मुख्य मजकुरावर जा

Ammonites बद्दल बायबलमधील वचने: Defeated by the Israelites

43 वचने · 11 पैलू

Defeated by the Israelites बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यास्तव याहवेहचा राग इस्राएलवर भडकला. त्यांनी त्यांना पलिष्टी आणि अम्मोनी लोकांच्या हाती विकले.

  2. ज्यांनी त्या वर्षी त्यांची दाणादाण केली आणि त्यांना चिरडून टाकले. अठरा वर्षे त्यांनी अमोऱ्यांचा देश असलेल्या गिलआदामध्ये यार्देन नदीच्या पूर्वेकडील सर्व इस्राएली लोकांवर अत्याचार केला.

  3. तसेच यहूदाह घराणे, बिन्यामीन घराणे व एफ्राईम घराण्यांविरुद्ध युद्ध करण्यास अम्मोनी वंशजांनी यार्देन नदी पार केली; यामुळे इस्राएली फार संकटात होते.

  4. तेव्हा इस्राएली लोकांनी याहवेहला आरोळी मारली, “आम्ही आमच्या परमेश्वराचा त्याग केला आणि बआलची सेवा करून तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.”

  5. याहवेहने इस्राएली लोकांना उत्तर दिले, “जेव्हा इजिप्ती, अमोरी, अम्मोनी, पलिष्टी,

  6. सीदोनी, अमालेकी व माओनी या सर्वांनी तुमच्यावर अत्याचार केला आणि तुम्ही माझ्या मदतीसाठी धावा केला आणि मी तुम्हाला सोडविले नाही काय?

  7. परंतु तुम्ही माझा त्याग केला आणि इतर दैवतांची सेवा करू लागले, म्हणून यापुढे मी तुम्हाला सोडविणार नाही.

  8. जा आणि तुम्ही निवडलेल्या नवीन दैवतांचा धावा करा. तुमच्या आपत्काली त्यांनीच तुम्हाला सोडवावे!”

  9. परंतु इस्राएली लोकांनी याहवेहला म्हटले, “आम्ही पाप केले आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा, पण आता आम्हाला सोडवा.”

  10. नंतर त्यांनी त्यांच्याजवळ असलेली परदेशी दैवते दूर टाकली आणि याहवेहची सेवा केली. याहवेहना इस्राएलची दैन्यावस्था सहन झाली नाही.

  11. जेव्हा अम्मोनी लोकांना युद्धासाठी एकत्र करण्यात आले आणि त्यांनी गिलआदामध्ये तळ ठोकला, तेव्हा इस्राएली लोक एकत्र आले आणि त्यांनी मिस्पाह येथे तळ दिला.

  12. गिलआदाच्या लोकांचे पुढारी एकमेकांना म्हणाले, “जो कोणी अम्मोनी लोकांवर हल्ला करण्यास पुढाकार घेईल तो गिलआदामध्ये राहणार्‍या सर्वांचा प्रमुख होईल.”

  13. नंतर इफ्ताहाने अम्मोन्यांवर आक्रमण केले आणि याहवेहने त्यांना त्याच्या हाती दिले.

  14. अरोएरापासून ते मिन्नीथापर्यंतच्या वाटेवरील सर्व वीस नगरांमध्ये आणि दूर आबेल-करामीमपर्यंत त्याने अम्मोन्यांची भयंकर कत्तल केली. अशाप्रकारे इस्राएली लोकांनी अम्मोनी लोकांस जेरीस आणले.

  15. मग एफ्राईमच्या लोकांनी आपले सैन्य एकवटले आणि ते पार होऊन साफोन येथे आले. ते इफ्ताहाला म्हणाले, “आम्हाला सोबत न घेता तू अम्मोन्यांशी लढावयास का गेलास? आता आम्ही तुझ्यासह तुझे घर जाळून टाकणार आहोत.”

  16. इफ्ताहाने प्रत्युत्तर दिले, “मी आणि माझ्या लोकांचे अम्मोन्यांशी फार मोठे भांडण झाले आणि मी तुम्हाला बोलाविले देखील होते, पण तुम्ही मला त्यांच्या हातातून सोडविले नाही.

  17. जेव्हा मी हे पहिले तुम्ही मदतीला येत नाही, तेव्हा मी माझ्या जिवावर उदार होऊन अम्मोनी लोकांवर चालून गेलो आणि याहवेहने मला त्यांच्यावर विजय दिला. मग आज तुम्ही आमच्याविरुद्ध लढावयास का आलात?”

  18. अम्मोनी नाहाशने जाऊन याबेश-गिलआदला वेढा घातला. याबेशचे सर्व पुरुष त्याला म्हणाले, “आमच्यासह एक करार कर, म्हणजे आम्ही प्रजा होऊन तुमची सेवा करू.”

  19. परंतु अम्मोनी नाहाश म्हणाला, “मी एकाच अटीवर तुमच्याशी करार करेन की मी तुम्हा प्रत्येकाचा उजवा डोळा फोडून संपूर्ण इस्राएलवर अप्रतिष्ठा आणेन.”

  20. याबेशचे वडीलजन त्याला म्हणाले, “आम्हाला सात दिवसांचा अवकाश दे म्हणजे आम्ही संपूर्ण इस्राएलमध्ये निरोप पाठवू; जर आमची सुटका करण्यासाठी कोणी आला नाही तर आम्ही तुला स्वाधीन होऊ.”

  21. जेव्हा निरोप्यांनी शौलाच्या गिबियाह येथे जाऊन तेथील लोकांस हे वर्तमान दिले, तेव्हा त्या सर्वांनी मोठ्याने आकांत केला.

  22. त्याचवेळेस शौल त्याच्या बैलांमागून शेतातून परत येत होता, त्याने विचारले, “प्रत्येकाला काय झाले आहे? ते का रडत आहेत?” तेव्हा याबेशाच्या लोकांनी जे काही सांगितले होते ते त्यांनी त्याला सांगितले.

  23. जेव्हा शौलाने त्यांचे शब्द ऐकले, तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर सामर्थ्याने आला आणि तो क्रोधाने पेटला.

  24. त्याने बैलाची एक जोडी कापून त्यांचे तुकडे केले आणि निरोप्यांच्या हाती ते तुकडे सर्व इस्राएलमध्ये पाठविले आणि जाहीर केले, “जे कोणी शौल आणि शमुवेल यांचे अनुसरण करणार नाही, त्यांच्या बैलांचे असेच केले जाईल.” तेव्हा लोकांना याहवेहचे भय वाटू लागले आणि ते एकजूट होऊन बाहेर आले.

  25. बेजेक येथे शौलाने त्यांची मोजणी केली, तेव्हा ते तीन लाख इस्राएली पुरुष होते आणि यहूदाहचे तीस हजार पुरुष होते.