मुख्य मजकुरावर जा

circa 1380–1050 BC

The Judges & Ruth

Israel cycles through rebellion, oppression, and rescue under charismatic leaders—culminating in Ruth's faithful love story.

703 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. रूथ ३:१३सुमारे इ.स.पू. १३०७

    आज रात्री येथेच राहा आणि सकाळी जर त्याला तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन सोडविणारा म्हणून त्याचे कर्तव्य करावयाचे असेल, तर चांगलेच आहे; त्याला तुम्हाला सोडवू द्या. परंतु जर त्याची तशी इच्छा नसेल, तर याहवेहची शपथ, मी ते करेन. सकाळ होईपर्यंत येथेच पडून राहा.”

  2. रूथ ३:१४सुमारे इ.स.पू. १३०७

    म्हणून ती सकाळपर्यंत त्याच्या पायाजवळ पडून राहिली, परंतु इतर कोणालाही कळण्याआधी ती उठून बसली, तेव्हा तो म्हणाला, “हे कोणालाही कळू देऊ नको की एक स्त्री या खळ्यात आली होती.”

  3. रूथ ३:१५सुमारे इ.स.पू. १३०७

    तो असेही म्हणाला, “तू घातलेली ओढणी माझ्याकडे आण आणि ती उघडून धरून ठेव.” जेव्हा तिने तसे केले तेव्हा त्याने सहा मापे भरून जव त्यावर ओतले आणि ते गाठोडे बांधून तिच्या खांद्यावर दिले. नंतर तो परत नगराकडे निघून गेला.

  4. रूथ ३:१६सुमारे इ.स.पू. १३०७

    जेव्हा ती घरी तिच्या सासूकडे आली, तेव्हा नाओमीने तिला विचारले, “माझ्या मुली, कसे काय झाले?” तेव्हा बवाजने तिच्यासाठी जे केले, ते तिने तिला सर्वकाही सांगितले,

  5. रूथ ३:१७सुमारे इ.स.पू. १३०७

    आणि ती पुढे म्हणाली, “त्याने मला ही सहा मापे जव दिले व म्हणाला, ‘तुझ्या सासूकडे रिकामी हाताने परत जाऊ नकोस.’ ”

  6. रूथ ३:१८सुमारे इ.स.पू. १३०७

    तेव्हा नाओमी म्हणाली, “माझ्या मुली, काय घडते हे समजेपर्यंत वाट पाहा, कारण तो मनुष्य या गोष्टीचा निकाल लागेपर्यंत स्वस्थ राहणार नाही.”

  7. त्या दरम्यान बवाज नगराच्या वेशीकडे गेला आणि तो तिथे बसला असताना तो सोडवणूक करणारा, ज्याच्याबद्दल त्याने सांगितले होते, तो मनुष्य पुढे आला. तेव्हा बवाज त्याला म्हणाला, “माझ्या मित्रा, इकडे ये आणि इथे बस.” तेव्हा तो तिकडे गेला आणि बसला.

  8. नंतर बवाजने नगरातील दहा वडीलजनांना बोलावून घेतले आणि त्यांना म्हणाला, “येथे बसा,” आणि ते बसले.

  9. तेव्हा तो जबाबदारी घेऊन सोडवणूक करणाऱ्या मनुष्यास म्हणाला, “नाओमी मोआब देशातून परत आली आहे. ती आता ज्या जमिनीचा भाग विकत आहे, ती आपला नातेवाईक एलीमेलेखच्या मालकीची आहे.

  10. मला असे वाटले की, ही गोष्ट तुझ्या लक्षात आणून द्यावी आणि मी असे सुचवितो की, येथे बसलेल्या लोकांच्या उपस्थितीत आणि माझ्या वडीलजनांच्या उपस्थितीत तू ती विकत घे. जर तू ती सोडवशील, तर तसे कर. परंतु जर तू तसे करणार नाहीस, मला सांग, म्हणजे मला ते कळेल. कारण तुझ्याशिवाय तसे करण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि तुझ्यानंतर मला तो अधिकार आहे.” तो म्हणाला, “मी तो सोडवून घेईन,”

  11. तेव्हा बवाज म्हणाला, “ज्या दिवशी तू नाओमीकडून ही जमीन विकत घेशील तेव्हा त्याच्या कुटुंबाचे नाव त्याची मालमत्ता चालू ठेवण्यासाठी त्या मृत माणसाची विधवा मोआबी रूथसुद्धा तुला स्वीकारावी लागेल.”

