Skip to content

Adultery बद्दल बायबलमधील वचने

242 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सुज्ञान तुला व्यभिचारी स्त्रीपासूनसुद्धा वाचवेल, तिच्या लाडिक बोलण्याने तुला मोहात पाडणार्‍या स्त्रीपासून,

  2. जिने आपला तारुण्यातील सहचारी सोडला आहे, आणि परमेश्वरासमोर केलेल्या कराराकडे दुर्लक्ष केले आहे.

  3. निश्चितच तिच्या घराची वाट मृत्यूकडे नेते आणि तिचे मार्ग मृतांच्या आत्म्यांकडे घेऊन जातात.

  4. तिच्याकडे जाणारा परत येत नाही किंवा जीवनाच्या मार्गावर येत नाही.

  5. कारण वेश्येचे बोलणे मधासारखे गोड असते, आणि तिचा संवाद तेलापेक्षा गुळगुळीत असतो;

  6. परंतु शेवटी ती दवण्यासारखी कडू होते, आणि दुधारी तलवारीसारखी तीक्ष्ण होते.

  7. तिचे पाय मृत्यूकडे जातात; तिची पावले सरळ अधोलोकी नेतात.

  8. जीवनाच्या मार्गाचा ती विचारच करीत नाही; तिचे मार्ग लक्ष्यहीनपणे भटकणारे आहेत, परंतु तिला ते माहीत नसते.

  9. मग माझ्या मुलांनो, आता माझे ऐका; माझ्या बोधवचनांकडे पाठ फिरवू नका.

  10. तू तुझा मार्ग अशा स्त्रीपासून दूर ठेव, तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नकोस,

  11. असे होऊ नये की, तू तुझा मान दुसर्‍यांना द्यावा आणि तुझी प्रतिष्ठा क्रूर मनुष्याला मिळावी,

  12. तुझ्या संपत्तीवर अपरिचित लोक मेजवानी करू नये आणि तुझ्या परिश्रमाने दुसर्‍याचे घर समृद्ध होऊ नये.

  13. तुझ्या जीवन अंती, जेव्हा तुझे मांस आणि शरीर झिजून जाईल तेव्हा तू दुःखाने विव्हळशील.

  14. तू म्हणशील, “अरेरे! मी शिस्तीचा किती तिरस्कार केला! माझ्या अंतःकरणाने सुधारणा कशी फेटाळून लावली!

  15. मी माझ्या शिक्षकांचे आज्ञापालन करत नसे किंवा मला मार्गदर्शन करणार्‍यांकडे मी कानाडोळा करीत असे.

  16. आणि म्हणून लवकरच मी परमेश्वराच्या लोकांच्या सभेपुढे गंभीर अडचणीत आलो.”

  17. तुझ्या स्वतःच्याच टाकीतील पाणी पी. तुझ्या स्वतःच्या विहिरीतील वाहते पाणी पी.

  18. तुझे पाण्याचे झरे भरून रस्त्यांवर वाहून जावेत काय, तुझे पाण्याचे प्रवाह भर चौकात वाहावेत काय?

  19. ते फक्त तुझ्यासाठीच असावेत, अनोळख्यांबरोबर ते कधीच वाटली जाऊ नयेत.

  20. तुझे पौरुषत्व आशीर्वादित होवो; आपल्या तारुण्यातील पत्नीबरोबर आनंदाचा उपभोग घे.

  21. प्रेमळ हरिणी सारखी, एक आकर्षक हरिणी अशी ती— तिचे स्तन तुला नेहमीच तृप्त करोत, तिच्या प्रेमाने तू नेहमी धुंद व्हावेस.

  22. माझ्या मुला, तू दुसर्‍या मनुष्याच्या पत्नीबरोबर धुंद का व्हावेस? आणि स्वैर स्त्रीला आलिंगन का द्यावेस?

  23. कारण तुझे मार्ग याहवेहच्या दृष्टीसमोर आहेत, आणि ते तुझ्या सर्व मार्गांचे परीक्षण करतात.

  24. दुष्ट मनुष्याचा नाश स्वतःच्याच पातकांनी होतो; त्याचीच पातके दोर बनून त्याला पाशात पकडून ठेवतात.

  25. ते तुला तुझ्या शेजार्‍याच्या पत्नीपासून दूर ठेवतात, वाईट स्त्रीच्या लाडिक शब्दांपासून सांभाळतात.