मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लूक १२:११सुमारे इ.स. ३३

    “ज्यावेळी तुम्हाला सभागृह, पुढारी, राज्यकर्ते यांच्यापुढे आणण्यात येईल, तेव्हा तुम्ही स्वतःचा बचाव कसा करावा व काय बोलावे याविषयी चिंता करू नका.

  2. लूक १२:१२सुमारे इ.स. ३३

    कारण तुम्ही तिथे उभे असताना, काय बोलावे हे पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल.”

  3. लूक १२:१३सुमारे इ.स. ३३

    तेवढ्यात समुदायामधून एकजण म्हणाला, “गुरुजी, माझ्या भावाला मजबरोबर वतनाची विभागणी करण्यास सांगा.”

  4. लूक १२:१४सुमारे इ.स. ३३

    परंतु येशूंनी त्याला उत्तर दिले, “मला न्यायनिवाडा करण्यासाठी कोणी तुम्हावर न्यायाधीश नेमले?”

  5. लूक १२:१५सुमारे इ.स. ३३

    नंतर येशू त्यांना म्हणाले, “सावध राहा, सर्वप्रकारच्या लोभापासून दूर राहा, कारण पुष्कळ धनसंपत्ती मध्ये जीवन नसते.”

  6. लूक १२:१६सुमारे इ.स. ३३

    नंतर येशूंनी एक दाखला सांगितला: “एका श्रीमंत माणसाच्या शेतामध्ये भरपूर पीक आले.

  7. लूक १२:१७सुमारे इ.स. ३३

    तो मनाशी विचार करू लागला, ‘मी काय करू? माझ्याजवळ धान्य ठेवावयास जागा नाही.’

  8. लूक १२:१८सुमारे इ.स. ३३

    “तो म्हणाला, ‘मी असे करतो. मी माझी सगळी कोठारे पाडून टाकेन आणि यापेक्षाही मोठी बांधेन, म्हणजे मला धान्य साठविता येईल.

  9. लूक १२:१९सुमारे इ.स. ३३

    आणि मी स्वतःस म्हणेन, “पुढे अनेक वर्षे पुरेल एवढ्या धान्यांचा तुझ्याकडे साठा आहे. आता विसावा घे; खा, पी आणि आनंद कर.” ’

  10. लूक १२:२०सुमारे इ.स. ३३

    “पण परमेश्वर त्याला म्हणाले, ‘अरे मूर्खा! आज रात्रीच जर तुझा जीव मागितला गेला तर; जे सर्व तू स्वतःसाठी तयार केले आहे ते कोणाचे होईल?’

  11. लूक १२:२१सुमारे इ.स. ३३

    “परमेश्वराच्या मोलवान आशीर्वादांची संपत्ती मिळविण्याऐवजी, जो मनुष्य स्वतःसाठी द्रव्याचा नुसता संचय करतो, त्याचीही अशीच गत होणार आहे.”

  12. लूक १२:२२सुमारे इ.स. ३३

    तेव्हा येशू त्यांच्या शिष्यांना म्हणाले: “मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काय खावे अशी तुमच्या जिवाबद्दल किंवा तुम्ही काय पांघरावे अशी तुमच्या शरीराबद्दल चिंता करू नका.

  13. लूक १२:२३सुमारे इ.स. ३३

    अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रांपेक्षा शरीर अधिक महत्त्वाचे नाही काय?

  14. लूक १२:२४सुमारे इ.स. ३३

    कावळ्यांचा विचार करा; ते धान्य पेरीत नाही, कापणी करीत नाही, त्यांच्याकडे कोठार वा भांडार नसते, तरीही परमेश्वर त्यांना खायला घालतात आणि तुम्ही तर पक्ष्यांपेक्षा कितीतरी अधिक मोलवान आहात!

  15. लूक १२:२५सुमारे इ.स. ३३

    शिवाय काळजी करून आयुष्यातील एक तास तरी कोणास वाढविता येईल काय?

  16. लूक १२:२६सुमारे इ.स. ३३

    तुम्ही साध्या गोष्टी देखील करू शकत नाही तर इतर गोष्टीबद्दल काळजी का करता?

  17. लूक १२:२७सुमारे इ.स. ३३

    “रानातील फुले कशी वाढतात याचा विचार करा. ती कष्ट करीत नाहीत किंवा कातीत नाहीत. तरी मी तुम्हाला सांगतो की शलोमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्याइतका नटला नव्हता.

  18. लूक १२:२८सुमारे इ.स. ३३

    जे आज आहे आणि उद्या अग्नीत टाकले जाते, त्या गवताला जर परमेश्वर असा पोशाख घालतात, तर अहो अल्पविश्वासी, ते तुम्हाला किती विशेषकरून पोशाख घालतील!

  19. लूक १२:२९सुमारे इ.स. ३३

    तसेच, काय खावे, काय प्यावे याविषयी आपल्या मनात मुळीच काळजी करू नका.

  20. लूक १२:३०सुमारे इ.स. ३३

    कारण परकीय लोक या गोष्टींच्या मागे लागतात, पण तुम्हाला या गोष्टींची गरज आहे, हे तुमच्या पित्याला माहीत आहे.

  21. लूक १२:३१सुमारे इ.स. ३३

    परंतु तुम्ही त्यांचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे या सर्व गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतील.

  22. लूक १२:३२सुमारे इ.स. ३३

    “हे लहान कळपा, तू भिऊ नकोस कारण तुम्हाला राज्य देण्यास पित्याला आनंद होतो.

  23. लूक १२:३३सुमारे इ.स. ३३

    तुमची मालमत्ता विका आणि गरिबांना द्या. कधीही जीर्ण होणार नाही अशा पिशव्या स्वतःसाठी घ्या, वर स्वर्गामध्ये नष्ट न होणारा खजिना ठेवा, जिथे कोणी चोर येणार नाही की त्याला कसरही लागणार नाही.

  24. लूक १२:३४सुमारे इ.स. ३३

    कारण जिथे तुमची संपत्ती आहे, तिथे तुमचे मनही असेल.

  25. लूक १२:३५सुमारे इ.स. ३३

    “तुम्ही सेवेसाठी सज्ज व्हा व आपले दिवे जळत राहू द्या,