मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 योहान १:११सुमारे इ.स. ९०

    तुम्ही जर त्यांचे स्वागत केले, तर तुम्ही त्यांच्या दुष्कर्मामध्ये भागीदार व्हाल.

  2. 2 योहान १:१२सुमारे इ.स. ९०

    तुम्हाला लिहिण्यासाठी माझ्याकडे पुष्कळ काही आहे, परंतु ते कागद आणि शाईने लिहून कळवावे अशी माझी इच्छा नाही. त्याऐवजी तुमची भेट घ्यावी आणि समोरासमोर तुमच्याबरोबर बोलावे अशी आशा करतो म्हणजे आपला आनंद परिपूर्ण होईल.

  3. 2 योहान १:१३सुमारे इ.स. ९०

    जिला परमेश्वराने निवडले आहे, त्या तुझ्या बहिणीची मुले त्यांच्या शुभेच्छा पाठवितात.

  4. 3 योहान १:१सुमारे इ.स. ९०

    मंडळीचा वडील याजकडून,

  5. 3 योहान १:२सुमारे इ.स. ९०

    प्रिय मित्रा, मी प्रार्थना करतो की, तुला चांगले आरोग्य लाभो आणि तुझ्याबरोबर सर्वकाही चांगले होत जावो, जशी तुझ्या आत्म्याचीसुद्धा उन्नती होत आहे.

  6. 3 योहान १:३सुमारे इ.स. ९०

    जेव्हा काही विश्वासणार्‍यांनी येऊन सत्यासाठी असलेल्या तुमच्या विश्वासूपणाबद्दल साक्ष दिली आणि सांगितले की तुम्ही सातत्याने विश्वासात कशाप्रकारे जगत आहात, तेव्हा मला मोठा आनंद झाला.

  7. 3 योहान १:४सुमारे इ.स. ९०

    माझी मुले सत्याने चालतात, हे ऐकल्याने मला जेवढा आनंद होतो, तेवढा आनंद दुसर्‍या कशानेही होत नाही.

  8. 3 योहान १:५सुमारे इ.स. ९०

    प्रिय मित्रा, जे तुला अनोळखी आहेत, त्या काही भावांसाठी आणि बहिणींसाठी तू जे करीत आहेस त्यामध्ये तू विश्वासू आहेस.

  9. 3 योहान १:६सुमारे इ.स. ९०

    त्यांनी मंडळीला तू दाखविलेल्या प्रीतीविषयी साक्ष दिली आहे. कृपा करून त्यांना अशाप्रकारे निरोप देऊन पाठव की ज्यामुळे परमेश्वराचे गौरव व्हावे.

  10. 3 योहान १:७सुमारे इ.स. ९०

    ते गैरयहूदी लोकांकडून कोणतीही मदत न घेता सेवेसाठी बाहेर निघाले हे परमेश्वराच्या नावाच्या गौरवासाठीच होते.

  11. 3 योहान १:८सुमारे इ.स. ९०

    आपण अशा लोकांचे आदरातिथ्य केले पाहिजे, म्हणजे सत्यासाठी आपण एकत्र कार्य करू शकू.

  12. 3 योहान १:९सुमारे इ.स. ९०

    मी मंडळीला एक पत्र लिहिले, परंतु दियत्रेफस, जो स्वतःस श्रेष्ठ करण्याची आवडत धरतो, तो आमचे स्वागत करणार नाही.

  13. 3 योहान १:१०सुमारे इ.स. ९०

    म्हणून जेव्हा मी येईन, तेव्हा तो आमच्याविषयी द्वेषभावनेने निरर्थक बातम्या पसरवित आहे याकडे लक्ष वेधीन. एवढेच नव्हे तर तो इतर विश्वासणार्‍यांचेही स्वागत करीत नाही. पण जे कोणी करू इच्छितात त्यांना तो मनाई करतो आणि मंडळीतून घालवून देतो.

