Skip to content

Adultery बद्दल बायबलमधील वचने

242 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु जर तू तुझ्या पतीशी विवाहित असतानाही वाकडे पाऊल टाकले आहे आणि आपल्या पती व्यतिरिक्त इतर पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवून स्वतःला भ्रष्ट केले आहेस—

  2. यावेळी याजकाने त्या स्त्रीस शपथ देऊन या शापाखाली आणावे—जेव्हा याहवेह तुझ्या उदराचा गर्भपात करेल आणि तुझे पोट फुगेल, तेव्हा याहवेह तुला तुझ्या लोकांमध्ये शापित करो.

  3. शाप देणारे हे पाणी तुझ्या शरीरात जावो, म्हणजे तुझे पोट फुगेल किंवा तुझा गर्भपात होईल.” “ ‘मग त्या स्त्रीने म्हणावे, “आमेन. असेच होवो.”

  4. “ ‘तेव्हा याजकाने हे शापाचे शब्द एका गुंडाळीवर लिहून ते शब्द त्या कडू पाण्यात धुवावे.

  5. ज्या पाण्यापासून शाप येईल ते कडू पाणी त्याने तिला प्यायला द्यावे आणि हे पाणी जे शाप व कडवट कष्ट आणते ते तिच्यात प्रवेश करेल.

  6. याजकाने ते मत्सराचे अन्नार्पण त्या स्त्रीच्या हातातून घ्यावे व याहवेहस ओवाळत ते वेदीकडे आणावे.

  7. त्या अन्नार्पणाचे प्रतीक म्हणून याजकाने त्या अर्पणातील मूठभर अन्न घेऊन ते वेदीवर जाळावे; व त्यानंतर त्याने ते पाणी त्या स्त्रीला प्यायला द्यावे.

  8. जर ती आपल्या पतीशी अविश्वासू राहून तिने स्वतःला भ्रष्ट केले असेल, तर त्याचा परिणाम असा असेल: जेव्हा तिला ते शाप आणि कडवट कष्ट आणणारे पाणी पाजले जाईल, ते तिच्या शरीरात जाईल, तिचे पोट फुगेल आणि तिचे उदर गर्भपात करेल आणि ती शापित होईल.

  9. पण त्या स्त्रीने जर स्वतःला भ्रष्ट केलेले नाही आणि ती शुद्ध असेल, तर ती निर्दोष ठरविली जाईल आणि तिला मुलेबाळे होतील.

  10. “ ‘जेव्हा एखादी स्त्री तिच्या पतीशी विवाहित असतानाही स्वतःला भ्रष्ट करते तेव्हा हा मत्सराचा नियम असावा,

  11. किंवा जेव्हा एखाद्या पुरुषाच्या मनात मत्सराची भावना येते, कारण तो आपल्या पत्नीवर संशय घेतो, याजकाने तिला याहवेहसमोर उभे करावे आणि हा संपूर्ण नियम तिला लागू करावा.

  12. तुम्ही व्यभिचार करू नका.

  13. एखाद्या पुरुषाने पत्नी केली आणि तिच्याशी समागम केल्यानंतर ती त्याला आवडेनाशी झाली

  14. आणि तिची निंदा केली आणि तिच्या नावाची बदनामी करून म्हटले, “मी या स्त्रीसोबत लग्न केले, पण जेव्हा मी तिच्याजवळ गेलो तेव्हा तिच्यात मला कौमार्याबद्दलचा पुरावा आढळला नाही,”

  15. तर मुलीच्या आईवडिलांनी तिच्या कौमार्याबद्दलचा पुरावा, त्या नगराच्या वेशीत वडील मंडळीपुढे साजरा करावा.

  16. तिच्या वडिलांनी त्यांना असे सांगावे, “मी माझी कन्या या मनुष्याला त्याची पत्नी व्हावी म्हणून दिली, परंतु आता ती त्याला आवडत नाही.

  17. आता त्याने तिची निंदा केली आणि म्हणाला, ‘मला तुमच्या कन्येमध्ये कौमार्याबद्दलचे पुरावे आढळले नाही.’ पण हे पाहा आमच्या कन्येच्या कौमार्याबद्दलचा पुरावा.” मग तिच्या आईवडिलांनी ते वस्त्र नगराच्या वडीलांपुढे सादर करावे,

  18. आणि मग नगरातील वडील मंडळीने त्या पुरुषाला घ्यावे आणि त्याला शिक्षा द्यावी.

  19. शंभर चांदीची नाणी दंडादाखल त्याच्याकडून वसूल करावी आणि मुलीच्या वडिलांना द्यावीत, कारण त्या तरुणाने एका इस्राएली कुमारिकेची बदनामी केली. ती त्याची पत्नी म्हणून राहील; तो जिवंत असेपर्यंत त्याने तिला कदापि घटस्फोट देऊ नये.

  20. परंतु आरोप सत्य असल्यास आणि तिच्या कौमार्याबद्दलचा पुरावा आढळला नाही,

  21. तर मात्र नगराच्या वडिलांनी त्या कन्येला तिच्या वडिलांच्या घराच्या दारापर्यंत न्यावे व तिथे नगरातील लोकांनी तिला मरेपर्यंत धोंडमार करावी. आपल्या आईवडिलांच्या घरात राहत असताना, व्यभिचारिणी होऊन तिने इस्राएलात घृणास्पद कृत्य केले आहे. अशा रीतीने तुमच्यामधील दोष काढून टाकण्यात यावे.

  22. एखादा पुरुष दुसर्‍या पुरुषाच्या स्त्रीबरोबर व्यभिचार करीत असताना आढळला, तर तिच्यासोबत झोपलेला पुरुष आणि स्त्री दोघांनाही जिवे मारावे. अशा रीतीने इस्राएलमधून कलंक दूर करून शुद्ध करावे.

  23. ज्या कुमारिकेचा वाङ्निश्चय झालेला आहे, अशा कुमारिकेला जर एखाद्या नगरात एखाद्या पुरुषाने भ्रष्ट केले,

  24. तर त्या दोघांनाही नगराच्या वेशीच्या बाहेर घेऊन जावे आणि मरेपर्यंत धोंडमार करावा—त्या कुमारिकेला अशासाठी की नगरात असताना तिने मदतीसाठी आरडाओरडा केला नाही आणि त्या पुरुषाला अशासाठी की त्याने दुसर्‍या पुरुषाच्या स्त्रीला भ्रष्ट केले. अशा रीतीने तुमच्यामधून कलंक दूर करून शुद्ध करावे.

  25. परंतु एखाद्या पुरुषाने वाङ्निश्चय झालेल्या कुमारिकेला बाहेर शेतात गाठून तिच्यावर बलात्कार केला, तर असे करणार्‍या पुरुषाला ठार मारावे.