मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लूक ७:२५सुमारे इ.स. ३१

    जर नाही, तर मग काय पाहावयाला तुम्ही गेला होता? किमती पोशाख घातलेला एखादा पुरुष काय? नाही. भारी पोशाख घालणारे व सुखविलासातील लोक राजवाड्यात राहतात.

  2. लूक ७:२६सुमारे इ.स. ३१

    परंतु तुम्ही काय पाहावयास गेला होता? संदेष्टा? होय, मी तुम्हाला सांगतो, संदेष्ट्यापेक्षाही अधिक.

  3. लूक ७:२७सुमारे इ.स. ३१

    हा तोच आहे ज्याच्याविषयी लिहिले आहे: “मी माझा संदेष्टा तुझ्यापुढे पाठवेन आणि, तो तुझा मार्ग तुझ्यापुढे सिद्ध करेल,

  4. लूक ७:२८सुमारे इ.स. ३१

    मी तुम्हाला सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्या व्यक्तीमध्ये योहानापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. तरीपण परमेश्वराच्या राज्यामध्ये जो कनिष्ठ आहे, तो त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे.”

  5. लूक ७:२९सुमारे इ.स. ३१

    जकातदारांसह सर्व लोकांनी येशूंचे हे शब्द ऐकले. परमेश्वराचे मार्ग न्याय्य आहेत, हे त्यांनी योहानाकडून पूर्वीच बाप्तिस्मा घेऊन मान्य केले होते.

  6. लूक ७:३०सुमारे इ.स. ३१

    तरी, परूशी आणि नियमशास्त्रज्ञांनी त्यांच्याबद्दल असलेला परमेश्वराचा संकल्प धुडकावून लावला होता व योहानाकडून बाप्तिस्मा घेतला नाही.

  7. लूक ७:३१सुमारे इ.स. ३१

    येशू पुढे बोलत राहिले, “तर मग काय, या पिढीच्या लोकांची तुलना मी कशाशी करू? ते कोणासारखे आहेत?”

  8. लूक ७:३२सुमारे इ.स. ३१

    लहान मुलांसारखी ही पिढी आहे. ते बाजारात बसून इतरांना हाक मारतात: “ ‘आम्ही तुमच्यासाठी बासरी वाजविली, तरी तुम्ही नाचला नाही; आम्ही शोकगीत गाईले, तरी तुम्ही रडला नाही.’

  9. लूक ७:३३सुमारे इ.स. ३१

    कारण योहान भाकरी खात नसे किंवा द्राक्षारस पीत नसे आणि तुम्ही म्हणता, ‘त्याला दुरात्म्याने पछाडले आहे.’

  10. लूक ७:३४सुमारे इ.स. ३१

    मनुष्याचा पुत्र खातपीत आला आणि तुम्ही म्हणता, ‘पाहा, हा खादाड आणि मद्यपी मनुष्य! जकातदार आणि पापी लोकांचा मित्र!’

  11. लूक ७:३५सुमारे इ.स. ३१

    परंतु ज्ञान आपल्या मुलांच्या योगे न्यायी ठरते.”

  12. लूक ७:३६सुमारे इ.स. ३१

    एका परूश्याने येशूंना आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रण दिले व येशूंनी ते स्वीकारले. ते भोजनास बसले असताना,

  13. लूक ७:३७सुमारे इ.स. ३१

    येशू परूश्याच्या घरी भोजनास गेले आहेत हे ऐकून, त्या नगरातील एक पापी स्त्री मोलवान सुगंधी तेलाने भरलेली एक संगमरवरी कुपी घेऊन तिथे आली.

  14. लूक ७:३८सुमारे इ.स. ३१

    आत जाऊन ती येशूंच्या मागे उभी राहिली व रडू लागली आणि आपल्या अश्रूंनी त्यांचे पाय भिजवू लागली. मग तिने ते आपल्या केसांनी पुसले. त्यांच्या पायांची चुंबने घेतली आणि सुगंधी तेल त्यावर ओतले.

  15. लूक ७:३९सुमारे इ.स. ३१

    ज्या परूश्याने येशूंना भोजनाचे आमंत्रण दिले होते, त्याने हे पाहिले तेव्हा तो मनाशीच म्हणाला, “यावरूनच येशू संदेष्टा नाहीत हे सिद्ध होते, कारण परमेश्वराने त्यांना खरोखरच पाठविले असते, तर ही स्त्री पापी आहे हे त्यांना समजले असते.”

  16. लूक ७:४०सुमारे इ.स. ३१

    येशू त्या परूश्याला म्हणाले, “शिमोना, मला तुला काहीतरी सांगावयाचे आहे.” शिमोन म्हणाला, “गुरुजी बोला.”

  17. लूक ७:४१सुमारे इ.स. ३१

    तेव्हा येशूंनी त्याला एक दाखला सांगितला: “एका सावकाराने दोन माणसांना कर्ज दिले, एकाला चांदीची पाचशे नाणी आणि दुसर्‍याला चांदीची पन्नास नाणी.

  18. लूक ७:४२सुमारे इ.स. ३१

    परंतु त्यापैकी एकालाही त्याची परतफेड करता आली नाही. तेव्हा त्याने दोघांचेही कर्ज माफ केले. आता या दोघांपैकी कोणाला त्याच्याबद्दल अधिक प्रीती वाटेल?”

  19. लूक ७:४३सुमारे इ.स. ३१

    “ज्याचे अधिक कर्ज माफ झाले त्याला” शिमोनाने उत्तर दिले. येशू म्हणाले, “तू बरोबर न्याय केला आहेस.”

  20. लूक ७:४४सुमारे इ.स. ३१

    नंतर ते त्या स्त्रीकडे वळाले आणि शिमोनाला म्हणाले, “तू ही स्त्री पाहिली का? मी तुझ्या घरात आलो. माझे पाय धुण्यासाठी तू मला पाणी दिले नाहीस, परंतु तिने माझे पाय तिच्या अश्रूंनी भिजविले आणि तिच्या केसांनी ते पुसले.

  21. लूक ७:४५सुमारे इ.स. ३१

    तू मला चुंबन दिले नाहीस. परंतु मी आत आलो तेव्हापासून हिने माझ्या पायांचे चुंबन घेणे थांबविले नाही.

  22. लूक ७:४६सुमारे इ.स. ३१

    तू माझ्या डोक्यावर तेल लावले नाहीस, परंतु हिने तर माझ्या पायांवर सुगंधी अत्तर ओतून दिले आहे.

  23. लूक ७:४७सुमारे इ.स. ३१

    यास्तव मी तुला सांगतो, हिने दाखविलेल्या पुष्कळ प्रीतीमुळे तिच्या अनेक पापांची क्षमा करण्यात आली आहे. ज्याच्या थोड्या पापांची क्षमा होते, त्याची प्रीतीही थोडीच असते.”

  24. लूक ७:४८सुमारे इ.स. ३१

    येशू त्या स्त्रीला म्हणाले, “तुझ्या पापांची क्षमा करण्यात आली आहे.”

  25. लूक ७:४९सुमारे इ.स. ३१

    त्या ठिकाणी आलेल्या दुसर्‍या पाहुण्यांनी एकमेकांमध्ये बोलण्यास सुरुवात केली, “हा कोण आहे जो पापांची सुद्धा क्षमा करतो?”