मुख्य मजकुरावर जा

Zebulun

46 वचने · 17 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Zabulon

Zebulun चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ज्यांचे मूळ अमालेकामध्ये होते, ते काही लोक एफ्राईमामधून आले; बिन्यामीन तुम्हाला अनुसरण करणार्‍या लोकांसह होते. माखीराचे सरदारही आले, जबुलूनाचे दंडधारी सेनापतिसुद्धा आले.

  2. जबुलूनच्या लोकांनी आपल्या जीव धोक्यात घातला; तसेच नफतालीच्या लोकांनी रणभूमीवर मरणाचा धोका पत्करला.

  3. त्याने मनश्शेह, आशेर, जबुलून आणि नफतालीकडे दूत पाठवून त्यांच्या सैन्यांना येण्याचे आव्हान केले व त्या सर्वांनी त्याला साथ दिली.

  4. मग एलोन मरण पावला आणि त्याला जबुलून देशातील अय्यालोनमध्ये पुरण्यात आले.

  5. इस्राएलचे पुत्र: रऊबेन, शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार व जबुलून,

  6. मरारी वंशजास चिठ्ठ्या टाकून त्यांच्या पितृकुळाप्रमाणे रऊबेन, गाद व जबुलून या गोत्रांच्या प्रदेशातून बारा नगरे दिली.

  7. लेवीच्या बाकी लोकांना म्हणजे मरारी वंशजास जी शहरे दिली ती ही: जबुलूनाच्या गोत्रातून रिम्मोनो आणि ताबोर त्यांच्या शिवारासह;

  8. जबुलून गोत्रातले निष्णात लढवय्ये 50,000, ते शस्त्रांनी सुसज्ज व दावीदाला एकनिष्ठ होते;

  9. शेजारच्या लोकांनी म्हणजे इस्साखार, जबुलून व नफताली प्रांतांपर्यंत जे राहत होते, त्यांनी भाकरीचे पीठ, अंजिरांच्या ढेपा, खिसमिसांचे घड, द्राक्षारस, तेल इत्यादी खाण्याच्या वस्तू गाढवे, उंट खेचरे व बैल यांच्यावर लादून आणल्या होत्या. त्याचप्रमाणे असंख्य बैल व शेरडेमेंढरे पण आणली होती. कारण इस्राएलात सर्वत्र आनंदोत्सव साजरा होत होता.

  10. जबुलून गोत्रावर: ओबद्याहचा पुत्र इश्मायाह; नफताली गोत्रावर: अज्रीएलचा पुत्र यरिमोथ;

  11. संदेशवाहक एफ्राईम आणि मनश्शेह येथील गावोगाव तसेच जबुलूनपर्यंत गेले, परंतु लोकांनी त्यांचा तिरस्कार केला आणि त्यांची थट्टा केली.

  12. तरीसुद्धा आशेर, मनश्शेह आणि जबुलून येथील काही लोकांनी स्वतःला नम्र केले आणि ते यरुशलेमला गेले.

  13. एफ्राईम, मनश्शेह, इस्साखार आणि जबुलून येथून आलेल्या पुष्कळ लोकांपैकी बहुतेक लोकांनी स्वतःला शुद्ध केलेले नव्हते, तरीही जे लिहिलेले होते त्याविरुद्ध जाऊन त्यांनी वल्हांडण सणाचे अन्न खाल्ले. परंतु हिज्कीयाहने त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि म्हणाला, “याहवेह, जे चांगले आहेत, त्यांनी प्रत्येकांना क्षमा करावी.

  14. बिन्यामीनचा छोटा वंश नेतृत्व करीत पुढे चालला आहे, यहूदाह वंशाचे अधिपती आणि जबुलून व नफताली वंशाचे अधिपती त्यामध्ये आहेत.

  15. तरीसुद्धा, जे संकटात होते त्यांच्यासाठी यापुढे निस्तेज काळोखी नसेल. भूतकाळात त्यांनी जबुलून प्रांत आणि नफताली प्रांतांना नमविले होते, परंतु भविष्यामध्ये ते समुद्राच्या मार्गाकडून जाणाऱ्या यार्देनेच्या पलीकडील गालील राष्ट्रांचा सन्मान करतील—

  16. इस्साखारच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत एक भाग जबुलूनचा.

  17. जबुलूनच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत एक भाग गादचा असणार.

  18. दक्षिणेची बाजू जिचे माप चार हजार पाचशे हात आहे, तिथे तीन द्वारे असतील: शिमओनचे द्वार, इस्साखारचे द्वार आणि जबुलूनचे द्वार.

  19. नासरेथ सोडल्यानंतर जबुलून व नफताली या प्रांताजवळ असलेल्या सरोवराच्या किनार्‍यावरील कफर्णहूम येथे गेले.

  20. “जबुलून प्रांत आणि नफताली प्रांत, समुद्राच्या मार्गावरचा आणि यार्देनेच्या पलीकडचा प्रांत, गैरयहूदीयांचा गालील प्रांत—

  21. जबुलून वंशातून 12,000; योसेफ वंशातून 12,000; बन्यामीन वंशातून 12,000.