circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- लूक १०:३२सुमारे इ.स. ३२
त्याचप्रमाणे एक लेवी आला, त्याने त्याला पाहिले, पण तो तसाच पुढे गेला.
- लूक १०:३३सुमारे इ.स. ३२
नंतर एक शोमरोनी, प्रवास करीत जिथे तो होता तिथे आला आणि त्याला पाहून त्याचा कळवळा आला.
- लूक १०:३४सुमारे इ.स. ३२
त्याच्याजवळ जाऊन त्या मनुष्याने त्याच्या जखमांना तेल व द्राक्षारस लावून पट्ट्या बांधल्या. त्याला आपल्या गाढवावर बसवून तो एका उतारशाळेत आला आणि त्याने त्याची सेवा केली.
- लूक १०:३५सुमारे इ.स. ३२
दुसर्या दिवशी त्याने उतारशाळेच्या मालकाला चांदीची दोन नाणी देऊन सांगितले, ‘या माणसाची काळजी घ्या,’ आणि ‘मी परत येईन, त्यावेळी जास्त खर्च झाला असेल तर त्याची भरपाई करेन.’
- लूक १०:३६सुमारे इ.स. ३२
“आता या तिघांपैकी चोरांच्या हाती सापडलेल्या मनुष्याचा शेजारी कोण होता असे तुला वाटते?”
- लूक १०:३७सुमारे इ.स. ३२
त्या नियमशास्त्रज्ञाने उत्तर दिले, “ज्याने त्याला दया दाखविली, तोच.” यावर येशू त्याला म्हणाले, “जा आणि असेच कर.”
- लूक १०:३८सुमारे इ.स. ३२
येशू आणि त्यांचे शिष्य त्यांच्या मार्गाने जात असताना एका नगरात आले तिथे मार्था नावाच्या एका स्त्रीने आपल्या घरी त्यांचे स्वागत केले.
- लूक १०:३९सुमारे इ.स. ३२
तिला मरीया नावाची एक बहीण होती. ती प्रभूच्या चरणाजवळ बसून त्यांचे शब्द ऐकत होती.
- लूक १०:४०सुमारे इ.स. ३२
तरी सर्व गोष्टींची तयारी करताना मार्था कंटाळून गेली आणि प्रभूला म्हणाली, “प्रभूजी, माझ्या बहिणीने कामाचा भार माझ्या एकटीवरच टाकला आहे, याची तुम्हाला काळजी नाही काय? तिला मला मदत करावयास सांगा.”
- लूक १०:४१सुमारे इ.स. ३२
पण प्रभू तिला म्हणाले, “मार्था, मार्था, तू उगाच पुष्कळ गोष्टींची काळजी करीत असते.
- लूक १०:४२सुमारे इ.स. ३२
परंतु वास्तविक, केवळ एकाच गोष्टीची गरज आहे. मरीयेने चांगला वाटा निवडून घेतला आहे तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.”
- लूक ११:१सुमारे इ.स. ३३
एके दिवशी येशू एका ठिकाणी प्रार्थना करीत होते. प्रार्थना संपल्यावर त्यांच्या शिष्यांपैकी एकाने त्यांना म्हटले, “प्रभूजी, योहानाने जशी त्याच्या शिष्यांना प्रार्थना करावयास शिकविले, त्याप्रमाणे तुम्हीही आम्हास शिकवा.”
- लूक ११:२सुमारे इ.स. ३३
येशूंनी शिष्यांना सांगितले, “अशा रीतीने प्रार्थना करा: “ ‘हे पित्या, तुमचे नाव पवित्र मानिले जावो; तुमचे राज्य येवो.
- लूक ११:३सुमारे इ.स. ३३
आमची रोजची भाकर प्रतिदिनी आम्हाला द्या.
- लूक ११:४सुमारे इ.स. ३३
कारण जशी आम्ही आमच्या अपराध्यांस क्षमा करतो; तशी तुम्ही आमच्या पापांची क्षमा करा आम्हास परीक्षेत आणू नका.’ ”
- लूक ११:५सुमारे इ.स. ३३
येशू त्यांना म्हणाले, “समजा तुमचा एक मित्र आहे, मध्यरात्री तुम्ही त्याच्याकडे जाऊन म्हणता, ‘मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे;
- लूक ११:६सुमारे इ.स. ३३
माझा मित्र प्रवास करून घरी आला आहे, पण त्याला वाढण्यासाठी माझ्याजवळ काहीच नाही.’
- लूक ११:७सुमारे इ.स. ३३
समजा तुमचा मित्र आतून उत्तर देईल, ‘मला त्रास देऊ नको. दार बंद झाले आहे आणि मी व माझी मुले अंथरुणात आहोत आणि आता मी उठून तुला काही देऊ शकत नाही.’
- लूक ११:८सुमारे इ.स. ३३
परंतु मी तुम्हाला सांगतो की, जरी मैत्रीमुळे तो उठून त्याला भाकर देणार नाही, तरी तुमच्या आग्रहामुळे तो नक्कीच उठेल आणि जितकी तुमची गरज आहे तितके तो तुम्हाला देईल.
- लूक ११:९सुमारे इ.स. ३३
“मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, दार ठोका म्हणजे ते उघडले जाईल.
- लूक ११:१०सुमारे इ.स. ३३
कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल, जो कोणी शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोकतो, त्याच्यासाठी दार उघडले जाईल.
- लूक ११:११सुमारे इ.स. ३३
“तुमच्यातील कोण असे वडील आहेत, जर तुमच्या मुलाने तुमच्याजवळ मासा मागितला, तर तुम्ही त्याला साप द्याल?
- लूक ११:१२सुमारे इ.स. ३३
किंवा जर त्याने अंडे मागितले, तर त्याला विंचू द्याल?
- लूक ११:१३सुमारे इ.स. ३३
तर तुम्ही दुष्ट असताना तुमच्या लेकरांना चांगल्या देणग्या देण्याचे तुम्हाला समजते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात, त्यांना ते कितीतरी विपुलतेने पवित्र आत्मा देणार!”
- लूक ११:१४सुमारे इ.स. ३३
येशू एका मुक्या दुरात्म्याला काढत होते, तो दुरात्मा निघून गेल्यानंतर, त्या मुक्या मनुष्याला बोलता येऊ लागले. ते पाहून गर्दीतील लोक आश्चर्यचकित झाले.