Ablution बद्दल बायबलमधील वचने: Of burnt offerings
Of burnt offerings बद्दल वचने
पाय व आतडी पाण्याने धुऊन याजकाने त्या सगळ्यांचे वेदीवर होम करावे. हे होमार्पण आहे, हे अन्नार्पण आहे. याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे.
त्याची आतडी आणि पाय तुम्ही पाण्याने धुऊन घ्यावीत आणि याजकाने हे सर्व घेऊन यावे आणि त्यांचा वेदीवर होम करावा. हे होमार्पण आहे, हे अन्नार्पण आहे, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे.
त्याने आतडी व पाय धुऊन वेदीवरील होमार्पणासह त्यांचा होम केला.
होमबलींची अर्पणे धुण्यासाठी त्याने दहा गंगाळे तयार करून टाकीच्या उजवीकडे पाच व डावीकडे पाच अशी ठेवली. फक्त याजकवर्गाला धुण्यासाठी हौदाचे पाणी वापरता येत असे.