मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 1 योहान ५:७सुमारे इ.स. ९०

    याबद्दल तिघे जण साक्ष देतात:

  2. 1 योहान ५:८सुमारे इ.स. ९०

    आत्मा, पाणी आणि रक्त या तिघांमध्ये एकमत आहे.

  3. 1 योहान ५:९सुमारे इ.स. ९०

    आपण मनुष्यांची साक्ष स्वीकारतो, परंतु परमेश्वराची साक्ष सर्वात महान आहे, कारण ती परमेश्वराने दिलेली साक्ष आहे जी त्यांनी त्यांच्या पुत्राबद्दल दिली आहे.

  4. 1 योहान ५:१०सुमारे इ.स. ९०

    जे कोणी परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवतात ते ही साक्ष स्वीकारतात. जे कोणी यावर विश्वास ठेवीत नाहीत, परमेश्वराने त्यांना लबाड ठरविले आहे, कारण परमेश्वराने त्यांच्या पुत्राविषयी दिलेल्या साक्षीवर त्यांनी विश्वास ठेवला नाही;

  5. 1 योहान ५:११सुमारे इ.स. ९०

    हीच ती साक्ष आहे: परमेश्वराने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्यांच्या पुत्रामध्ये आहे.

  6. 1 योहान ५:१२सुमारे इ.स. ९०

    ज्या कोणामध्ये परमेश्वराचा पुत्र वसतो, त्याच्यामध्ये जीवन आहे; ज्याच्यामध्ये परमेश्वराचा पुत्र वसत नाही, त्याच्यामध्ये जीवन नाही.

  7. 1 योहान ५:१३सुमारे इ.स. ९०

    मी तुम्हाला हे लिहित आहे यासाठी की, तुम्ही जे परमेश्वराच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवता त्या तुम्हाला हे माहीत असावे की, सार्वकालिक जीवन तुम्हाला मिळालेले आहे.

  8. 1 योहान ५:१४सुमारे इ.स. ९०

    आपल्याला परमेश्वराच्या समक्षतेत येण्यासाठी आत्मविश्वास आहे, कारण आपण त्यांच्या इच्छेनुसार काही मागितले तर ते आमचे ऐकतात.

  9. 1 योहान ५:१५सुमारे इ.स. ९०

    जे आपण मागतो ते ऐकतात आणि आपल्याला माहीत आहे की जे आपण त्यांना मागितले आहे ते आपणास मिळाले आहे.

  10. 1 योहान ५:१६सुमारे इ.स. ९०

    ज्याचा शेवट मरणात नाही, असे पाप कोणा भावाच्या किंवा बहिणीच्या हातून घडताना तुम्हाला आढळले, तर परमेश्वराने त्यांना क्षमा करावी म्हणून तुम्ही प्रार्थना करावी आणि परमेश्वर त्यांना जीवन देईल. मी त्यांच्या बाबतीत सांगतो, ज्यांचे पाप त्यांना मरणाकडे नेत नाही. असे एक पाप आहे जे मरणाकडे घेऊन जाते. त्याबद्दल तुम्ही प्रार्थना करावी असे मी म्हणत नाही.

  11. 1 योहान ५:१७सुमारे इ.स. ९०

    प्रत्येक चुकीचे कृत्य पाप आहे आणि असेही पाप आहे की ज्याचा परिणाम मरण नाही.

  12. 1 योहान ५:१८सुमारे इ.स. ९०

    आपल्याला माहीत आहे की, जे कोणी परमेश्वरापासून जन्मले आहेत ते पाप करीत राहत नाहीत; जे परमेश्वरापासून जन्मले आहेत त्यांना परमेश्वर सुरक्षित ठेवतात आणि तो दुष्ट त्यांना अपाय करू शकत नाही.

  13. 1 योहान ५:१९सुमारे इ.स. ९०

    आपल्याला हे माहीत आहे की, आपण परमेश्वराची लेकरे आहोत आणि संपूर्ण जग त्या सैतानाच्या नियंत्रणाखाली आहे.

  14. 1 योहान ५:२०सुमारे इ.स. ९०

    आपल्याला हे सुद्धा माहीत आहे की, परमेश्वराचे पुत्र ख्रिस्त आले आहेत आणि आपण खर्‍या परमेश्वराला ओळखावे यासाठी त्यांनी आपल्याला बुद्धी दिली आहे. त्यांचे पुत्र येशू ख्रिस्तामध्ये असल्याने, जे खरे आहेत त्यांच्यामध्ये आपण आहोत. तेच एकमेव खरे परमेश्वर आहेत आणि तेच सार्वकालिक जीवन आहेत.

  15. 1 योहान ५:२१सुमारे इ.स. ९०

    प्रिय लेकरांनो, तुम्ही स्वतःस मूर्तीपासून दूर ठेवा.

  16. 2 योहान १:१सुमारे इ.स. ९०

    मंडळीचा वडील याजकडून,

  17. 2 योहान १:२सुमारे इ.स. ९०

    कारण जे सत्य आमच्यामध्ये राहते आणि तेच आमच्याबरोबर कायम राहील.

  18. 2 योहान १:३सुमारे इ.स. ९०

    परमेश्वर जे पिता आणि येशू ख्रिस्त जे पित्याचा पुत्र यांच्याकडून सत्य आणि प्रीती यामध्ये कृपा, दया आणि शांती तुम्हाबरोबर राहील.

  19. 2 योहान १:४सुमारे इ.स. ९०

    पित्याने आपल्याला आज्ञा केल्याप्रमाणे तुझी काही मुले सत्यात चालतात हे ऐकून मला अतिशय आनंद झाला.

  20. 2 योहान १:५सुमारे इ.स. ९०

    आता, हे प्रिय स्त्रिये, मी तुला नवी आज्ञा लिहित नाही परंतु तीच जी प्रारंभापासून देण्यात आली आहे. मी तुम्हास सांगतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी.

  21. 2 योहान १:६सुमारे इ.स. ९०

    प्रीती हीच आहे की, आपण त्यांच्या आज्ञेचे पालन करीत जीवन जगतो. जसे तुम्ही सुरुवातीपासूनच ऐकले आहे, त्यांची आज्ञा आहे की तुम्ही प्रीतिपूर्ण जीवन जगावे.

  22. 2 योहान १:७सुमारे इ.स. ९०

    मी तुम्हाला सांगतो की, फसवणूक करणारे असे पुष्कळजण जगामध्ये निघालेले आहेत, येशू ख्रिस्त देह धारण करून या जगात आले, याचा ते अंगीकार करीत नाहीत. अशा प्रकारची कोणीही व्यक्ती फसवणूक करणारी आणि ख्रिस्तविरोधक आहे.

  23. 2 योहान १:८सुमारे इ.स. ९०

    आम्ही जे परिश्रम केले आहेत ते तुम्ही हरवू नये यासाठी जपा, परंतु तुम्हाला त्याचा संपूर्ण मोबदला मिळावा.

  24. 2 योहान १:९सुमारे इ.स. ९०

    जे कोणी सर्वांच्या पुढे जात राहतात आणि ख्रिस्ताच्या शिक्षणात राहत नाहीत त्यांच्याकडे परमेश्वर नाही; जो कोणी या शिक्षणात राहतो त्यांच्याकडे पिता आणि पुत्र दोघेही आहेत.

  25. 2 योहान १:१०सुमारे इ.स. ९०

    जर कोणी तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला असे शिक्षण देत नाही, तर त्यांना तुमच्या घरात घेऊ नका किंवा त्यांचे स्वागतही करू नका.