मुख्य मजकुरावर जा

circa 1380–1050 BC

The Judges & Ruth

Israel cycles through rebellion, oppression, and rescue under charismatic leaders—culminating in Ruth's faithful love story.

703 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. रूथ १:८सुमारे इ.स.पू. १३०८

    नंतर नाओमी तिच्या दोन्ही सुनांना म्हणाली, “तुम्ही दोघीही तुमच्या आईच्या घरी परत जा. जशी तुम्ही तुमच्या मृत पतींवर आणि माझ्यावर दया दाखविली तशीच याहवेह तुमच्यावर दया करो.

  2. रूथ १:९सुमारे इ.स.पू. १३०८

    याहवेह तुम्हा प्रत्येकीला तुमच्या दुसऱ्या पतींच्या घरी विश्रांती देवो.” नंतर तिने त्यांचे चुंबन घेतले आणि त्या मोठ्याने रडू लागल्या

  3. रूथ १:१०सुमारे इ.स.पू. १३०८

    आणि तिला म्हणाल्या, “आम्हीही तुमच्याबरोबर तुमच्या लोकांकडे परत जाऊ.”

  4. रूथ १:११सुमारे इ.स.पू. १३०८

    परंतु नाओमी म्हणाली, “माझ्या मुलींनो, तुम्ही घरी परत जा. तुम्ही माझ्याबरोबर का यावे? मला आणखी पुत्र होणार आहेत काय, की ते तुमचे पती होऊ शकतील?

  5. रूथ १:१२सुमारे इ.स.पू. १३०८

    माझ्या मुलींनो, तुमच्या घरी परत जा; मी इतकी वृद्ध झाले आहे की मी दुसरा पती करू शकत नाही. समजा, मी तसा विचार केला तरी माझ्यासाठी आशा होती—जरी आज रात्री माझा नवरा असता आणि नंतर मी पुत्रांना जन्म दिला असता—

  6. रूथ १:१३सुमारे इ.स.पू. १३०८

    तरी ते मोठे होईपर्यंत तुम्ही वाट पाहत राहणार काय? नाही, माझ्या मुलींनो, तुमच्यापेक्षा मला हे फारच मोठे दुःख आहे, कारण याहवेहचा हात माझ्याविरुद्ध झाला आहे!”

  7. रूथ १:१४सुमारे इ.स.पू. १३०८

    त्या पुन्हा आणखीच मोठ्याने रडू लागल्या. नंतर ओफराहने तिच्या सासूचे चुंबन घेऊन तिचा निरोप घेतला, परंतु रूथ तिला बिलगून राहिली.

  8. रूथ १:१५सुमारे इ.स.पू. १३०८

    तेव्हा नाओमी म्हणाली, “पाहा, तुझी जाऊ तिच्या लोकांकडे आणि तिच्या दैवतांकडे परत जात आहे. तू तिच्याबरोबर परत जा.”

  9. रूथ १:१६सुमारे इ.स.पू. १३०८

    परंतु रूथने उत्तर दिले, “तुम्हाला सोडून जाण्याचा किंवा तुमच्यापासून परत जाण्याचा आग्रह मला करू नका. कारण तुम्ही जिकडे जाल, तिकडे मी येईन आणि तुम्ही जिथे राहाल, तिथे मी राहीन. तुमचे लोक हे माझे लोक होतील आणि तुमचे परमेश्वर हे माझे परमेश्वर होतील.

  10. रूथ १:१७सुमारे इ.स.पू. १३०८

    तुम्ही मराल तिथे मी मरेन आणि तिथेच मला मूठमाती देण्यात यावी. मरणाशिवाय तुम्हाला आणि मला वेगळे केले तर याहवेह माझा अधिक कठोरपणे न्याय करो.”

  11. रूथ १:१८सुमारे इ.स.पू. १३०८

    जेव्हा नाओमीने हे पाहिले की, रूथने तिच्याबरोबर जाण्याचा ठाम निर्णय घेतला आहे, तेव्हा तिने तिला आग्रह करण्याचे थांबविले.

  12. रूथ १:१९सुमारे इ.स.पू. १३०८

    त्या दोन्ही स्त्रिया बेथलेहेम येईपर्यंत चालत राहिल्या. जेव्हा त्या बेथलेहेम येथे पोहोचल्या, तेव्हा त्यांच्यामुळे ते संपूर्ण नगर गोंधळून गेले आणि स्त्रियांनी आश्चर्याने उद्गार काढले, “ही खरोखरच नाओमी आहे काय?”

