circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- लूक ९:४४सुमारे इ.स. ३२
“मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते काळजीपूर्वक ऐका: मानवपुत्राला, मनुष्यांच्या हाती धरून दिले जाणार आहे.”
- लूक ९:४५सुमारे इ.स. ३२
परंतु ते काय म्हणतात हे त्यांना समजले नाही. त्याचे आकलन होऊ नये म्हणून त्यांच्यापासून ते गुप्त ठेवण्यात आले होते आणि या गोष्टींविषयी त्यास विचारण्याची त्यांना भीती वाटली.
- लूक ९:४६सुमारे इ.स. ३२
आपल्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण होईल, याबद्दल शिष्यांमध्ये वादविवाद सुरू झाला.
- लूक ९:४७सुमारे इ.स. ३२
पण येशूंनी, त्यांच्या मनातील विचार ओळखले आणि त्यांनी एका लहान बालकाला आपल्या बाजूला उभे करून,
- लूक ९:४८सुमारे इ.स. ३२
ते शिष्यांना म्हणाले, “जो कोणी या बालकाचा माझ्या नावाने स्वीकार करतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो, तो मला पाठविणार्याचा स्वीकार करतो. जो तुम्हामध्ये सर्वात कनिष्ठ आहे तोच थोर आहे.”
- लूक ९:४९सुमारे इ.स. ३२
योहान म्हणाला, “गुरुजी, आम्ही कोणा एकाला तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले आणि त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला, कारण तो आपल्यापैकी नव्हता.”
- लूक ९:५०सुमारे इ.स. ३२
येशू म्हणाले, “त्याला मना करू नका कारण जो तुमच्याविरुद्ध नाही, तो तुमच्या बाजूचा आहे.”
- लूक ९:५१सुमारे इ.स. ३२
येशूंना स्वर्गात वर घेतले जाण्याची वेळ जवळ आली, तेव्हा ते यरुशलेमकडे ठामपणे निघाले.
- लूक ९:५२सुमारे इ.स. ३२
मग एका शोमरोनी गावात त्यांच्यासाठी तयारी करण्याकरिता त्यांनी आपले संदेशवाहक पुढे पाठविले.
- लूक ९:५३सुमारे इ.स. ३२
परंतु त्या ठिकाणच्या लोकांनी त्यांचे स्वागत केले नाही कारण ते यरुशलेमकडे जात होते.
- लूक ९:५४सुमारे इ.स. ३२
जेव्हा याकोब आणि योहान या शिष्यांनी हे पाहिले, ते म्हणाले, “प्रभूजी, त्या लोकांना भस्म करण्यासाठी आम्ही स्वर्गातून अग्नीची मागणी करावी काय?”
- लूक ९:५५सुमारे इ.स. ३२
परंतु येशूंनी वळून त्यांना धमकाविले.
- लूक ९:५६सुमारे इ.स. ३२
नंतर ते व त्यांचे शिष्य दुसर्या गावाकडे निघून गेले.
- लूक ९:५७सुमारे इ.स. ३२
ते रस्त्याने जात असताना, एका मनुष्याने येशूंना म्हटले, “आपण जिथे कुठे जाल तिथे मी तुमच्यामागे येईन.”
- लूक ९:५८सुमारे इ.स. ३२
येशूंनी उत्तर दिले, “हे लक्षात ठेवा की कोल्ह्यांना बिळे आणि आकाशातील पक्ष्यांना घरटी आहेत, परंतु मानवपुत्राला, डोके टेकण्यासही जागा नाही.”
- लूक ९:५९सुमारे इ.स. ३२
आणखी एका मनुष्याला ते म्हणाले, “माझ्यामागे ये.” परंतु त्याने उत्तर दिले, “प्रभूजी, प्रथम मला माझ्या वडिलांना पुरावयास जाऊ द्या.”
- लूक ९:६०सुमारे इ.स. ३२
येशूंनी त्याला उत्तर दिले, “जे मेलेले आहेत, त्यांना आपल्या मृतांना मूठमाती देऊ दे, परंतु तू जा आणि परमेश्वराच्या राज्याची घोषणा कर.”
- लूक ९:६१सुमारे इ.स. ३२
आणखी एकजण म्हणाला, “प्रभूजी, मी निश्चितच येईन. पण प्रथम माझ्या घरच्या लोकांचा निरोप घेऊ द्या.”
- लूक ९:६२सुमारे इ.स. ३२
पण येशूंनी त्याला सांगितले, “जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो, तो परमेश्वराच्या राज्यास उपयोगी नाही.”
- लूक १०:१सुमारे इ.स. ३२
यानंतर प्रभूने आणखी बाहत्तर शिष्य नेमले आणि त्यांना दोघे दोघे ज्या गावात व ठिकाणात ते जाणार होते तिथे त्यांना आपल्यापुढे पाठविले.
- लूक १०:२सुमारे इ.स. ३२
त्यांनी त्यांना सांगितले, “पीक अमाप आहे, पण कामकरी थोडे आहेत. हंगामाच्या प्रभूने पिकासाठी शेतावर कामकरी पाठवावे म्हणून प्रार्थना करा.
- लूक १०:३सुमारे इ.स. ३२
जा, कोकरांनी लांडग्यांमध्ये जावे त्याप्रमाणे मी तुम्हाला पाठवित आहे.
- लूक १०:४सुमारे इ.स. ३२
पैसे किंवा झोळी किंवा पायतण घेऊ नका आणि रस्त्यात कोणाला सलाम करू नका.
- लूक १०:५सुमारे इ.स. ३२
“ज्यावेळी तुम्ही एखाद्या घरामध्ये प्रवेश कराल, प्रथम, ‘या घरास शांती लाभो’ असे म्हणा.
- लूक १०:६सुमारे इ.स. ३२
जर एखादी शांतिप्रिय व्यक्ती तिथे असेल तर तुमची शांती त्यांच्यावर राहील; नसेल तर ती तुम्हाकडे परत येईल.