मुख्य मजकुरावर जा

Ammonites बद्दल बायबलमधील वचने

135 वचने · 11 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यास्तव आता तुमचे सर्व देश, मी माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या हवाली केले आहेत. मी सर्व वनपशूदेखील त्याच्या अधीन होतील असे केले आहे.

  2. सर्व राष्ट्रे, त्या देशाची वेळ येईपर्यंत, त्याच्या पुत्राची व त्याच्या नातवाची सेवा करतील आणि नंतर अनेक राष्ट्रे व मोठमोठे राजे बाबिलोन जिंकून घेतील आणि त्याला आपला गुलाम करतील.

  3. “ ‘ “जर कोणतेही राष्ट्र किंवा राज्य बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरची सेवा करणार नाही किंवा त्याचा जू आपल्या मानेवर ठेवणार नाही, मी त्या राष्ट्राला तलवार, दुष्काळ आणि मरीने शिक्षा करेन, जोपर्यंत मी त्याच्या हाताने त्यांचा नाश करत नाही, असे याहवेह घोषित करतात.

  4. तुमचे संदेष्टे, दैवप्रश्न करणारे, स्वप्नांचा अर्थ सांगणारे, मांत्रिक व जादूटोणा करणारे म्हणतील, ‘तुम्ही बाबेलच्या राजाची सेवा करणार नाही,’ पण त्यांचे ऐकू नका.

  5. कारण ते तुम्हाला खोटे संदेश देत आहेत. त्यांचे ऐकून तुम्ही केवळ तुमच्या देशातून दूर जाल; मी तुम्हाला तुमच्या देशातून हाकलून देईन आणि तुमचा नाश होईल.

  6. परंतु बाबेलच्या राजाच्या गुलामीला शरण जाणार्‍या कोणत्याही राष्ट्राच्या लोकांना त्यांच्याच देशात राहण्याची मुभा असेल आणि त्यांना नेहमीप्रमाणे आपल्या शेतीची मशागत करता येईल, याहवेह असे म्हणतात.” ’ ”

  7. अम्मोनी लोकांविषयी: याहवेह असे म्हणतात: “इस्राएलला पुत्र नाहीत काय? इस्राएलला वारस नाहीत काय? अम्मोनी राजाने गादचा ताबा का घेतला आहे? त्याचे लोक त्यांच्या नगरात का राहत आहेत?

  8. याहवेह जाहीर करतात, असे दिवस येत आहेत, जेव्हा मी अम्मोन्यांच्या राब्बाह नगराविरुद्ध रणगर्जना करेन, ते नासाडीचा ढिगारा होईल, आणि त्याच्या सभोवतीची सर्व गावे जाळून टाकली जातील. मग इस्राएली येईल आणि आपला देश तुमच्याकडून परत घेतील. मग ज्यांनी इस्राएलला हाकलून लावले, त्या सर्वांना ती हाकलून लावेल.” असे याहवेह म्हणतात.

  9. “हेशबोना, आकांत कर, कारण आय शहर नष्ट झाले आहे! राब्बाहच्या रहिवाशांनो, तुम्ही आक्रोश करा! गोणपाटाची वस्त्रे धारण करून विलाप करा; भिंतीच्या आत इकडे तिकडे धावाधाव करा, कारण त्याच्या सरदारांसह व पुजार्‍यांसह दैवत मोलेख बंदिवासात जाईल.

  10. तुझ्या खोर्‍यांचा तू गर्व का करतेस, सुपीक खोर्‍यांची तू बढाई का मारते? हे अमोन्यांच्या अविश्वासू कुमारिके, तुझ्या संपत्तीवर भरवसा करून तू म्हणतेस, माझ्यावर कोण हल्ला करू शकतो?

  11. तुझ्या सर्व बाजूने मी तुझ्यावर भयंकर अनर्थ आणेन, असे प्रभू, सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. तुझ्यातील प्रत्येकजण देशोघडीला लागेल, त्या फरारी लोकांना एकत्र करण्यास तिथे कोणीही नसेल.

  12. “परंतु नंतर मी अम्मोन्यांच्या समृद्धीची भरपाई करेन,” याहवेह जाहीर करतात.

  13. “आणि तू हे मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि सांग, ‘अम्मोनी लोक व त्यांच्या निंदेविषयी सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘एक तलवार, एक तलवार, कत्तल करण्यास उपसलेली, नाश करण्यास व विजेप्रमाणे; ती चमकविलेली व चमकणारी आहे!

  14. जरी तुमच्याविषयीचे खोटे दृष्टान्त व तुमच्याबद्दलचे लबाड शकुन केले, तरीही ज्या दुष्टांचा नाश झाला पाहिजे म्हणून त्यांच्या मानेवर तलवार ठेवली जाईल, त्यांचा दिवस आला आहे, त्यांना दंड द्यायचा शेवटचा समय येऊन ठेपला आहे.

  15. “ ‘तलवार परत तिच्या म्यानात जाऊ द्या. ज्या ठिकाणी तू निर्माण केली गेली, तुझ्या पूर्वजांच्या भूमीत, मी तुझा न्याय करेन.

  16. मी माझा क्रोध तुझ्यावर ओतेन आणि माझ्या कोपाचा अग्नी तुझ्यावर फुंकेन; क्रूर लोक जे नाश करण्यात निपुण आहेत, त्यांच्या हाती मी तुला सोपवेन.

  17. तू अग्नीला इंधन अशी होशील, तुझे रक्त तुझ्याच देशात सांडेल, तुझी आठवण आणखी केली जाणार नाही; कारण मी याहवेह हे बोललो आहे.’ ”

  18. याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  19. “हे मानवपुत्रा, अम्मोन्यांकडे आपले तोंड कर आणि त्यांच्याविषयी भविष्यवाणी कर.

  20. अम्मोन्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेहचे वचन ऐका. सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जेव्हा माझे पवित्रस्थान अपवित्र करण्यात आले, आणि इस्राएल देश ओसाड झाला व जेव्हा यहूदीयाचे लोक बंदिवासात गेले, तेव्हा तुम्ही “आहा!” असे म्हटले,

  21. म्हणून तुमच्या पूर्वेस असलेल्या लोकांना त्यांची मालमत्ता म्हणून तुम्हाला मी त्यांच्या स्वाधीन करेन. ते त्यांच्या छावण्या तुमच्यात उभारतील व त्यांचे तंबू तुमच्यात बांधतील; ते तुमची फळे खातील व तुमचे दूध पितील.

  22. मी राब्बाह नगराला उंटांचा तबेला व अम्मोनला मेंढरांचे विश्रामस्थान असे करेन. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.

  23. कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: कारण तुम्ही टाळ्या वाजविल्या व उड्या मारल्या आणि इस्राएल देशाप्रती आपल्या हृदयात द्वेष ठेऊन आनंद केला,

  24. आता मी माझा हात तुझ्याविरुद्ध उगारेन व तुला राष्ट्रांना लूट म्हणून देईन. राष्ट्रांतून मी तुला पुसून टाकेन आणि देशातून तुला नाहीसे करेन. मी तुझा नाश करेन आणि तू जाणशील की मीच याहवेह आहे.’ ”

  25. “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘मोआब आणि सेईर म्हणाले, “पाहा, यहूदाह तर इतर राष्ट्रांसारखाच झाला आहे,”