  12. यावरून तो जबाबदारी घेऊन सोडविणारा मनुष्य म्हणाला, “असे असेल, तर मग मी ती सोडवू शकत नाही. कारण त्यामुळे माझी स्वतःची मालमत्ता धोक्यात येईल. तू स्वतःच ती सोडवून घे. मी हे करू शकत नाही.”

  13. (इस्राएलमध्ये पूर्वीच्या काळात, मालमत्तेची सोडवणूक करणे आणि तिचे हस्तांतरण पक्के होण्यासाठी, एका पक्षाने त्याची चप्पल काढून ती दुसऱ्याला देणे ही इस्राएलमधील व्यवहार कायदेशीर करण्याची पद्धत होती.)

  14. म्हणून तो जबाबदारी घेऊन सोडविणारा मनुष्य बवाजला म्हणाला, “तू स्वतःच ती विकत घे.” आणि त्यावेळी त्याने त्याची चप्पल काढली.

  15. तेव्हा बवाजने वडीलजनांना आणि सर्व लोकांना जाहीरपणे सांगितले, “आज तुम्ही साक्षीदार आहात की मी एलीमेलेख, किलिओन आणि महलोन यांची सर्व मालमत्ता नाओमीकडून विकत घेतली आहे.

  16. मोआबी रूथ, म्हणजे महलोनची विधवा हिलासुद्धा माझी पत्नी म्हणून, त्या मनुष्याचे नाव त्याच्या मालमत्तेसहित चालवावे यासाठी माझ्या ताब्यात घेत आहे, म्हणजे त्याच्या कुटुंबातून किंवा त्याच्या गावातून त्याचे नाव पुसले जाणार नाही. याविषयी तुम्ही आज साक्षी आहात!”

  17. तेव्हा वडीलजन आणि वेशीत आलेले सर्व लोक म्हणाले, “होय, आम्ही साक्षीदार आहोत. राहेल आणि लेआ, ज्यांनी एकत्र मिळून इस्राएलचे कुटुंब तयार केले, त्याप्रमाणेच याहवेह आता तुझ्या घरात येत असलेल्या या स्त्रीचे करो. तुला एफ्राथामध्ये स्थान मिळो आणि तू बेथलेहेमात प्रसिद्ध व्हावेस.

  18. या तरुण स्त्रीपासून याहवेह तुला संतती देवो, तुझे कुटुंब तामार आणि यहूदाहचा पुत्र पेरेससारखे होवो.”

  19. रूथ ४:१३सुमारे इ.स.पू. १३०७

    तेव्हा बवाजने रूथला स्वीकारले आणि ती त्याची पत्नी झाली. जेव्हा त्याने तिच्याशी प्रीतिसंबंध केले, तेव्हा याहवेहनी तिला गर्भ राहण्यासाठी समर्थ केले, आणि तिने मुलाला जन्म दिला.

  20. रूथ ४:१४सुमारे इ.स.पू. १३०७

    तेव्हा स्त्रिया नाओमीला म्हणाल्या: “याहवेहची स्तुती असो, ज्यांनी या दिवशी तुझी जबाबदारी घेऊन सोडविणाऱ्याशिवाय तुला सोडले नाही. तो संपूर्ण इस्राएलमध्ये प्रसिद्ध होवो!

  21. रूथ ४:१५सुमारे इ.स.पू. १३०७

    तो तुला नवजीवन देऊन तुझ्या वृद्धापकाळात तुला आधार देईल. कारण तुझी सून, जी तुझ्यावर प्रीती करते आणि जी सात मुलांपेक्षा अधिक उत्तम आहे, तिनेच त्याला जन्म दिला आहे.”

  22. रूथ ४:१६सुमारे इ.स.पू. १३०७

    तेव्हा नाओमीने ते बाळ उचलून उराशी धरले आणि त्याची काळजी घेऊ लागली.

  23. रूथ ४:१७सुमारे इ.स.पू. १३०७

    तिथे राहणाऱ्या स्त्रिया म्हणाल्या, “आता नाओमीला मुलगा आहे!” आणि त्यांनी त्याचे नाव ओबेद ठेवले. जो इशायाचा पिता, जो दावीद राजाचा पिता होता.

  24. रूथ ४:१८सुमारे इ.स.पू. १३०७

    पेरेसाची वंशावळ अशी: पेरेस हा हेस्रोनचा पिता होता,

  25. रूथ ४:१९सुमारे इ.स.पू. १३०७

    हेस्रोन हा रामचा पिता, राम हा अम्मीनादाबचा पिता,