मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लूक ११:४०सुमारे इ.स. ३३

    अहो मूर्ख लोकांनो! ज्याने बाहेरील भाग घडविला त्यानेच अंतर्भाग सुद्धा घडविला नाही काय?

  2. लूक ११:४१सुमारे इ.स. ३३

    तुमच्या अंतर्भागाबद्धल बोलायचे तर गरिबांना उदारता दाखवा म्हणजे तुम्हाला सर्वकाही शुद्ध असल्याचे आढळेल.

  3. लूक ११:४२सुमारे इ.स. ३३

    “तुम्हा परूश्यांना धिक्कार असो! तुम्ही पुदिना, शेपू व बागेतील प्रत्येक प्रकारची भाजी यांचा दशांश देत असला, तरी तुम्ही न्याय आणि परमेश्वराची प्रीती याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही दशांश निश्चितच द्यावा, पण ज्या अधिक महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सोडू नयेत.

  4. लूक ११:४३सुमारे इ.स. ३३

    “अहो परूश्यांनो, तुम्हाला धिक्कार असो! कारण भरबाजारात लोकांकडून मुजरे घेणे व सभागृहामध्ये प्रमुख जागेवर बसणे हे तुम्हाला प्रिय आहे.

  5. लूक ११:४४सुमारे इ.स. ३३

    “तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही खुणा नसलेल्या कबरांसारखे आहात, लोकांना त्यावरून चालताना त्यांना माहीत होत नाही.”

  6. लूक ११:४५सुमारे इ.स. ३३

    त्यावेळी तिथे असलेला एक नियमशास्त्रज्ञ म्हणाला, “गुरुजी, तुम्ही आता जे बोलला, त्यामुळे तुम्ही आमचा सुद्धा अपमान करीत आहात.”

  7. लूक ११:४६सुमारे इ.स. ३३

    येशूंनी उत्तर दिले, “आणि तुम्ही जे नियमशास्त्रतज्ञ आहात, त्या तुम्हाला धिक्कार असो, कारण तुम्ही लोकांच्या खांद्यावर अशी अवघड ओझी लादता, जी ते वाहू शकत नाहीत, परंतु त्यांना मदत करण्यासाठी स्वतःचे एकही बोट लावण्याची तुमची इच्छा नसते.

  8. लूक ११:४७सुमारे इ.स. ३३

    “तुम्हाला धिक्कार असो! कारण तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता ज्यांना तुमच्या पूर्वजांनी मारून टाकले.

  9. लूक ११:४८सुमारे इ.स. ३३

    म्हणून तुमच्या पूर्वजांनी जे काही केले ते योग्यच होते अशी तुम्ही साक्ष देत आहात; त्यांनी संदेष्ट्यांचा वध केला आणि तुम्ही त्यांच्या कबरा बांधता.

  10. लूक ११:४९सुमारे इ.स. ३३

    याकारणास्तव परमेश्वर त्यांच्या ज्ञानाप्रमाणे म्हणतात, ‘मी तुमच्याकडे संदेष्टे व प्रेषित पाठवेन आणि त्यांच्यापैकी काहींचा तुम्ही वध कराल आणि इतरांचा छळ कराल.’

  11. लूक ११:५०सुमारे इ.स. ३३

    म्हणून जगाच्या प्रारंभापासून सर्व संदेष्ट्यांचे जे रक्त सांडण्यात आले, त्याबद्दल या पिढीला जबाबदार धरले जाईल.

  12. लूक ११:५१सुमारे इ.स. ३३

    हाबेलाच्या रक्तापासून तर जखर्‍याहच्या रक्तापर्यंत जो मंदिर आणि वेदी यांच्यामध्ये वधला गेला होता. त्याबद्दल या पिढीला जबाबदार धरले जाईल हे मी तुम्हाला सांगतो.

  13. लूक ११:५२सुमारे इ.स. ३३

    “तुम्हा नियमशास्त्र तज्ञांना धिक्कार असो, कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली काढून घेतली. तुम्ही स्वतः प्रवेश करत नाही व जे प्रवेश करू पाहतात त्यांनाही अडखळण करता.”

  14. लूक ११:५३सुमारे इ.स. ३३

    येशू बाहेर गेल्यानंतर, परूशी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी त्यांना उग्रपणाने विरोध करण्यास सुरुवात केली आणि त्यांना घेराव घालून त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.

  15. लूक ११:५४सुमारे इ.स. ३३

    त्यांना शब्दात धरण्याची ते संधी शोधू लागले.

  16. लूक १२:१सुमारे इ.स. ३३

    त्या दरम्यान हजारोंच्या संख्येने लोक एकत्र झाले त्यामुळे ते एकमेकास चेंगरू लागले. तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांना म्हणाले, “या परूशी लोकांच्या खमिरापासून म्हणजे ढोंगीपणापासून सांभाळा.

  17. लूक १२:२सुमारे इ.स. ३३

    जे प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही किंवा जे गुप्त आहे ते उघडकीस येणार नाही.

  18. लूक १२:३सुमारे इ.स. ३३

    जे तुम्ही अंधारात सांगितले आहे, ते दिवसाच्या प्रकाशात ऐकले जाईल; जे तुम्ही आतील खोलीत कानात सांगितले, ते घराच्या धाब्यावरून जाहीर केले जाईल.

  19. लूक १२:४सुमारे इ.स. ३३

    “माझ्या मित्रांनो, जे शरीराचा नाश करतात व त्यानंतर काही करण्यास समर्थ नाहीत अशांना भिऊ नका.

  20. लूक १२:५सुमारे इ.स. ३३

    कोणाचे भय बाळगावे, हे मी तुम्हाला सांगतो: शरीराचा वध केल्यानंतर, नरकात टाकण्याचा ज्याला अधिकार आहे, त्याची भीती बाळगा. होय, मी सांगतो त्याचीच भीती बाळगा.

  21. लूक १२:६सुमारे इ.स. ३३

    पाच चिमण्या दोन पैशात विकत नाहीत काय? तरी त्यापैकी एकही चिमणीचा परमेश्वराला विसर पडत नाही.

  22. लूक १२:७सुमारे इ.स. ३३

    खरोखर, तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. म्हणून भीती बाळगू नका; कारण तुम्ही पुष्कळ चिमण्यांपेक्षा अधिक मोलवान आहात.

  23. लूक १२:८सुमारे इ.स. ३३

    “मी तुम्हाला सांगतो, की जर कोणी मला इतरांपुढे जाहीरपणे स्वीकारेल, तर मानवपुत्र सुद्धा देवदूतांसमक्ष जाहीरपणे तुमचा स्वीकार करेन.

  24. लूक १२:९सुमारे इ.स. ३३

    तरी जे मला लोकांसमोर नाकारतात, त्यांना मी परमेश्वराच्या दूतांसमक्ष नाकारीन.

  25. लूक १२:१०सुमारे इ.स. ३३

    आणि प्रत्येकजण जो मानवपुत्राच्या विरुद्ध बोलेल त्याला क्षमा होईल, परंतु जे कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतात त्यांना कधीही क्षमा केली जाणार नाही.