मुख्य मजकुरावर जा

circa 930–586 BC

The Divided Kingdom

The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.

1,722 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यरोबोअमने स्वतःशी विचार केला, “राज्य कदाचित दावीदाच्या घराण्याकडे परत जाईल.

  2. जर या लोकांनी यरुशलेमात जाऊन याहवेहच्या मंदिरात यज्ञार्पणे केली व त्यांचा स्वामी यहूदीयाचा राजा रेहोबोअम याच्याप्रीत्यर्थ आपली निष्ठा पुन्हा दाखविली, तर ते मला जिवे मारतील व त्यांचा राजा रेहोबोअम याच्याकडे वळतील.”

  3. आपल्याबरोबरच्या लोकांचा सल्ला घेतल्यानंतर, राजाने दोन सोन्याची वासरे बनविली. तो लोकांना म्हणाला, “तुम्ही वर यरुशलेमकडे जाणे तुम्हाला अतिशय कठीण आहे, हे इस्राएला, ही पाहा तुमची दैवते, ज्यांनी तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले.”

  4. एक वासरू त्याने बेथेलमध्ये व दुसरे दानमध्ये प्रतिष्ठापीत केले.

  5. आणि ही बाब पाप अशी झाली; एका वासराची उपासना करण्यासाठी काही लोक बेथेलात येत होते आणि दुसर्‍या वासराची उपासना करण्यासाठी काही दूर दानपर्यंत गेले.

  6. यरोबोअमने उच्च स्थानावर मंदिरे बांधली आणि जरी ते लेवी घराण्यातील नव्हते, प्रत्येक प्रकारच्या लोकांमधून याजक नेमले.

  7. आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, जसा यहूदीयामध्ये पाळला जात असे तसेच त्याने एका सणाची स्थापना केली. आणि वेदीवर यज्ञार्पणे केली. बेथेलमध्ये बनविलेल्या वासरांसाठी अर्पणे त्याने केली. बेथेलमध्ये यरोबोअमने बनविलेल्या पूजास्थानांवर सुद्धा त्याने याजक नेमले.

  8. आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, त्याने स्वतःच निवडलेल्या महिन्यात, त्याने बेथेलमध्ये बांधलेल्या वेदीवर यज्ञार्पणे केली. त्याने इस्राएली लोकांसाठी सण स्थापित करून वरती वेदीवर जाऊन अर्पणे सादर केली.

  9. याहवेहच्या वचनानुसार परमेश्वराचा एक मनुष्य यहूदीयावरून बेथेलास आला, जेव्हा यरोबोअम अर्पण करण्यासाठी वेदीजवळ उभा होता.

  10. याहवेहच्या वचनानुसार तो वेदीविरुद्ध ओरडला: “वेदी, हे वेदी! याहवेह असे म्हणतात: ‘दावीदाच्या घराण्यात योशीयाह नावाचा पुत्र जन्माला येईल. जे याजक तुझ्यावर येथे यज्ञ करतात, त्यांचे यज्ञ तो तुझ्यावर करेल, मनुष्यांची हाडे तुझ्यावर जाळली जातील.’ ”

  11. त्याच दिवशी परमेश्वराच्या मनुष्याने एक चिन्ह दिले: “याहवेहने हेच चिन्ह जाहीर केले आहे: वेदी दुभागली जाईल आणि त्यावरील राख ओतली जाईल.”

  12. जेव्हा यरोबोअम राजाने परमेश्वराच्या मनुष्याने बेथेलात वेदीविरुद्ध जे काही सांगितले ते ऐकले, तेव्हा वेदीवरून आपला हात पुढे करून तो म्हणाला, “त्याला पकडा!” परंतु जो हात त्याने पुढे केला होता, तो वाळून गेला आणि त्याला तो मागे घेता येईना.

  13. आणि याहवेहच्या वचनानुसार परमेश्वराच्या मनुष्याने जे चिन्ह दिले त्यानुसार वेदी दुभागली व वेदीवरील राख ओतली गेली.

  14. तेव्हा राजाने परमेश्वराच्या मनुष्याला म्हटले, “याहवेह तुझ्या परमेश्वराकडे माझ्यासाठी मध्यस्थी कर व माझा हात पूर्ववत व्हावा म्हणून प्रार्थना कर.” तेव्हा परमेश्वराच्या मनुष्याने याहवेहकडे मध्यस्थी केली आणि राजाचा हात बरा होऊन पूर्ववत झाला.

  15. राजा त्या परमेश्वराच्या मनुष्यास म्हणाला, “माझ्याबरोबर भोजन करण्यास घरी चल आणि मी तुला एक भेट देईन.”

  16. परंतु परमेश्वराच्या मनुष्याने राजाला उत्तर दिले, “तू जरी मला तुझी अर्धी संपत्ती दिली, तरीही मी तुझ्याबरोबर जाणार नाही, या ठिकाणी ना मी भाकर खाणार, ना पाणी पिणार.

  17. कारण याहवेहच्या वचनाने मला आज्ञा दिली आहे: ‘तू तिथे ना भाकरी खावी ना पाणी प्यावे किंवा ज्या वाटेने तू जातोस त्या वाटेने परत येऊ नये.’ ”

  18. म्हणून ज्या मार्गाने तो बेथेलास आला होता त्याने न जाता, दुसर्‍या मार्गाने रवाना झाला.

  19. तेव्हा बेथेलमध्ये एक वृद्ध संदेष्टा राहत होता, त्याच्या मुलांनी येऊन त्याला परमेश्वराच्या मनुष्याने त्या दिवशी जे केले ते सर्वकाही सांगितले. आणि तो राजाला जे काही बोलला ते देखील सांगितले.

  20. त्यांच्या पित्याने त्यांना विचारले, “तो कोणत्या मार्गाने गेला?” आणि परमेश्वराचा मनुष्य जो यहूदीयातून आलेला होता तो ज्या मार्गाने गेला होता तो त्यांनी त्याला सांगितला.

  21. तेव्हा तो आपल्या मुलांना म्हणाला, “माझ्यासाठी गाढवावर खोगीर घाला.” आणि त्यांनी तसे केल्यानंतर तो गाढवावर बसला

  22. आणि परमेश्वराच्या मनुष्याचा पाठलाग करीत गेला. तो त्याला एका एलाच्या वृक्षाखाली बसलेला दिसला. त्याने त्याला विचारले, “परमेश्वराचा मनुष्य जो यहूदीयातून आला तो तूच आहेस काय?” तो म्हणाला, “होय, तो मीच आहे.”

  23. त्या संदेष्ट्याने त्याला म्हटले, “माझ्याबरोबर घरी चल आणि भोजन कर.”

  24. परमेश्वराच्या मनुष्याने म्हटले, “मी मागे वळून तुझ्याबरोबर जाऊ शकत नाही, ना मी तुझ्याबरोबर या ठिकाणी भाकर खाऊ शकत ना पाणी पिऊ शकत.

  25. याहवेहच्या वचनाद्वारे मला सांगितले गेले: ‘तू तिथे भाकर खाऊ नये किंवा पाणी पिऊ नये किंवा ज्या मार्गाने तू आलास, त्याने परत जाऊ नये.’ ”