मुख्य मजकुरावर जा

Jehoshaphat

69 वचने · 9 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Josaphat

Jehoshaphat चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. धोक्याची सूचना मिळाल्याने यहोशाफाटने याहवेहकडे याची चौकशी करण्याचा निश्चय केला आणि त्याने सर्व यहूदीयामध्ये उपवासाची घोषणा केली.

  2. नंतर यहोशाफाट याहवेहच्या मंदिराजवळ नवीन अंगणासमोर यहूदीया आणि यरुशलेम यांच्या सभेमध्ये उभा राहिला

  3. तो म्हणाला, “ऐका, राजा यहोशाफाट आणि जे यहूदीया आणि यरुशलेममध्ये राहतात ते सर्वजण! याहवेह तुम्हाला असे म्हणतात: ‘या विशाल सैन्याला घाबरू नका किंवा निराश होऊ नका. कारण युद्ध तुमचे नव्हे, तर परमेश्वराचे आहे.

  4. यहोशाफाट त्याचे मुख जमिनीकडे करून नतमस्तक झाला आणि यहूदीया आणि यरुशलेमच्या सर्व लोकांनी याहवेहपुढे खाली पडून उपासना केली.

  5. पहाटे ते तकोवाच्या वाळवंटाकडे निघाले. ते बाहेर पडले असताना यहोशाफाट उभा राहिला आणि म्हणाला, “यहूदीया आणि यरुशलेमच्या लोकांनो, माझे ऐका! याहवेह तुमचे परमेश्वर यांच्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे समर्थन केले जाईल; त्याच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा आणि तुम्ही यशस्वी व्हाल.”

  6. तेव्हा यहोशाफाट आणि त्याची माणसे त्यांची लूट घ्यायला निघाले, त्यांना त्याच्यामध्ये बरीच उपकरणे, वस्त्रे आणि मौल्यवान वस्तू सापडल्या—त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त तिथे होते. इतकी लूट होती की, ती गोळा करावयाला तीन दिवस लागले.

  7. नंतर यहोशाफाटच्या नेतृत्वाखाली, यहूदीया आणि यरुशलेम येथील सर्व पुरुष आनंदाने यरुशलेमकडे परतले, कारण याहवेहनी त्यांना त्यांच्या शत्रूवर आनंद करण्याचे कारण दिले होते.

  8. आणि यहोशाफाटच्या राज्यात शांतता होती, कारण त्याच्या परमेश्वराने त्याला सर्व बाजूंनी विसावा दिला होता.

  9. तेव्हा यहोशाफाटने यहूदीयावर राज्य केले. यहूदीयाचा राजा झाला तेव्हा तो पस्तीस वर्षांचा होता आणि त्याने यरुशलेमात पंचवीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अजुबाह होते, जी शिल्हीची कन्या होती.

  10. यहोशाफाटच्या राज्याच्या इतर घटना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतच्या घटना हनानीचा पुत्र येहू याच्या इतिहासात लिहिलेल्या आहेत, ज्याची नोंद इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात आहेत.

  11. नंतर, यहूदीयाचा राजा यहोशाफाटने इस्राएलचा राजा अहज्याह याच्याशी मैत्री केली, ज्याचे मार्ग दुष्ट होते.

  12. मारेशाहवासी दोदावाहूचा पुत्र एलिएजर याने यहोशाफाटविरुद्ध भविष्यवाणी केली, “तुम्ही अहज्याहशी युती केल्यामुळे, तुम्ही जे काय केले आहे त्याचा याहवेह नाश करतील.” ही जहाजे उद्ध्वस्त झाली आणि व्यापाराच्या प्रवासाला तार्शीशला घेऊन जाण्यासाठी ती सक्षम नव्हती.

  13. त्यानंतर यहोशाफाट आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याबरोबर दावीदाच्या शहरात पुरले. आणि त्याचा पुत्र यहोराम त्याचा वारस म्हणून राजा झाला.

  14. यहोरामचे भाऊ अजर्‍याह, यहीएल, जखर्‍याह, अजर्‍याह, मिखाएल आणि शफात्याह हे सर्व इस्राएलचा राजा यहोशाफाटचे पुत्र होते.

  15. यहोरामला एलीयाह संदेष्ट्याकडून एक पत्र मिळाले, त्यामध्ये लिहिले होते: “तुमचे पिता दावीदाचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: तुम्ही तुमचे पिता यहोशाफाट किंवा यहूदीयाचा राजा आसा यांच्या मार्गांचे अनुसरण केले नाही.

  16. त्यानंतर तो अहज्याहचा शोध घेत गेला आणि त्याच्या माणसांनी त्याला पकडले तेव्हा तो शोमरोनमध्ये लपला होता, त्याला येहूकडे आणण्यात आले आणि ठार मारण्यात आले. त्यांनी त्याला पुरले, कारण ते म्हणाले, “तो यहोशाफाटचा पुत्र होता, ज्याने त्याच्या संपूर्ण अंतःकरणापासून याहवेहचा सल्ला घेतला होता.” त्यामुळे अहज्याहच्या घरात राज्य टिकवून ठेवण्याइतके सामर्थ्य कोणातही नव्हते.

  17. मी सर्व राष्ट्रांना एकत्र करेन आणि त्यांना खाली यहोशाफाट च्या खोऱ्यात आणेन. त्यांनी माझ्या वतनास, माझ्या इस्राएली लोकांशी जे केले त्याबद्दल मी त्यांची परीक्षा घेईन. कारण त्यांनी माझ्या लोकांना राष्ट्रांमध्ये विखुरले आहे आणि माझ्या देशाचे विभाजन केले आहे.

  18. “राष्ट्रे जागृत व्हावी; त्यांनी यहोशाफाटाच्या खोर्‍यात यावे, कारण तिथे मी न्यायासनावर बसून चारही बाजूंच्या सर्व राष्ट्रांचा न्याय करणार आहे.

  19. आसा यहोशाफाटाचा पिता, यहोशाफाट योरामाचा पिता, योराम उज्जीयाहचा पिता,