मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 1 योहान ३:२सुमारे इ.स. ९०

    प्रिय मित्रांनो, आपण आता परमेश्वराची लेकरे आहोत आणि आपण पुढे काय होऊ हे अजून आपल्याला ठाऊक झालेले नाही. परंतु जेव्हा ख्रिस्त प्रकट होतील तेव्हा जसे ख्रिस्त आहेत तसे आपण होणार, कारण जसे ते आहेत तसेच आपण त्यांना पाहू.

  2. 1 योहान ३:३सुमारे इ.स. ९०

    ज्यांना त्यांच्यामध्ये अशी आशा आहे ते स्वतःला शुद्ध करतात, जसे ते शुद्ध आहेत.

  3. 1 योहान ३:४सुमारे इ.स. ९०

    जे प्रत्येकजण पाप करतात ते नियम मोडतात; खरेतर नियमांचे पालन न करणे हेच पाप आहे.

  4. 1 योहान ३:५सुमारे इ.स. ९०

    परंतु तुम्हाला हे माहीत आहे की, आपली पापे दूर करावी म्हणून ख्रिस्त प्रकट झाले. त्यांच्यामध्ये कोणतेही पाप नाही.

  5. 1 योहान ३:६सुमारे इ.स. ९०

    जे कोणी त्यांच्यामध्ये राहतात ते पाप करीत राहत नाही. जे कोणी पाप करीत राहतात, त्यांनी ख्रिस्ताला पाहिलेले नाही किंवा त्यांना ओळखले नाही.

  6. 1 योहान ३:७सुमारे इ.स. ९०

    अहो प्रिय मुलांनो, तुम्हाला कोणी बहकवू नये. जसे ख्रिस्त नीतिमान आहेत, तसेच जे कोणी योग्य ते करतात ते नीतिमान आहेत.

  7. 1 योहान ३:८सुमारे इ.स. ९०

    जो कोणी पापमय गोष्टी करतो ते सैतानापासून आहे, कारण सैतान प्रारंभापासूनच पाप करीत आला आहे. परंतु सैतानाची कृत्ये नष्ट करावी म्हणून परमेश्वराचे पुत्र प्रकट झाले.

  8. 1 योहान ३:९सुमारे इ.स. ९०

    ज्यांचा जन्म परमेश्वरापासून झाला आहे, ते पाप करीत राहत नाही, कारण त्यांच्याठायी परमेश्वराचे बीज राहते; म्हणून पाप करीत राहणे त्याला अशक्यच असते, कारण त्यांचा जन्म परमेश्वरापासून झाला आहे.

  9. 1 योहान ३:१०सुमारे इ.स. ९०

    यावरून आपल्याला परमेश्वराची मुले कोणती आणि सैतानाची मुले कोणती, हे ओळखता येते. जे कोणी जे योग्य आहे ते करीत नाहीत, ती परमेश्वराची लेकरे नाहीत किंवा जे कोणी आपल्या भावावर आणि बहिणीवर प्रीती करीत नाही ते सुद्धा परमेश्वरापासून नाहीत.

  10. 1 योहान ३:११सुमारे इ.स. ९०

    कारण आपण एकमेकांवर प्रीती करावी हाच संदेश तुम्ही सुरुवातीपासून ऐकला आहे.

  11. 1 योहान ३:१२सुमारे इ.स. ९०

    आपण काईनासारखे होऊ नये, कारण तो सैतानाचा होता व त्याने आपल्या भावाचा वध केला. त्याने त्याचा वध का केला? कारण काईनाची कृत्ये वाईट होत्या आणि त्याच्या भावाची कृत्ये नीतियुक्त होती.

  12. 1 योहान ३:१३सुमारे इ.स. ९०

    म्हणून प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो जगाने तुमचा द्वेष केला, तर आश्चर्य करू नका.

