मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लूक ८:५०सुमारे इ.स. ३१

    हे ऐकताच येशू याईराला म्हणाले, “भिऊ नकोस, फक्त विश्वास ठेव आणि ती बरी होईल.”

  2. लूक ८:५१सुमारे इ.स. ३१

    याईराच्या घरी पोहोचल्यावर, येशूंनी पेत्र, याकोब, योहान आणि त्या मुलीचे आईवडील यांच्याशिवाय इतर कोणालाही आत येऊ दिले नाही.

  3. लूक ८:५२सुमारे इ.स. ३१

    ते घर शोक करणार्‍या लोकांनी भरून गेले होते. पण येशू त्यांना म्हणाले, “रडणे थांबवा. ही मुलगी मरण पावली नाही, पण झोपली आहे.”

  4. लूक ८:५३सुमारे इ.स. ३१

    तेव्हा ते त्यांना हसू लागले, कारण ती मेली होती, हे त्या सर्वांना माहीत होते.

  5. लूक ८:५४सुमारे इ.स. ३१

    मग येशूंनी तिचा हात धरून तिला म्हटले, “माझ्या मुली ऊठ!”

  6. लूक ८:५५सुमारे इ.स. ३१

    त्यावेळी तिचा प्राण परत आला आणि ती तत्काळ उठून उभी राहिली. तेव्हा येशू म्हणाले, “तिला काहीतरी खावयास द्या.”

  7. लूक ८:५६सुमारे इ.स. ३१

    तिचे आईवडील विस्मित झाले, परंतु येशूंनी त्यांना निक्षून सांगितले, “जे घडले, ते कोणालाही सांगू नका.”

  8. जेव्हा येशूंनी त्यांच्या बारा जणांना एकत्र बोलाविले, तेव्हा त्यांना दुरात्म्यांना घालवून देण्याचा आणि प्रत्येक रोग व आजार बरे करण्याचा अधिकार दिला.

  9. नंतर त्यांनी आपल्या बारा शिष्यांना परमेश्वराच्या राज्याची घोषणा करण्यास व आजार्‍यांना बरे करण्यास पाठविले.

  10. येशूंनी त्यांना सांगितले, “प्रवासाला जाताना काठी, झोळी, अन्न किंवा पैसे, अतिरिक्त अंगरखा असे काहीही घेऊ नका,

  11. एखाद्या घरामध्ये प्रवेश कराल, तेव्हा ते गाव सोडेपर्यंत तिथेच राहा.

  12. जर एखाद्या गावातील लोकांनी तुमचे स्वागत केले नाही, तर त्या गावातून बाहेर पडा आणि तुमच्या पायांची धूळ तिथेच झटकून टाका, ही त्यांच्याविरुद्ध साक्ष राहील.”

  13. त्याप्रमाणे शिष्य शुभवार्ता गाजवीत आणि सर्वत्र आजार्‍यांना बरे करीत गावोगाव फिरू लागले.

  14. लूक ९:७सुमारे इ.स. ३२

    येशूंबद्दल शासक हेरोदाने सर्वकाही ऐकले. तेव्हा तो घोटाळ्यात पडला. कारण काही लोक म्हणत होते, “हा बाप्तिस्मा करणारा योहान पुन्हा जिवंत झाला आहे.”

  15. लूक ९:८सुमारे इ.स. ३२

    आणखी दुसरे म्हणत होते की एलीयाह प्रकट झाला आहे, तर आणखी काही प्राचीन संदेष्ट्यांपैकी एक संदेष्टा मृतातून उठून उदय पावला आहे असे म्हणत होते.

  16. लूक ९:९सुमारे इ.स. ३२

    पण हेरोद म्हणाला, “मी तर योहानाचा शिरच्छेद केला होता, मग हा मनुष्य कोण ज्याच्याबद्दल मी ऐकत आहे?” आणि तो येशूंना भेटण्याचा प्रयत्न करू लागला.

  17. लूक ९:१०सुमारे इ.स. ३२

    नंतर प्रेषित परत आले आणि आपण काय केले याचा सर्व वृतांत त्यांनी सादर केला, येशू त्यांना घेऊन बेथसैदा या शहराकडे एकांतस्थळी गेले.

  18. लूक ९:११सुमारे इ.स. ३२

    परंतु समुदायाला हे कळले व ते त्यांच्यामागे गेले. येशूंनी त्यांचे स्वागत केले व त्यांना परमेश्वराच्या राज्याविषयी शिक्षण दिले आणि बरे होण्याची ज्यांना गरज होती त्यांना बरे केले.

  19. लूक ९:१२सुमारे इ.स. ३२

    दुपार टळल्यानंतर बारा शिष्य त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, “लोकांना पाठवून द्या म्हणजे ते आजूबाजूच्या खेड्यांमध्ये व गावांमध्ये जातील आणि त्यांच्या खाण्याची व राहण्याची व्यवस्था करतील, कारण आपण येथे निर्जन ठिकाणी आहोत.”

  20. लूक ९:१३सुमारे इ.स. ३२

    त्यांनी उत्तर दिले, “तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.” यावर ते म्हणाले, “आमच्याजवळ केवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत—या सर्व लोकांस पुरेल इतके अन्न आम्ही जाऊन विकत आणले तरच हे शक्य आहे”

  21. लूक ९:१४सुमारे इ.स. ३२

    तिथे पुरुषांचीच संख्या अंदाजे पाच हजार होती. येशू शिष्यांना म्हणाले, “अंदाजे पन्नास लोक अशाप्रकारे गटागटाने त्यांना खाली बसावयास सांगा.”

  22. लूक ९:१५सुमारे इ.स. ३२

    तेव्हा शिष्यांनी त्याप्रमाणे केले आणि सर्व लोक खाली बसले.

  23. लूक ९:१६सुमारे इ.स. ३२

    येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले आणि स्वर्गाकडे पाहून आभार मानले आणि त्या भाकरीचे तुकडे केले. नंतर त्यांनी ते शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले.

  24. लूक ९:१७सुमारे इ.स. ३२

    ते सर्वजण जेवले आणि तृप्त झाले आणि शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या बारा टोपल्या उचलल्या.

  25. लूक ९:१८सुमारे इ.स. ३२

    एकदा येशू एकटेच प्रार्थना करीत होते आणि त्यांचे शिष्य जवळच होते. येशूंनी त्यांना विचारले, “मी कोण आहे म्हणून लोकसमुदाय मला ओळखतात?”