Ancient Samaria बद्दल बायबलमधील वचने: Besieged and taken by Shalmaneser
Besieged and taken by Shalmaneser बद्दल वचने
आता अश्शूरच्या राजाने संपूर्ण देशावर आक्रमण केले आणि शोमरोनवर चालून गेला आणि तीन वर्षे त्याला वेढा घातला.
होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन ताब्यात घेतले आणि इस्राएली लोकांना बंदिवान करून अश्शूरला नेले आणि तिथे हलह आणि हाबोर नदीच्या काठावर वसलेल्या गोजान भागात तसेच मेदिया प्रदेशातील नगरांमध्ये वसविले.
हिज्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या चवथ्या वर्षी, म्हणजे इस्राएलाचा राजा एलाहचा पुत्र होशेच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी, अश्शूरच्या शल्मनेसर राजाने शोमरोनवर आक्रमण केले आणि त्याला वेढा घातला.
तिसर्या वर्षांच्या शेवटी अश्शूरच्या लोकांनी ते घेतले. शोमरोन हे हिज्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या सहाव्या वर्षी आणि इस्राएलचा राजा होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी ताब्यात घेण्यात आले.