  14. 3 योहान १:११सुमारे इ.स. ९०

    प्रिय मित्रा, जे वाईट आहे त्याचे अनुकरण करू नको तर चांगल्याचे कर. जो कोणी चांगले करतो तो परमेश्वरापासून आहे. जो कोणी जे काही वाईट आहे ते करतो त्याने परमेश्वराला पाहिलेले नाही.

  15. 3 योहान १:१२सुमारे इ.स. ९०

    देमेत्रियाबद्दल प्रत्येकजण चांगले बोलतात आणि स्वतः सत्यसुद्धा त्याच्याविषयी साक्ष देते. आम्हीसुद्धा त्याच्याविषयी चांगलेच बोलतो आणि तुम्हाला माहीतच आहे की, आमची साक्ष खरी आहे.

  16. 3 योहान १:१३सुमारे इ.स. ९०

    तुम्हाला लिहिण्यासाठी माझ्याकडे पुष्कळ काही आहे, परंतु ते लेखणी आणि शाईने लिहून कळवावे अशी माझी इच्छा नाही.

  17. 3 योहान १:१४सुमारे इ.स. ९०

    तुमची भेट लवकरच होईल, अशी मला आशा आहे आणि तेव्हा आपण समोरासमोर बोलू.

  18. यहूदा १:१सुमारे इ.स. ६६

    येशू ख्रिस्ताचा सेवक आणि याकोबाचा बंधू यहूदाह याजकडून,

  19. यहूदा १:२सुमारे इ.स. ६६

    दया, शांती आणि प्रीती तुम्हाला अधिकाधिक प्राप्त होवो.

  20. यहूदा १:३सुमारे इ.स. ६६

    प्रिय बंधूंनो, आपणा सर्वास मिळालेल्या सामाईक तारणाबद्दल मी तुम्हाला लिहिण्यास उत्सुक होतो, परंतु मला तुम्हाला लिहिण्याचे आणि विनंती करण्याचे अगत्य वाटले की जो विश्वास परमेश्वराच्या पवित्र लोकांना एकदाचाच सोपवून दिला होता, तो राखण्याविषयी तुम्ही झटावे.

  21. यहूदा १:४सुमारे इ.स. ६६

    ज्यांच्यासाठी दंडाज्ञा फार पूर्वीच लिहून ठेवलेली होती असे काही लोक गुप्तपणे तुमच्यामध्ये आत शिरले आहेत. हे अनीतिमान लोक, परमेश्वराची कृपा विकृत करून तिला अनैतिकतेचे स्वरूप देतात आणि येशू ख्रिस्त आपल्या एकाच सार्वभौम प्रभूला नाकारतात.

  22. यहूदा १:५सुमारे इ.स. ६६

    जरी हे सर्व तुम्हाला आधी माहीत आहे, तरी तुम्हाला आठवण करून देतो की प्रभूने त्यांच्या लोकांना इजिप्तमधून सोडविले, परंतु नंतर त्यांच्यावर विश्वास न ठेवणार्‍यांचा त्यांनी नाश केला.

  23. यहूदा १:६सुमारे इ.स. ६६

    आणि ज्या दूतांनी आपल्या अधिकारांचे पद न राखता आपले योग्य स्थान सोडले त्यांना त्यांनी अंधकारात, अनंतकाळच्या बंधनात मोठ्या न्यायाच्या दिवसासाठी राखून ठेवले आहे.

  24. यहूदा १:७सुमारे इ.स. ६६

    त्याच प्रकारे सदोम आणि गमोरा आणि शेजारच्या गावांनी स्वतःच्या देहाला लैंगिक व्यभिचार आणि भ्रष्टतेमध्ये वाहवून घेतले. त्यांना अनंतकाळाच्या अग्नीची शिक्षा सहन करावी म्हणून उदाहरणादाखल पुढे ठेवले आहे.

  25. यहूदा १:८सुमारे इ.स. ६६

    अगदी त्याच प्रकारे, हे अनीतिमान लोक आपल्या स्वप्नाच्या जोरावर, स्वतःचे शरीर विटाळवितात, अधिकार नाकारतात आणि स्वर्गीय प्राणिमात्रांची निंदा करतात.