Skip to content

Ancient Samaria बद्दल बायबलमधील वचने

87 वचने · 29 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परमेश्वराच्या मनुष्याने राजाला सांगितल्याप्रमाणे झाले: “शोमरोनच्या वेशीजवळ एका शेकेलास एक सिआ सपीठ आणि एका शेकेलास दोन सिआ सातू विकत मिळू लागेल.”

  2. त्या अधिकार्‍याने परमेश्वराच्या मनुष्याला म्हटले होते, “याहवेहने आकाशाच्या खिडक्या उघडल्या, तरी असे घडणे शक्य नाही.” परमेश्वराच्या मनुष्याने उत्तर दिले होते, “तसे तू आपल्या डोळ्यांनी पाहशील, पण त्यातील तू काहीही खाऊ शकणार नाही!”

  3. त्याच्यासोबत असेच घडले, कारण लोकांनी त्याला वेशीजवळ तुडविले आणि तो मरण पावला.

  4. “तुमच्यासोबत तुमच्या धन्याचे पुत्र आहेत आणि तुमच्याजवळ रथ आणि घोडे, तटबंदी असलेले शहर आणि हत्यारेही आहेत, जेव्हा हे पत्र तुम्हाला मिळताच,

  5. योआश आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला आणि यरोबोअम त्याच्या राजासनावर बसला. योआशाला शोमरोनात इस्राएलांच्या राजांसोबत मूठमाती देण्यात आली.

  6. आता अश्शूरच्या राजाने संपूर्ण देशावर आक्रमण केले आणि शोमरोनवर चालून गेला आणि तीन वर्षे त्याला वेढा घातला.

  7. होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन ताब्यात घेतले आणि इस्राएली लोकांना बंदिवान करून अश्शूरला नेले आणि तिथे हलह आणि हाबोर नदीच्या काठावर वसलेल्या गोजान भागात तसेच मेदिया प्रदेशातील नगरांमध्ये वसविले.

  8. जोपर्यंत याहवेहने त्यांना आपल्या उपस्थितीतून घालवून दिले नाही. जी चेतावणी त्यांनी आपल्या सर्व सेवक संदेष्ट्यांद्वारे दिली होती. म्हणून इस्राएली लोकांना त्यांच्या देशातून बंदिवान म्हणून अश्शूरात नेण्यात आले व आजपर्यंत ते तिथेच आहे.

  9. मग अश्शूरच्या राजाने बाबेलच्या, कूथाह, अव्वा, हमाथ व सफरवाईम येथील लोकांच्या वसाहती हालवून त्यांना शोमरोनात इस्राएलांच्या जागी वसाहती करावयास लावल्या. त्यांनी शोमरोन ताब्यात घेतला आणि त्या नगरात राहू लागले.

  10. जेव्हा ते तिथे राहू लागले, प्रारंभी त्यांनी याहवेहची उपासना केली नाही; म्हणून त्यांनी सिंहांना त्यांच्यामध्ये पाठवून त्यांच्यापैकी काही जणांना ठार केले.

  11. हिज्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या चवथ्या वर्षी, म्हणजे इस्राएलाचा राजा एलाहचा पुत्र होशेच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी, अश्शूरच्या शल्मनेसर राजाने शोमरोनवर आक्रमण केले आणि त्याला वेढा घातला.

  12. तिसर्‍या वर्षांच्या शेवटी अश्शूरच्या लोकांनी ते घेतले. शोमरोन हे हिज्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या सहाव्या वर्षी आणि इस्राएलचा राजा होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी ताब्यात घेण्यात आले.

  13. मग अश्शूरच्या राजाने इस्राएली लोकांना अश्शूरमध्ये नेले व त्यांना हलह येथे, गोजानातील हाबोर नदीकिनारी व मेदिया लोकांच्या नगरात ठेवले.

  14. एफ्राईमचे मस्तक शोमरोन आहे, आणि शोमरोनचा प्रमुख केवळ रमाल्याहचा पुत्र आहे. जर तुम्ही तुमच्या विश्वासामध्ये स्थिर राहिला नाही तर तुम्ही उभे राहणारच नाही.’ ”

  15. कारण त्या मुलाला ‘माझे वडील’ किंवा ‘माझी आई’ कसे म्हणायचे हे समजून येण्याआधीच दिमिष्कची संपत्ती आणि शोमरोनची लूट अश्शूरच्या राजाकडून नेली जाईल.”

  16. सर्व लोकांना ते माहीत होईल— एफ्राईम आणि शोमरोन येथील नागरिक— जे अभिमानाने आणि अंतःकरणाच्या उद्धटपणाने असे म्हणतात,

  17. परंतु याहवेहनी रसीनच्या शत्रूंना त्यांच्याविरुद्ध बळकट केले आहे आणि त्यांच्या शत्रूंना प्रेरित केले आहे.

  18. पूर्वेकडून अरामी आणि पश्चिमेकडील पलिष्टींनी इस्राएलला मोठा आ वासून गिळंकृत केले आहे. हे सर्व करूनही त्यांचा संताप अजून शमला नाही, त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.

  19. त्या मुकुटाला धिक्कार असो, जो एफ्राईमच्या दारुड्यांचा अभिमान आहे, त्या फिके पडणार्‍या फुलाला, त्याच्या तेजस्वी सौंदर्याला, सुपीक खोऱ्याच्या टोकावर बसविलेल्या— त्या नगराला, जो मद्याने क्षीण झालेल्यांचा अभिमान आहे!

  20. शोमरोनच्या डोंगरावर तू पुन्हा आपले द्राक्षमळे लावशील; शेतकरी ते मळे लावतील व स्वतःची फळे खाण्याचा आनंद उपभोगतील.

  21. शोमरोन तुझी थोरली बहीण होती, जी आपल्या मुलींसह तुझ्या उत्तरेस राहत होती; आणि तुझ्या दक्षिणेस राहणारी तुझी धाकटी बहीण सदोम आहे.

  22. तू त्यांच्या मार्गांचे केवळ अनुसरण करून त्यांची अमंगळ कृत्ये अंमलात आणली नाही, तर लवकरच तू त्यांच्याहीपेक्षा अति भ्रष्ट झालीस.

  23. शोमरोनने तर तुझ्या तुलनेत अर्धीसुद्धा पातके केली नाहीत. तू त्यांच्यापेक्षा अधिक अमंगळ कृत्ये केली आहेत आणि तू अशी कृत्ये करून तुझ्या बहिणींना नीतिमान असे दाखविले आहे.

  24. “ओहोलाह माझी असतानाच वेश्यावृत्ती करू लागली; आणि तिचे प्रियकर; म्हणजेच अश्शूरी योद्ध्यांची अभिलाषा करू लागली

  25. जेव्हा मी इस्राएलला आरोग्य देतो, तेव्हा एफ्राईमचे पाप आणि शोमरोनचे अपराध प्रकट होतात. ते लबाडी करतात, चोर घरात चोरी करतात, लुटारू रस्त्यावर लूटमार करतात;