मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लूक ७:५०सुमारे इ.स. ३१

    येशू त्या स्त्रीला म्हणाले, “तुझ्या विश्वासाने तुझे तारण झाले आहे; शांतीने जा.”

  2. लूक ८:१सुमारे इ.स. ३१

    यानंतर येशूंनी एका शहरातून दुसर्‍या शहरात आणि गावोगावी प्रवास करीत परमेश्वराच्या राज्याच्या शुभवार्तेची घोषणा केली. त्यांचे बारा शिष्य त्यांच्याबरोबर होते,

  3. लूक ८:२सुमारे इ.स. ३१

    काही स्त्रियांमधून त्यांनी दुरात्मे काढले, काहींना रोगमुक्त केले होते, मरीया मग्दालिया जिच्यामधून त्यांनी सात भुते काढली होती;

  4. लूक ८:३सुमारे इ.स. ३१

    हेरोदाचा घरगुती कारभारी खुजा, त्याची पत्नी योहान्ना, सुसान्ना व इतर अनेक स्त्रिया, स्वतःच्या मिळकतीतून त्यांना मदत करीत असत.

  5. लूक ८:४सुमारे इ.स. ३१

    लोकांची मोठी गर्दी होत होती आणि वेगवेगळ्या गावांमधून लोक येशूंकडे येत होते, त्यावेळेस त्यांनी हा दाखला सांगितला:

  6. लूक ८:५सुमारे इ.स. ३१

    “एक शेतकरी बी पेरण्याकरिता निघाला. तो बी पेरीत असताना, काही वाटेवर पडले; व तुडविले गेले व आकाशातील पक्ष्यांनी ते खाऊन टाकले.

  7. लूक ८:६सुमारे इ.स. ३१

    काही बी खडकाळ जमिनीवर पडले, ते वर आले, परंतु ओलाव्याच्या अभावी ती रोपे करपून गेली.

  8. लूक ८:७सुमारे इ.स. ३१

    काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले, ते उगवले आणि त्याबरोबर वाढले, पण झुडपांनी त्याची वाढ खुंटविली.

  9. लूक ८:८सुमारे इ.स. ३१

    काही बी सुपीक जमिनीत पडले. ते उगवले आणि जेवढे पेरले होते, त्यापेक्षा शंभरपट पीक आले.” हे सांगून ते म्हणाले, “ज्याला ऐकावयास कान आहेत, त्यांनी ऐकावे.”

  10. लूक ८:९सुमारे इ.स. ३१

    त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारले, “या दाखल्याचा अर्थ काय आहे?”

  11. लूक ८:१०सुमारे इ.स. ३१

    तेव्हा येशूंनी उत्तर दिले, “परमेश्वराच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचे ज्ञान तुम्हाला दिलेले आहे, परंतु दुसर्‍यांना दाखल्याद्वारेच सांगण्यात येईल,” ते यासाठी की, “ ‘ते पाहत असले तरी त्यांना दिसू नये, ते कानांनी ऐकत असले, तरी त्यांना समजू नये.’

  12. लूक ८:११सुमारे इ.स. ३१

    “या दाखल्याचा अर्थ असा आहे: बी हे परमेश्वराचे वचन आहे.

  13. लूक ८:१२सुमारे इ.स. ३१

    पायवाटेवर पडलेले ते, जे वचन ऐकतात, पण सैतान येतो आणि पेरलेले वचन हृदयातून हिरावून नेतो आणि त्यामुळे त्यांना विश्वास ठेवण्याची व तारणाची संधी मिळत नाही.

  14. लूक ८:१३सुमारे इ.स. ३१

    खडकाळ जमिनीसारखे असलेले ते हे, जे वचन आनंदाने स्वीकारतात, पण त्यांना मूळ नसल्यामुळे ते किंचितकाळ विश्वास ठेवतात, परंतु परीक्षा आली म्हणजे ते पडतात.

  15. लूक ८:१४सुमारे इ.स. ३१

    काटेरी झाडांमध्ये काही बी पडले, ते असे आहेत की जे ऐकतात, परंतु जीवन जगतांना, जीवनातील काळजी, पैसा, सुखविलास यामुळे त्यांची वाढ खुंटते व ते परिपक्व होत नाहीत;

  16. लूक ८:१५सुमारे इ.स. ३१

    काही बी उत्तम जमिनीत पडते, ते प्रामाणिक व चांगल्या अंतःकरणाच्या लोकांचे प्रतीक आहे, जे परमेश्वराचे वचन ऐकतात व धरून राहतात आणि धीराने पीक देतात.

  17. लूक ८:१६सुमारे इ.स. ३१

    “कोणी दिवा लावून मातीच्या भांड्याखाली मापाखाली किंवा खाटेखाली ठेवीत नाही! जे आत येणारे आहेत त्यांना दिव्याचा प्रकाश मिळावा म्हणून दिवठणीवर ठेवतात.

  18. लूक ८:१७सुमारे इ.स. ३१

    कारण जे प्रकट होणार नाही असे काही लपलेले नाही किंवा जे उघडकीस येणार नाही व कळणार नाही असे काही गुप्त नाही.

  19. लूक ८:१८सुमारे इ.स. ३१

    यास्तव तुम्ही कसे ऐकता याविषयी काळजी घ्या. ज्यांच्याजवळ आहे त्यांना अधिक दिले जाईल; ज्यांच्याजवळ नाही, जे त्यांच्याजवळ आहे असे त्यांना वाटते ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल.”

  20. लूक ८:१९सुमारे इ.स. ३१

    एकदा येशूंची आई आणि भाऊ त्यांना भेटावयास आले, पण गर्दीमुळे त्यांच्याजवळ त्यांना जाता येईना.

  21. लूक ८:२०सुमारे इ.स. ३१

    कोणी त्यांना सांगितले, “तुमची आई आणि तुमचे भाऊ बाहेर थांबले आहेत व आपल्याला भेटू इच्छित आहेत.”

  22. लूक ८:२१सुमारे इ.स. ३१

    तेव्हा ते म्हणाले, “जो कोणी परमेश्वराचे वचन ऐकतो व त्यानुसार आचरण करतो, तोच माझा भाऊ व बहीण आणि माझी आई.”

  23. लूक ८:२२सुमारे इ.स. ३१

    एके दिवशी येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ.” ते व त्यांचे शिष्य होडीत बसून निघाले.

  24. लूक ८:२३सुमारे इ.स. ३१

    ते जात असताना येशू होडीत झोपी गेले आणि सरोवरात भयंकर वादळ आले व होडी बुडू लागली आणि ते मोठ्या संकटात सापडले.

  25. लूक ८:२४सुमारे इ.स. ३१

    तेव्हा शिष्यांनी त्यांना उठविले आणि ते त्यांना म्हणाले, “गुरुजी, गुरुजी, आपण सर्वजण बुडत आहोत.” ते उठले आणि त्यांनी वार्‍याला व लाटांना धमकाविले व वादळ थांबले आणि सर्वकाही शांत झाले.