मुख्य मजकुरावर जा

Adultery बद्दल बायबलमधील वचने

242 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्या कुमारिकेला काही करू नये; तिला मरणदंड मिळावा असे पाप तिने केले नाही. एखाद्याने आपल्या शेजार्‍यावर हल्ला करून त्याला ठार मारावे त्याप्रमाणे हे आहे,

  2. कारण त्या पुरुषाने त्या एकट्या कुमारिकेला शेतात शोधून काढली आणि मदतीसाठी ती ओरडलीच असेल, परंतु ते ऐकण्यासाठी आणि तिची सुटका करण्यासाठी त्या ठिकाणी कोणीही नव्हते.

  3. जर एखाद्या पुरुषाने जिचा वाङ्निश्चय झालेला नसेल, अशा कुमरिकेवर बलात्कार केला आणि ते करीत असताना तो आढळला,

  4. तर त्याने मुलीच्या वडिलांना पन्नास चांदीची नाणी दंड म्हणून दिली पाहिजेत आणि त्या कुमारिकेशी विवाह केला पाहिजे, कारण त्याने तिला भ्रष्ट केले. तो जिवंत असेपर्यंत तिला घटस्फोट देऊ शकत नाही.

  5. इस्राएलातील कन्या वा पुत्रांनी मंदिरातील देवदासी बनू नये.

  6. “जो कोणी आपल्या पित्याच्या पत्नीबरोबर समागम करतो, तो शापित होय, कारण त्याने त्याच्या पित्याचे अंथरूण अपमानित केले आहे.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  7. “जो कोणी आपल्या बहिणीबरोबर, त्याच्या पित्याच्या कन्येबरोबर किंवा आपल्या मातेच्या कन्येबरोबर समागम करतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  8. “जो कोणी आपल्या सासूबरोबर समागम करतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  9. त्या दिवसामध्ये इस्राएलावर कोणी राजा नव्हता. लेवी वंशातील कोण एक मनुष्य एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील दुर्गम भागात राहत होता. त्याने यहूदीयातील बेथलेहेम मधील एक स्त्री आपली उपपत्नी करून घेतली.

  10. परंतु ती उपपत्नी त्याच्यासोबत विश्वासू राहिली नाही. तिने त्याला सोडले आणि यहूदीयातील बेथलेहेमातील आपल्या पित्याच्या घरी परतली. तिथे चार महिने राहिल्यानंतर,

  11. तिचा पती तिला परत आणावे म्हणून तिच्याकडे गेला. त्याच्याबरोबर त्याने एक सेवक आणि दोन गाढवे घेतली. तिने त्याला पित्याच्या घरी नेले आणि जेव्हा तिच्या पित्याने त्याला पाहिले, तेव्हा त्याने त्याचे आनंदाने स्वागत केले.

  12. त्याच्या सासर्‍याने म्हणजे स्त्रीच्या पित्याने त्याला थोडे दिवस राहण्याचा आग्रह केला; आणि म्हणून तो त्याच्यासोबत खातपीत आणि विश्राम करीत तिथे तीन दिवस राहिला.

  13. तर आता, तलवार तुझ्या घराण्याला कधीही सोडणार नाही, कारण तू मला तुच्छ लेखले आणि उरीयाह हिथीची पत्नी तू स्वतःची पत्नी म्हणून घेतली आहेस.’

  14. “याहवेह असे म्हणतात: ‘तुझ्याच घराण्यातून मी तुझ्यावर अरिष्ट आणणार आहे. तुझ्या डोळ्यांसमोर मी तुझ्या स्त्रिया घेऊन तुझ्या जिवलगाला देईन आणि तो दिवसाच्या प्रकाशात तुझ्या स्त्रियांशी संबंध ठेवील.

  15. तू हे गुप्तपणे केलेस, परंतु मी हे दिवसाच्या प्रकाशात सर्व इस्राएलसमोर करेन.’ ”

  16. परंतु हे कृत्य करून तू याहवेहचा भयंकर अनादर केला आहेस, या कारणाने तुझ्यापासून जन्मलेला मुलगा मरण पावेल.”

  17. व्यभिचार्‍याचा डोळा दिवस मावळण्याची वाट पाहत असतो; तो म्हणतो, ‘मला कोणीही पाहत नाही.’ तो आपला चेहरा झाकून घेतो.

  18. चोर अंधारात घरे फोडतात, परंतु दिवसा ते लपून राहतात; त्यांना प्रकाशाशी काहीही देणे घेणे नको असते.

  19. मध्यरात्र त्या प्रत्येकासाठी सकाळ असते, अंधारातील आतंकाशी त्यांचे सख्य असते.

  20. “तरीही पृथ्वीच्या पाठीवर ते फेसासारखे आहेत; त्यांच्या वाट्याची भूमी इतकी शापित असते, की त्यांच्या द्राक्षमळ्यात कोणीही जात नाही.

  21. “मी माझ्या डोळ्यांशी करार केला आहे की कोणा तरुण स्त्रीकडे कुवासनेने पाहणार नाही.

  22. “जर माझे हृदय परस्‍त्रीद्वारे भुरळीत झाले असेल, अथवा मी शेजार्‍याच्या दाराशी दडून बसलो आहे,

  23. तर माझी पत्नी परपुरुषाच्‍या घरातील धान्य दळो, आणि इतर माणसे तिच्या अंथरुणात निजो.

  24. कारण ते तर खूपच दुष्ट, आणि दंडास पात्र असे पाप आहे.

  25. हा भस्म करणारा अग्नी आहे; जो माझा हंगाम उपटून टाकेल.