मुख्य मजकुरावर जा

Jehoshaphat

69 वचने · 9 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Josaphat

Jehoshaphat चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अहाबाचा पुत्र, इस्राएलाचा राजा योरामच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी, यहूदीयाचा राजा यहोशाफाटचा पुत्र यहोराम राज्य करू लागला.

  2. तेव्हा यहूदीयाचा राजा यहोआशने आपले पूर्वज म्हणजे—यहोशाफाट, यहोराम, अहज्याह या यहूदीयाच्या राजांनी—आणि त्याने स्वतः समर्पित केलेल्या भेटवस्तू आणि याहवेहच्या मंदिरातील राजवाड्याच्या खजिन्यातील सर्व सोने त्याने अरामचा राजा हजाएलकडे पाठवून दिले. मग तो यरुशलेममधून निघून गेला.

  3. शलोमोनचा पुत्र रेहोबोअम, त्याचा पुत्र अबीयाह, त्याचा पुत्र आसा, त्याचा पुत्र यहोशाफाट,

  4. त्याच्यानंतर त्याचा पुत्र यहोशाफाट हा राजा झाला. त्याने इस्राएलविरुद्ध युद्ध करण्यासाठी स्वतःला सशक्त केले.

  5. याहवेह यहोशाफाटबरोबर होते, कारण त्याने त्यांच्यासमोर त्याचा पिता दावीदाच्या मार्गाचे अनुसरण केले. त्याने बआल दैवतांचा सल्ला घेतला नाही.

  6. याहवेहनी त्याचे राज्य त्याच्या नियंत्रणाखाली स्थापन केले; आणि यहूदीयाच्या सर्व लोकांनी यहोशाफाटकडे भेटवस्तू आणल्या, त्यामुळे त्याला मोठी संपत्ती आणि सन्मान मिळाला.

  7. यहूदीयाच्या आजूबाजूच्या प्रदेशांच्या सर्व राज्यांवर याहवेहचे भय आले, म्हणून ते यहोशाफाटविरुद्ध युद्ध करण्यासाठी गेले नाहीत.

  8. काही पलिष्ट्यांनी यहोशाफाट याला भेटवस्तू आणि खंडणी म्हणून चांदी आणली आणि अरब लोकांनी त्याच्यासाठी कळप आणले: सात हजार सातशे मेंढ्या आणि सात हजार सातशे शेळ्या.

  9. यहोशाफाट अधिकाधिक शक्तिशाली होत गेला; त्याने यहूदीयामध्ये किल्ले आणि भांडाराची शहरे बांधली

  10. आता यहोशाफाटजवळ मोठी संपत्ती आणि सन्मान होता आणि त्याने स्वतःला अहाबाशी विवाहाद्वारे जोडून घेतले.

  11. इस्राएलचा राजा अहाबाने यहूदीयाचा राजा यहोशाफाटला विचारले, “तुम्ही माझ्याबरोबर रामोथ गिलआदविरुद्ध जाल का?” यहोशाफाटने उत्तर दिले, “तुम्ही जसे आहात तसाच मी आहे आणि माझे लोक तुमचे लोक आहेत; आम्ही तुमच्या युद्धात सहभागी होऊ.”

  12. परंतु यहोशाफाट इस्राएलच्या राजाला असे सुद्धा म्हणाला, “प्रथम याहवेहचा सल्ला घ्या.”

  13. परंतु यहोशाफाटने विचारले, “आपण विचारावे असा याहवेहचा एकही संदेष्टा येथे नाही काय?”

  14. इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला, “ज्याच्याद्वारे आपण याहवेहचा सल्ला घेऊ शकतो असा एक संदेष्टा अजूनही आहे, परंतु तो माझ्याविषयी कधीही चांगला संदेश देत नाही, नेहमीच वाईट संदेश देतो, म्हणून मला त्याचा तिरस्कार वाटतो. तो इम्लाहचा पुत्र मिखायाह आहे.” यहोशाफाटने उत्तर दिले, “राजाने असे बोलू नये.”

  15. इस्राएलचा राजा आणि यहूदीयाचा राजा यहोशाफाट आपली राजवस्त्रे परिधान करून शोमरोनाच्या प्रवेशद्वाराजवळील खळ्याजवळ त्यांच्या सिंहासनांवर बसले होते, आणि संदेष्टे त्यांच्यासमोर संदेश देत होते.

  16. इस्राएलच्या राजाने यहोशाफाटला म्हटले, “हा माझ्याविषयी कधीही चांगला संदेश देत नाही तर वाईटच संदेश देतो असे मी तुला सांगितले नव्हते काय?”

  17. यानंतर इस्राएलचा राजा व यहूदीयाचा राजा यहोशाफाट हे रामोथ गिलआद येथे गेले.

  18. इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला, “मी वेश बदलून युद्धात प्रवेश करेन, परंतु तुम्ही तुमची राजवस्त्रे घाला.” म्हणून इस्राएलच्या राजा वेश बदलून युद्धात गेला.

  19. रथांच्या सरदारांनी जेव्हा यहोशाफाटला पाहिले, तेव्हा त्यांना वाटले, “हा इस्राएलचा राजा आहे.” म्हणून ते त्याच्यावर हल्ला करण्यास वळले, पण यहोशाफाटने मोठ्याने धावा केला, आणि याहवेहने त्याला मदत केली. परमेश्वराने त्यांना त्याच्यापासून दूर नेले,

  20. जेव्हा यहूदीयाचा राजा यहोशाफाट सुखरुपपणे त्याच्या राजवाड्यात यरुशलेम येथे परत आला,

  21. तेव्हा हनानीचा पुत्र येहू संदेष्टा त्याला भेटण्यासाठी गेला आणि यहोशाफाट राजाला म्हणाला, “तुम्ही दुष्टाला मदत करावी आणि जे याहवेहचा द्वेष करतात त्यांच्यावर तुम्ही प्रेम करावे काय? याच कारणामुळे याहवेहचा क्रोध तुमच्यावर आहे.

  22. यहोशाफाट यरुशलेममध्ये राहिला आणि तो पुन्हा बेअर-शेबा पासून एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील लोकांमध्ये गेला आणि त्यांना त्यांच्या याहवेह पूर्वजांच्या परमेश्वराकडे वळविले.

  23. यरुशलेममध्येही, यहोशाफाटने काही लेवी, याजक आणि इस्राएली कुटुंबप्रमुखांना याहवेहच्या नियमांचे पालन करण्यासाठी आणि वाद मिटविण्यासाठी नियुक्त केले. ते यरुशलेममध्ये राहत होते.

  24. यानंतर, मोआबी आणि अम्मोनी सैन्य काही मऊनी लोकांना बरोबर घेऊन यहोशाफाटविरुद्ध युद्ध करण्यासाठी आले.

  25. काही लोक आले आणि यहोशाफाटला म्हणाले, “मृत समुद्राच्या पलीकडे असलेल्या अराम येथून एक प्रचंड सैन्य तुमच्याविरुद्ध येत आहे. ते आधीच हससोन-तामार येथे आले आहे” (ते म्हणजे एन-गेदी).