  13. 1 योहान ३:१४सुमारे इ.स. ९०

    आपल्याला माहीत आहे की आपण मरणातून जीवनात पार गेलो आहोत कारण आपण एकमेकांवर प्रीती करतो. जे कोणी प्रीती करीत नाही ते मरणामध्येच राहतात.

  14. 1 योहान ३:१५सुमारे इ.स. ९०

    जे कोणी भावाचा आणि बहिणीचा द्वेष करतात ते खुनी आहेत आणि तुम्हाला माहीत आहे की, कोणत्याही खुनी व्यक्तीमध्ये सार्वकालिक जीवन राहत नाही.

  15. 1 योहान ३:१६सुमारे इ.स. ९०

    प्रीती काय आहे हे यावरून आपल्याला समजते की, येशू ख्रिस्ताने त्यांचे जीवन आपल्यासाठी दिले आणि म्हणून आपणही आपल्या भावांसाठी आणि बहिणींसाठी आपले जीवन दिले पाहिजे.

  16. 1 योहान ३:१७सुमारे इ.स. ९०

    जर कोणाजवळ ऐहिक संपत्ती असेल आणि तो पाहतो की त्याचा भाऊ किंवा बहीण गरजेत आहे परंतु त्याला त्यांची दया येत नाही, तर अशा व्यक्तीमध्ये परमेश्वराची प्रीती कशी असू शकेल?

  17. 1 योहान ३:१८सुमारे इ.स. ९०

    प्रिय लेकरांनो, आपण शब्दांनी किंवा कोरड्या बोलण्याने प्रीती करू नये, परंतु कृतीने आणि सत्याने प्रीती करावी.

  18. 1 योहान ३:१९सुमारे इ.स. ९०

    यावरून आपल्याला माहीत होते की, आपण सत्याच्या पक्षाचे आहोत आणि त्याच्या समक्षतेत आपली हृदये विसावतात.

  19. 1 योहान ३:२०सुमारे इ.स. ९०

    जर आपली अंतःकरणे आपल्याला दोषी ठरवीत असतील तर हे लक्षात ठेवा की, परमेश्वर आपल्या अंतःकरणापेक्षा महान आहेत आणि ते सर्वकाही जाणतात.

  20. 1 योहान ३:२१सुमारे इ.स. ९०

    प्रिय मित्रांनो, जर आपली अंतःकरणे आपल्याला दोषी ठरवीत नसतील तर परमेश्वरासमोर येण्यास आपल्याला धैर्य आहे

  21. 1 योहान ३:२२सुमारे इ.स. ९०

    आणि आपण जे काही मागतो ते त्यांच्याकडून मिळते, कारण आपण त्यांच्या आज्ञा पाळतो आणि त्याला आवडणार्‍या गोष्टी करतो.

  22. 1 योहान ३:२३सुमारे इ.स. ९०

    ही त्यांची आज्ञा आहेः त्यांचा पुत्र येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणे आणि त्यांनी आज्ञा दिल्याप्रमाणे एकमेकांवर प्रीती करावी.

  23. 1 योहान ३:२४सुमारे इ.स. ९०

    जे कोणी परमेश्वराच्या आज्ञा पाळतात ते परमेश्वरामध्ये राहतात आणि परमेश्वर त्यांच्यामध्ये राहतात. आणि अशा रीतीने आपल्याला समजते की परमेश्वर आपल्यामध्ये राहतात: परमेश्वराने जो आत्मा आपणास दिला आहे त्याद्वारे हे आपणास समजून येते.

  24. 1 योहान ४:१सुमारे इ.स. ९०

    प्रिय मित्रांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका, परंतु ते आत्मे परमेश्वराकडून आलेले आहेत का याची परीक्षा करा, कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगामध्ये निघालेले आहेत.

  25. 1 योहान ४:२सुमारे इ.स. ९०

    याप्रकारे तुम्ही परमेश्वराचा आत्मा ओळखू शकता: जो प्रत्येक आत्मा, येशू ख्रिस्त देह धारण करून आले होते हे स्वीकारतो, तो परमेश्वरापासून आहे.