Skip to content

Ablution बद्दल बायबलमधील वचने

52 वचने · 10 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “शुद्ध असलेल्या एका पुरुषाने कालवडीची राख गोळा करावी व छावणीबाहेर विधीनुसार शुद्ध असलेल्या ठिकाणी ठेवावी. ही राख इस्राएली समाजाने शुद्धीकरणाच्या पाण्यामध्ये वापरावी; ते पापक्षालनासाठी आहे.

  2. जो मनुष्य कालवडीची राख गोळा करतो त्यानेही आपली वस्त्रे धुवावी व त्यानेही संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. इस्राएली लोक आणि त्यांच्यामध्ये राहणारे परदेशीय लोक यांच्यासाठी हा सर्वकाळचा नियम असावा.

  3. जो मनुष्य शुद्ध आहे, त्याने अशुद्ध झालेल्या व्यक्तींवर तिसर्‍या व सातव्या दिवशी हे पाणी शिंपडावे आणि सातव्या दिवशी त्याने त्यांना शुद्ध करावे. ज्यांचे शुद्धीकरण होत आहे त्यांनी आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने आंघोळ करावी आणि त्या संध्याकाळी ते शुद्ध होतील.

  4. मग मृत माणसाच्या देहाच्या सर्वात जवळ असलेल्या नगरातील सगळे वडीलजन आपले हात खोर्‍यात मान मोडून टाकलेल्या त्या कालवडीवर धुतील,

  5. तेव्हा त्याने त्यांना आपल्याबरोबर घरी नेले. ते विश्रांती घेत असताना आणि त्यांच्या गाढवांना वैरण दिली. त्यांनी आपले पाय धुतले, त्यांनी काही खाणेपिणे केले.

  6. नंतर दावीद उरीयाहला म्हणाला, “तुझ्या घरी जा आणि आपले पाय धू.” तेव्हा उरीयाह राजवाड्यातून निघाला आणि त्याच्यामागोमाग राजाकडून एक बक्षीस पाठवले गेले.

  7. होमबलींची अर्पणे धुण्यासाठी त्याने दहा गंगाळे तयार करून टाकीच्या उजवीकडे पाच व डावीकडे पाच अशी ठेवली. फक्त याजकवर्गाला धुण्यासाठी हौदाचे पाणी वापरता येत असे.

  8. मी माझे हात धुऊन निर्दोषत्व सिद्ध करेन आणि याहवेह, मी तुमच्या वेदीला परिक्रमा घालेन,

  9. माझा पोशाख मी काढून ठेवला आहे— तो मी पुन्हा घालू काय? मी माझे पाय धुतले आहेत, ते मी पुन्हा मळवू काय?

  10. तुझा जन्म झाला त्या दिवशी तुझी नाळ कापली नव्हती, ना तुला पाण्याने धुवून स्वच्छ केले होते व तुला ना मिठाने चोळले होते, ना कापडाने गुंडाळले होते.

  11. तुम्ही उपास करता तेव्हा डोक्याला तेल लावा व आपले तोंड धुवा,

  12. “तुमचे शिष्य आपल्या वाडवडीलांच्या परंपरा का मोडतात? जेवणापूर्वी ते आपले हात धूत नाहीत!”

  13. पिलाताला समजले की आपण काहीही करू शकत नाही, दंगल वाढत आहे असे त्याने पाहिले, तेव्हा त्याने पाणी घेतले आणि सर्व जमावापुढे आपले हात धुतले. “मी या माणसाच्या रक्ताबाबत निर्दोष आहे.” तो म्हणाला, “ही तुमची जबाबदारी आहे.”

  14. येशूंचे काही शिष्य अशुद्ध हाताने, म्हणजे हात न धुताच जेवतात, असे त्यांनी पाहिले होते.

  15. परूशी आणि सर्व यहूदी लोक, वाडवडीलांच्या परंपरेस अनुसरून आपले हात विधिपूर्वक धुतल्याशिवाय कधीही जेवत नसत.

  16. ज्यावेळी ते बाजारातून घरी येत, त्या त्यावेळेस हात धुतल्याशिवाय ते जेवत नसत. भांडी, पातेली, ताटे वगैरे धुण्यासंबंधीच्या अनेक रूढी ते पाळीत असत.

  17. या कारणामुळे परूशी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी येशूंना विचारले, “तुमचे शिष्य आपल्या वाडवडीलांच्या परंपरे प्रमाणे का वागत नाहीत व ते आपले हात अशुद्ध असताना का जेवतात?”

  18. तुम्ही परमेश्वराने दिलेल्या आज्ञा टाळता आणि मनुष्याच्या परंपरेला चिटकून बसता.”

  19. आणि पुढे ते म्हणाले, “तुमच्या रीती पाळण्यासाठी, परमेश्वराच्या आज्ञा टाळण्याचा सुलभ मार्ग तुम्हाला माहीत आहे!

  20. आत जाऊन ती येशूंच्या मागे उभी राहिली व रडू लागली आणि आपल्या अश्रूंनी त्यांचे पाय भिजवू लागली. मग तिने ते आपल्या केसांनी पुसले. त्यांच्या पायांची चुंबने घेतली आणि सुगंधी तेल त्यावर ओतले.

  21. नंतर ते त्या स्त्रीकडे वळाले आणि शिमोनाला म्हणाले, “तू ही स्त्री पाहिली का? मी तुझ्या घरात आलो. माझे पाय धुण्यासाठी तू मला पाणी दिले नाहीस, परंतु तिने माझे पाय तिच्या अश्रूंनी भिजविले आणि तिच्या केसांनी ते पुसले.

  22. परंतु जेव्हा त्याने पाहिले की येशूंनी जेवणासाठी प्रथम हात धुतले नाहीत तेव्हा त्या परूश्याला आश्चर्य वाटले.

  23. ते पाहून प्रभू त्याला म्हणाले, “तुम्ही परूशी लोक थाळी व प्याला बाहेरून स्वच्छ करता, पण तुमची मने लोभ आणि दुष्टपणा यांनी भरलेली असतात.

  24. त्यानंतर त्यांनी मोठ्या गंगाळात पाणी ओतले आणि ते आपल्या शिष्यांचे पाय धुऊ लागले आणि आपल्या कमरेभोवती असलेल्या रुमालाने पुसू लागले.

  25. याच सुमारास ती आजारी पडून मरण पावली आणि तिचा देह धुऊन स्वच्छ केला आणि माडीवरील खोलीत ठेवला होता.