  13. रूथ १:२०सुमारे इ.स.पू. १३०८

    नाओमीने त्यांना म्हटले, “मला नाओमी म्हणू नका, मला मारा असे म्हणा, कारण सर्वसमर्थांनी माझे जीवन फार कडवट केले आहे

  14. रूथ १:२१सुमारे इ.स.पू. १३०८

    मी भरलेली गेले होते, परंतु याहवेहने मला रिकामे परत आणले आहे. मला नाओमी असे का म्हणता? याहवेहने मला दुःख दिले आहे; सर्वसमर्थांनी माझ्यावर हे दुर्भाग्य आणले आहे.”

  15. रूथ १:२२सुमारे इ.स.पू. १३०८

    अशाप्रकारे नाओमी, तिची मोआबी सून रूथबरोबर मोआब देशातून परत आली, त्या दोघी बेथलेहेमात पोहोचल्या, त्यावेळी सातूचा हंगाम सुरू झाला होता.

  16. रूथ २:१सुमारे इ.स.पू. १३०७

    नाओमीच्या पतीचा एक नातेवाईक होता, तो मनुष्य एलीमेलेखच्या कुळातील असून, त्याचे नावे बवाज होते.

  17. रूथ २:२सुमारे इ.स.पू. १३०७

    आणि मोआबी रूथ नाओमीला म्हणाली, “ज्याची कृपादृष्टी माझ्यावर होईल अशा मनुष्याच्या शेतामध्ये जाऊन त्याच्यामागे राहिलेले धान्य वेचण्यासाठी मला जाऊ दे.” नाओमी म्हणाली, “ठीक आहे, माझ्या मुली, तू जा.”

  18. रूथ २:३सुमारे इ.स.पू. १३०७

    तेव्हा ती गेली, तिने एका शेतात प्रवेश केला आणि कापणी करणाऱ्यांच्या मागे राहिलेले धान्य जमा करू लागली, संयोगाने ते शेत बवाजच्या मालकीचे होते, जो एलीमेलेखच्या कुळातील होता.

  19. रूथ २:४सुमारे इ.स.पू. १३०७

    त्याचवेळेस बवाज बेथलेहेमातून आला आणि कापणी करणार्‍यांचे क्षेमकुशल विचारले, तो म्हणाला, “याहवेह तुम्हाबरोबर असो!” त्यांनी प्रत्युत्तर दिले, “याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो!”

  20. रूथ २:५सुमारे इ.स.पू. १३०७

    बवाजाने त्याच्या कापणी करणाऱ्यांच्या मुकादमास विचारले, “ती तरुण स्त्री कोणाची आहे?”

  21. रूथ २:६सुमारे इ.स.पू. १३०७

    त्या मुकादमाने उत्तर दिले, “ती मोआबी आहे, ती मोआब देशातून नाओमी बरोबर आली आहे.

  22. रूथ २:७सुमारे इ.स.पू. १३०७

    ती मला म्हणाली, ‘कृपा करून कापणी करणार्‍यांच्यामागे पेंढ्यांमधून राहिलेले धान्य जमा करून गोळा करू द्या.’ ती सकाळीच शेतामध्ये आली आणि थोडाच वेळ छताखाली विश्रांती घेऊन आतापर्यंत येथेच आहे.”

  23. रूथ २:८सुमारे इ.स.पू. १३०७

    तेव्हा बवाज रूथला म्हणाला, “माझ्या मुली, माझे ऐक. धान्य वेचण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात जाऊ नकोस आणि येथून दूर जाऊ नकोस. माझ्यासाठी काम करणार्‍या स्त्रियांबरोबर इथेच राहा.

  24. रूथ २:९सुमारे इ.स.पू. १३०७

    ज्या शेतात माणसे कापणीचे काम करीत आहेत तिकडे लक्ष ठेव आणि या स्त्रियांच्या बरोबरीने त्यांच्यामागे जात राहा. तुला त्रास न देण्याबद्दल मी माणसांना सांगून ठेवले आहे. जेव्हा तुला तहान लागेल, तेव्हा तू जाऊन माणसांनी भरून ठेवलेल्या या रांजणातील पाणी पीत जा.”

  25. रूथ २:१०सुमारे इ.स.पू. १३०७

    त्यावर तिने तिचे मुख जमिनीकडे खाली लवून ते मान्य केले. ती त्याला म्हणाली, “मी एक परदेशी असूनही तुम्ही माझ्यावर एवढी कृपादृष्टी का बरे दाखवित आहात?”