मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ख्रिस्ताची प्रीती आम्हाला गळ घालते कारण आम्हास खात्री आहे की, ज्याअर्थी एक आपल्या सर्वांसाठी मरण पावला तर आपण सर्वजण मेलो आहोत.

  2. ते सर्वांसाठी मरण पावले, म्हणून आता जे जिवंत आहेत त्यांनी यापुढे स्वतःसाठी जगू नये, तर जे त्यांच्यासाठी मरण पावले आणि पुन्हा उठले, त्यांच्यासाठी जगावे.

  3. येथून पुढे ऐहिक दृष्टीने आम्ही कोणाकडे पाहत नाही. आम्ही ख्रिस्ताकडे त्यादृष्टीने पाहत होतो पण आता तसे पाहत नाही.

  4. जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे, तर तो नवी सृष्टी झाला आहे; जुने संपले आहे व सर्व नवीन झाले आहे.

  5. हे सर्व परमेश्वरापासून आहे, ज्यांनी आमचा त्यांच्याशी ख्रिस्ताद्वारे समेट केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली आहे.

  6. परमेश्वर ख्रिस्ताद्वारे जगाशी समेट घडवून आणत होते आणि लोकांची पातके त्यांच्याविरुद्ध मोजत नव्हते. हाच समेटाचा संदेश त्यांनी आम्हाकडे सोपवून दिला आहे.

  7. आम्ही ख्रिस्ताचे राजदूत आहोत, जणू काही परमेश्वर आमच्याद्वारे तुम्हाला विनंती करीत आहे. आम्ही ख्रिस्ताच्या वतीने तुम्हाला विनवितो की, परमेश्वराबरोबर तुमचा समेट होऊ द्या.

  8. ज्यांच्या ठायी पाप नव्हते, त्यांना आपल्यासाठी पाप असे केले, म्हणजे त्यांच्याशी आपण संयुक्त होऊन, परमेश्वराचे नीतिमत्व व्हावे.

  9. परमेश्वराचे सहकारी या नात्याने आम्ही तुम्हाला विनवितो की परमेश्वराची कृपा व्यर्थ होऊ देऊ नका.

  10. कारण ते म्हणतात, “माझ्या कृपेच्या समयी तुमची विनवणी माझ्या कानी आली. तारणाच्या दिवशी, मी तुम्हाला साहाय्य केले.” मी तुम्हाला सांगतो, आताच परमेश्वराच्या कृपेचा समय आहे आणि आजच तारणाचा दिवस आहे.

  11. तसेच ख्रिस्त व सैतान यांच्यामध्ये मेळ कसा असेल? विश्वासणारा मनुष्य व विश्वासहीन मनुष्य यांच्यामध्ये साम्य आहे का?

  12. आणि परमेश्वराचे मंदिर व मूर्ती, यांच्यामध्ये कसा मेळ बसणार? कारण आम्ही परमेश्वराचे मंदिर, जिवंत परमेश्वराचे घर आहोत आणि परमेश्वराने म्हटले आहे: “मी त्यांच्यामध्ये राहीन आणि त्यांच्यामध्ये चालेन; मी त्यांचा परमेश्वर होईन आणि ते माझे लोक होतील.”

  13. यास्तव, “त्यांच्यामधून निघा आणि त्यांच्यापासून स्वतःला वेगळे करा; प्रभूने म्हटले आहे त्यांच्या अशुद्ध वस्तूला स्पर्श करू नका, म्हणजे मी तुमचे स्वागत करेन.”

  14. आणि “मी तुमचा पिता होईन आणि तुम्ही माझे पुत्र व माझ्या कन्या व्हाल असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतात.”

  15. आमच्या अपेक्षेपेक्षा त्यांनी अधिक दिले, त्यांनी प्रथम स्वतः प्रभूला आणि परमेश्वराच्या इच्छेने आम्हालाही दिले.

  16. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे, जरी ते इतके धनवान होते तरी तुमच्यासाठी दरिद्री झाले, यासाठी की त्यांच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.

  17. खरे म्हणजे, आम्ही कृपेचे दान घेऊन येत असताना आमच्याबरोबर प्रवास करण्यासाठी या बंधुची मंडळ्यांमधून निवड झाली होती. यामुळे केवळ प्रभूचे गौरव होईल व साहाय्य करण्याविषयीची आमची मदत करण्याची आस्था सर्वांना दिसून येईल.

  18. फक्त प्रभूंच्या दृष्टिकोनातून नव्हे तर मानवाच्या दृष्टिकोनातूनही जे योग्य आहे ते करण्याकरिता आम्ही श्रम घेतो.

  19. तीत तुमच्यामध्ये माझा भागीदार व सहायक आहे आणि त्याच्याबरोबर जे बंधू आहेत, ते येथील मंडळ्यांचे प्रतिनिधी आणि ख्रिस्ताचे गौरव आहेत.

  20. हे शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे आहे: “गरजवंतांना ते उदारहस्ते दानधर्म करतात; त्यांची नीतिमत्ता चिरकाळ टिकते.”

  21. कारण तो पेरणार्‍यांसाठी बी पुरवितो आणि खाण्यासाठी भाकर पुरवितो तोच तुम्हालाही पेरण्यासाठी बियांचा भांडार वाढवेल व पुरवठा करेल आणि तुमच्या नीतिमत्वाच्या हंगामाची वाढ करेल.

  22. तुम्ही करीत असलेले सेवाकार्य यामुळे तुम्ही सिद्ध करून दाखविले आहे की, तुम्ही ख्रिस्ताच्या शुभवार्तेला कबूल करून आज्ञाधारक राहिला, तसेच तुम्ही त्यांच्या व सर्वांच्याप्रती उदारता दाखविली म्हणून इतरजण परमेश्वराची स्तुती करतील,

  23. ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रपणाने मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्यापैकी काहीजण म्हणतात की मी पौल, तुमच्यासमोर असताना “भित्रा” व तुमच्यापासून दूर असलो म्हणजे “धीटपणे” वागतो.

  24. आम्ही वाद व परमेश्वराच्या ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले सर्वकाही पाडून टाकतो आणि प्रत्येक विचाराला बंदिस्त करून ख्रिस्ताच्या आज्ञेखाली स्वाधीन करतो.

  25. हा अधिकार प्रभूने तुम्हाला खाली पाडून टाकण्यासाठी नव्हे, तर तुम्हाला विकसित करण्यासाठी आम्हाला दिला आहे, आणि जरी मी त्याविषयी थोडाफार अभिमान दाखविला, तरी मला त्याची लाज वाटणार नाही.