Ablution बद्दल बायबलमधील वचने: Of the hands
Of the hands बद्दल वचने
“तू कास्याचे गंगाळ व त्याची कास्याची बैठक तयार करावी. ते सभामंडप व वेदीच्या मध्ये ठेवून त्यात पाणी भरावे
अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्यातील पाण्याने आपले हात व पाय धुवावे.
जेव्हा ते सभामंडपात प्रवेश करतात, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी आपले हात व पाय पाण्याने धुवावे म्हणजे ते मरणार नाहीत आणि जेव्हा ते याहवेहला अन्नार्पण करण्याची सेवा करण्यासाठी वेदीजवळ जातात,
त्यांनी आपले हात व पाय धुवावे म्हणजे ते मरणार नाहीत. हा नियम अहरोन व त्याच्या येणार्या वंशाच्या प्रत्येक पिढीसाठी असावा.”
नंतर मोशेने सभामंडप व वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेवले व धुण्यासाठी त्यात पाणी भरून ठेवले,
आणि मोशे आणि अहरोन व अहरोनाचे पुत्र यांनी आपले हात व पाय धुण्यासाठी त्या पाण्याचा वापर केला.
जेव्हा ते सभामंडपात प्रवेश करीत किंवा वेदीजवळ जात, तेव्हा ते आपले हात व पाय धूत असत, जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते.