Adultery बद्दल बायबलमधील वचने: General references
General references बद्दल वचने
पण एका रात्री परमेश्वर स्वप्नात अबीमेलेखकडे आले आणि त्याला म्हणाले, “आता तुझा अंत झाल्यासारखाच आहे, कारण जी स्त्री तू आणली आहेस, ती विवाहित आहे.”
परंतु हे कृत्य करून तू याहवेहचा भयंकर अनादर केला आहेस, या कारणाने तुझ्यापासून जन्मलेला मुलगा मरण पावेल.”
व्यभिचार्याचा डोळा दिवस मावळण्याची वाट पाहत असतो; तो म्हणतो, ‘मला कोणीही पाहत नाही.’ तो आपला चेहरा झाकून घेतो.
चोर अंधारात घरे फोडतात, परंतु दिवसा ते लपून राहतात; त्यांना प्रकाशाशी काहीही देणे घेणे नको असते.
मध्यरात्र त्या प्रत्येकासाठी सकाळ असते, अंधारातील आतंकाशी त्यांचे सख्य असते.
“तरीही पृथ्वीच्या पाठीवर ते फेसासारखे आहेत; त्यांच्या वाट्याची भूमी इतकी शापित असते, की त्यांच्या द्राक्षमळ्यात कोणीही जात नाही.
“मी माझ्या डोळ्यांशी करार केला आहे की कोणा तरुण स्त्रीकडे कुवासनेने पाहणार नाही.
“जर माझे हृदय परस्त्रीद्वारे भुरळीत झाले असेल, अथवा मी शेजार्याच्या दाराशी दडून बसलो आहे,
तर माझी पत्नी परपुरुषाच्या घरातील धान्य दळो, आणि इतर माणसे तिच्या अंथरुणात निजो.
कारण ते तर खूपच दुष्ट, आणि दंडास पात्र असे पाप आहे.
हा भस्म करणारा अग्नी आहे; जो माझा हंगाम उपटून टाकेल.
सुज्ञान तुला व्यभिचारी स्त्रीपासूनसुद्धा वाचवेल, तिच्या लाडिक बोलण्याने तुला मोहात पाडणार्या स्त्रीपासून,
जिने आपला तारुण्यातील सहचारी सोडला आहे, आणि परमेश्वरासमोर केलेल्या कराराकडे दुर्लक्ष केले आहे.
निश्चितच तिच्या घराची वाट मृत्यूकडे नेते आणि तिचे मार्ग मृतांच्या आत्म्यांकडे घेऊन जातात.
तिच्याकडे जाणारा परत येत नाही किंवा जीवनाच्या मार्गावर येत नाही.
कारण वेश्येचे बोलणे मधासारखे गोड असते, आणि तिचा संवाद तेलापेक्षा गुळगुळीत असतो;
परंतु शेवटी ती दवण्यासारखी कडू होते, आणि दुधारी तलवारीसारखी तीक्ष्ण होते.
तिचे पाय मृत्यूकडे जातात; तिची पावले सरळ अधोलोकी नेतात.
जीवनाच्या मार्गाचा ती विचारच करीत नाही; तिचे मार्ग लक्ष्यहीनपणे भटकणारे आहेत, परंतु तिला ते माहीत नसते.
मग माझ्या मुलांनो, आता माझे ऐका; माझ्या बोधवचनांकडे पाठ फिरवू नका.
तू तुझा मार्ग अशा स्त्रीपासून दूर ठेव, तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नकोस,
असे होऊ नये की, तू तुझा मान दुसर्यांना द्यावा आणि तुझी प्रतिष्ठा क्रूर मनुष्याला मिळावी,
तुझ्या संपत्तीवर अपरिचित लोक मेजवानी करू नये आणि तुझ्या परिश्रमाने दुसर्याचे घर समृद्ध होऊ नये.
तुझ्या जीवन अंती, जेव्हा तुझे मांस आणि शरीर झिजून जाईल तेव्हा तू दुःखाने विव्हळशील.
तू म्हणशील, “अरेरे! मी शिस्तीचा किती तिरस्कार केला! माझ्या अंतःकरणाने सुधारणा कशी फेटाळून लावली!