मुख्य मजकुरावर जा

Ancient Samaria बद्दल बायबलमधील वचने: Besieged by Benhadad

12 वचने · 29 पैलू

Besieged by Benhadad बद्दल वचने

  1. अरामचा राजा बेन-हदादाने आपले सैन्य एकत्र केले. त्याच्याबरोबर बत्तीस राजे आपआपले घोडे व रथ घेऊन त्यांनी शोमरोनला वेढा घालून त्यावर हल्ला केला.

  2. त्याने इस्राएलचा राजा अहाब याच्याकडे शहरात असे सांगत दूत पाठवले,

  3. “बेन-हदाद असे म्हणतो: ‘तुझे चांदी व सोने माझे आहेत, तुझ्या उत्तम स्त्रिया आणि लेकरे ही सुद्धा माझी आहेत.’ ”

  4. इस्राएलच्या राजाने उत्तर दिले, “माझ्या स्वामी, आपल्या म्हणण्याप्रमाणे मी व माझे जे काही आहे ते सर्व आपलेच आहे.”

  5. दूत पुन्हा येऊन म्हणाले, “बेन-हदाद असे म्हणतो: ‘तुझी चांदी व सोने, तुझ्या स्त्रिया व लेकरे यांना माझ्या स्वाधीन करावे म्हणून सांगितले होते.

  6. परंतु उद्या याच वेळी तुझ्या राजवाड्यात व तुझ्या अधिकार्‍यांच्या घरात शोध करावा म्हणून मी माझे अधिकारी पाठवेन. तुझे जे काही मौल्यवान आहे ते सर्व ते घेऊन जातील.’ ”

  7. तेव्हा इस्राएलच्या राजाने देशातील वडील लोकांना बोलाविले व म्हटले, “पाहा हा मनुष्य कसा त्रास देऊ इच्छित आहे! त्याने जेव्हा माझ्या स्त्रिया आणि माझी लेकरे, माझी चांदी व सोने मागवून घेतली, मी त्याला नकार दिला नाही.”

  8. वडील आणि सर्व लोकांनी उत्तर दिले, “आपण त्याचे ऐकू नये किंवा त्याच्या मागण्यांना सहमत होऊ नये.”

  9. तेव्हा त्याने बेन-हदादच्या दूतांना उत्तर दिले, “माझ्या स्वामीला सांगा, ‘पहिल्याने आपण जी मागणी केली होती त्यानुसार आपला हा सेवक करेल, परंतु ही मागणी मी पूर्ण करू शकत नाही.’ ” त्यांनी परत जाऊन हा संदेश बेन-हदादकडे पोहोचविला.

  10. तेव्हा बेन-हदादने अहाबास आणखी एक संदेश पाठवला: “जर माझ्या माणसांसाठी शोमरोनात मूठभर माती जरी पुरेशी पडली तरी देव माझे तसे किंवा त्यापेक्षा अधिक वाईट करो.”

  11. इस्राएलच्या राजाने उत्तर दिले, “त्याला सांगा: ‘युद्धासाठी शस्त्रधारण करणार्‍याने शस्त्र उतरविणार्‍याप्रमाणे फुशारकी मारू नये.’ ”

  12. बेन-हदाद आणि इतर राजे आपल्या तंबूंमध्ये मद्य पीत असताना त्याने ही बातमी ऐकली आणि त्याने त्याच्या माणसांना आज्ञा दिली: “हल्ल्यासाठी तयारी करा.” म्हणून शहरावर हल्ला करण्यास त्यांनी तयारी केली.