Skip to content

Ammonites बद्दल बायबलमधील वचने: Prophecies concerning

49 वचने · 11 पैलू

Prophecies concerning बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह असे म्हणतात, “असे दिवस येत आहेत, मी त्या सर्वांना शिक्षा करेन, ज्यांची केवळ शारीरिक सुंता झाली आहे—

  2. म्हणजे इजिप्ती, एदोमी, अम्मोनी, मोआबी, अरबी, आणि होय, तुम्ही यहूदीयातील लोकांना आणि ते सर्व जे वाळवंटातील दूरच्या प्रदेशात राहतात. या सर्व राष्ट्रांची सुंता झाली नाही, परंतु इस्राएलच्या हट्टी अंतःकरणाची सुंता झालेली नाही.”

  3. याहवेह इस्राएलाचे परमेश्वर मला जे म्हणाले ते असे होते: “माझ्या संतापाने काठोकाठ भरलेला हा द्राक्षारसाचा प्याला माझ्या हातून घे, आणि मी तुला ज्या राष्ट्रांकडे पाठवेन, त्या सर्व राष्ट्रांना त्या प्याल्यातून प्यावयला लाव.

  4. जेव्हा ते यातून पितील तेव्हा ते झोकांड्या खातील व वेडे होतील, कारण मी त्यांच्यावर तलवारीचा प्रहार करेन.”

  5. तेव्हा मी याहवेहच्या हातातून तो प्याला घेतला आणि त्यांनी मला ज्या राष्ट्रांकडे पाठविले, त्या प्रत्येक राष्ट्राला त्यातून प्यावयला लावले:

  6. यरुशलेम व यहूदीयाची नगरे, आणि त्यांचे राजे आणि अधिपती या सर्वांनी पडीक व भयानकतेचे एक उदाहरण, तिरस्कृत व शापित व्हावे—जसे ते आजही आहेत;

  7. इजिप्तचा राजा फारोह व त्याचे सेवक, अधिपती व सर्व लोक, त्या देशात असलेले सर्व परकीय लोक;

  8. त्याचप्रमाणे ऊस देशातील राजे; व पलिष्ट्यांचे राजे (अष्कलोन, गाझा, एक्रोन, अश्दोदचे अवशिष्ट लोक);

  9. एदोम, मोआब व अम्मोन;

  10. यहूदीयाचा राजा, योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या आरंभी हा संदेश याहवेहकडून यिर्मयाहला मिळाला:

  11. याहवेहनी मला असे म्हटले आहे: “चामड्याच्या वाद्यांचा व गुणाकार चिन्हाच्या सळयांचा एक जू तयार कर आणि तो तुझ्या मानेवर ठेव.

  12. मग एदोम, मोआब, अम्मोन, सोर व सीदोन यांच्या राजांना, यरुशलेममध्ये यहूदीयाचा राजा सिद्कीयाहकडे आलेल्या दूतांसह हा संदेश पाठव,

  13. त्यांच्या अधिकार्‍यांसाठी एक संदेश दे आणि सांग, ‘इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह, असे म्हणतात: “तुमच्या धन्यांना सांगा की:

  14. माझ्या महान शक्तीने व उगारलेल्या भुजेने मी पृथ्वी, सर्व मानवजात, व प्राणिमात्रेस निर्माण केले आणि या सर्वगोष्टी मी माझ्या इच्छेस येईल त्याला देतो.

  15. यास्तव आता तुमचे सर्व देश, मी माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या हवाली केले आहेत. मी सर्व वनपशूदेखील त्याच्या अधीन होतील असे केले आहे.

  16. सर्व राष्ट्रे, त्या देशाची वेळ येईपर्यंत, त्याच्या पुत्राची व त्याच्या नातवाची सेवा करतील आणि नंतर अनेक राष्ट्रे व मोठमोठे राजे बाबिलोन जिंकून घेतील आणि त्याला आपला गुलाम करतील.

  17. “ ‘ “जर कोणतेही राष्ट्र किंवा राज्य बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरची सेवा करणार नाही किंवा त्याचा जू आपल्या मानेवर ठेवणार नाही, मी त्या राष्ट्राला तलवार, दुष्काळ आणि मरीने शिक्षा करेन, जोपर्यंत मी त्याच्या हाताने त्यांचा नाश करत नाही, असे याहवेह घोषित करतात.

  18. तुमचे संदेष्टे, दैवप्रश्न करणारे, स्वप्नांचा अर्थ सांगणारे, मांत्रिक व जादूटोणा करणारे म्हणतील, ‘तुम्ही बाबेलच्या राजाची सेवा करणार नाही,’ पण त्यांचे ऐकू नका.

  19. कारण ते तुम्हाला खोटे संदेश देत आहेत. त्यांचे ऐकून तुम्ही केवळ तुमच्या देशातून दूर जाल; मी तुम्हाला तुमच्या देशातून हाकलून देईन आणि तुमचा नाश होईल.

  20. परंतु बाबेलच्या राजाच्या गुलामीला शरण जाणार्‍या कोणत्याही राष्ट्राच्या लोकांना त्यांच्याच देशात राहण्याची मुभा असेल आणि त्यांना नेहमीप्रमाणे आपल्या शेतीची मशागत करता येईल, याहवेह असे म्हणतात.” ’ ”

  21. अम्मोनी लोकांविषयी: याहवेह असे म्हणतात: “इस्राएलला पुत्र नाहीत काय? इस्राएलला वारस नाहीत काय? अम्मोनी राजाने गादचा ताबा का घेतला आहे? त्याचे लोक त्यांच्या नगरात का राहत आहेत?

  22. याहवेह जाहीर करतात, असे दिवस येत आहेत, जेव्हा मी अम्मोन्यांच्या राब्बाह नगराविरुद्ध रणगर्जना करेन, ते नासाडीचा ढिगारा होईल, आणि त्याच्या सभोवतीची सर्व गावे जाळून टाकली जातील. मग इस्राएली येईल आणि आपला देश तुमच्याकडून परत घेतील. मग ज्यांनी इस्राएलला हाकलून लावले, त्या सर्वांना ती हाकलून लावेल.” असे याहवेह म्हणतात.

  23. “हेशबोना, आकांत कर, कारण आय शहर नष्ट झाले आहे! राब्बाहच्या रहिवाशांनो, तुम्ही आक्रोश करा! गोणपाटाची वस्त्रे धारण करून विलाप करा; भिंतीच्या आत इकडे तिकडे धावाधाव करा, कारण त्याच्या सरदारांसह व पुजार्‍यांसह दैवत मोलेख बंदिवासात जाईल.

  24. तुझ्या खोर्‍यांचा तू गर्व का करतेस, सुपीक खोर्‍यांची तू बढाई का मारते? हे अमोन्यांच्या अविश्वासू कुमारिके, तुझ्या संपत्तीवर भरवसा करून तू म्हणतेस, माझ्यावर कोण हल्ला करू शकतो?

  25. तुझ्या सर्व बाजूने मी तुझ्यावर भयंकर अनर्थ आणेन, असे प्रभू, सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. तुझ्यातील प्रत्येकजण देशोघडीला लागेल, त्या फरारी लोकांना एकत्र करण्यास तिथे कोणीही नसेल.