स्वप्नां द्वारे उत्तर देत नाही. यामुळेच मी काय करावे हे तुम्ही मला सांगावे म्हणून मी तुम्हाला बोलाविले आहे.”

  17. म्हणून आपल्या लोकांवर राज्य करण्यासाठी आणि बरे आणि वाईटाची पारख करण्यासाठी आपण आपल्या सेवकाला विवेकी हृदय द्यावे. कारण आपल्या या मोठ्या प्रजेवर कोण राज्य करू शकेल?”

  18. त्यामुळे तू जे मागितले आहेस ते मी करेन. मी तुला ज्ञानी व विवेकी हृदय देईन, म्हणजे तुझ्यासारखा पूर्वी कधी कोणी नव्हता, ना कधी असेल.

  19. तेव्हा राजाने परमेश्वराच्या मनुष्याला म्हटले, “याहवेह तुझ्या परमेश्वराकडे माझ्यासाठी मध्यस्थी कर व माझा हात पूर्ववत व्हावा म्हणून प्रार्थना कर.” तेव्हा परमेश्वराच्या मनुष्याने याहवेहकडे मध्यस्थी केली आणि राजाचा हात बरा होऊन पूर्ववत झाला.

  20. यज्ञाच्या वेळी, एलीयाह संदेष्टा पुढे आला आणि त्याने प्रार्थना केली: “हे याहवेह, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएलच्या परमेश्वरा, आज हे जाहीर होवो की इस्राएलमध्ये केवळ तुम्हीच परमेश्वर आहात आणि मी तुमचा सेवक असून या सर्व गोष्टी मी आपल्या आज्ञेनुसार केल्या आहेत.

  21. मला उत्तर द्या, हे याहवेह, मला उत्तर द्या, म्हणजे या लोकांना समजेल, याहवेह, तुम्हीच परमेश्वर आहे आणि आपणच त्यांची मने परत वळवित आहात.”

  22. तेव्हा याहवेहचा अग्नी आला आणि होमार्पण, लाकडे, धोंडे आणि माती भस्म करून टाकली आणि खळग्यातील पाणी चाटून टाकले.

  23. तेव्हा अलीशा आत गेला, त्याने दोघांच्या मागे दार बंद करून घेतले, आणि याहवेहची प्रार्थना केली.

  24. मग अलीशा मुलाच्या शरीरावर, तोंडावर तोंड, डोळ्यांवर डोळे, हातांवर हात, अशाप्रकारे उपडा पडला. त्यामुळे मुलाच्या शरीरात पुन्हा ऊब येऊ लागली.

  25. मग अलीशा माडीवरून खाली आला व घरात काही वेळ इकडे फेर्‍या मारून पुन्हा माडीवर जाऊन पूर्वीप्रमाणे मुलाच्या शरीरावर उपडा पडला. तेव्हा मुलाने सात वेळा शिंका दिल्या व डोळे उघडले.