मुख्य मजकुरावर जा

Israel

1,007 वचने · 20 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jacob

Israel चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “खचितच, सार्वभौम याहवेहची दृष्टी या पापी राज्यावर आहे. आणि मी त्यांचा पृथ्वीच्या पृष्ठभागावरून नाश करेन; तरीसुद्धा मी याकोबाच्या संतानांचा कायमचा नाश करणार नाही,” असे याहवेह घोषित करतात.

  2. तुझा भाऊ याकोब याच्यावर केलेल्या अत्याचारामुळे, तू लाजेने झाकून जाशील; आणि तुझा कायमचा नाश करण्यात येईल.

  3. पण सीयोन पर्वतावर तारण होईल; ते पवित्र होईल, आणि याकोबास त्याचे वतन मिळेल.

  4. याकोब अग्नीसारखा आणि योसेफ ज्वालासारखे असतील; एसाव उरलेल्या भुशासारखे होतील, आणि ते त्यांना जाळून नष्ट करतील. एसावच्या वंशजांपैकी कोणीही जिवंत राहणार नाही.” याहवेहने हे म्हटले आहे.

  5. बंदिवान इस्राएल लोकांचा हा गट, जो कनानमध्ये आहे, तो कनानी लोकांचा सारेफथपर्यंतचा प्रदेश ताब्यात घेतील; यरुशलेमेचे बंदिवान, जे सफारदात शहरात आहेत, ते नेगेवची शहरे ताब्यात घेतील.

  6. हे सर्व याकोबाच्या अपराधामुळे आणि इस्राएली लोकांच्या पापाचे परिणाम आहे. याकोबाचा अपराध काय आहे? ते शोमरोन आहे की नाही? यहूदीयाचे उच्च स्थान कोणते आहे? ते यरुशलेम नाही की नाही?

  7. हे याकोबाच्या घराण्या, “असे म्हटले जावे काय, याहवेह अधीर होतात काय? ते अशी कामे करतात काय? “ज्याचे मार्ग सरळ आहेत त्याचे माझे शब्द भले करत नाहीत काय?

  8. “हे याकोबा, मी तुम्हा सर्वांना निश्चित गोळा करेन; इस्राएलच्या उरलेल्यांना मी खचित गोळा करेन. जसे मेंढवाड्यात मेंढरे, जसे कुरणात कळप, तसे मी त्यांना एकत्र गोळा करेन; आणि ती जागा लोकांनी फुलून जाईल.

  9. तेव्हा मी म्हणालो, याकोबाच्या पुढार्‍यांनो, इस्राएलाच्या अधिकाऱ्यांनो, ऐका. तुम्ही न्यायाला स्वीकारू नये काय,

  10. परंतु माझ्याबाबतीत म्हणाल, तर याकोबाला त्याचे अपराध आणि इस्राएलला त्याचे पाप सांगण्यासाठी मी याहवेहच्या आत्म्याने, न्यायाने आणि सामर्थ्याने परिपूर्ण आहे.

  11. अहो याकोबाच्या पुढार्‍यांनो, इस्राएलाच्या अधिकाऱ्यांनो, माझे ऐका, तुम्ही न्यायाला तुच्छ लेखता आणि चांगल्या गोष्टी विकृत करता;

  12. अनेक राष्ट्रे येतील आणि म्हणतील, “चला, आपण याहवेहच्या पर्वताकडे, याकोबाच्या परमेश्वराच्या मंदिराला जाऊ. ते आपले मार्ग आम्हाला शिकवतील, म्हणजे आम्ही त्या मार्गावर चालू.” कारण सीयोनमधून नियमशास्त्र, यरुशलेमातून याहवेहचे वचन बाहेर जाईल.

  13. म्हणून प्रसूती वेदनेत असलेली एका मुलाला जन्म देईपर्यंत आणि तिचे बाकीचे भाऊ परत इस्राएल लोकांमध्ये येईपर्यंत इस्राएलचा त्याग केला जाईल.

  14. याकोबाचे उरलेले लोक अनेक लोकांमध्ये असतील, ते याहवेहने पाठविलेल्या दहिवराप्रमाणे, गवतावर पडणाऱ्या पावसाप्रमाणे असतील, जे कोणाचीही वाट पाहत नाही आणि कोणा मनष्यावर अवलंबून राहत नाही.

  15. याकोबाचे अवशेष राष्ट्रांमध्ये आणि अनेक लोकांमध्ये असणार, जंगली श्वापदांमध्ये सिंहासारखे आणि मेंढरांच्या कळपामध्ये तरुण सिंहासारखे असतील, ते त्यांच्यावर झेप घेतील आणि त्यांना ठार करीत पुढे जातील आणि कोणीही त्यांना वाचवू शकत नाही.

  16. फार पूर्वी, आमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे, तुम्ही याकोबाशी विश्वासू असाल, आणि अब्राहामवर प्रीती दाखवाल.

  17. जरी संहारकाने तो देश उद्ध्वस्त केला आहे आणि त्यांचे द्राक्षमळे नष्ट केले आहेत तरी, इस्राएलच्या वैभवासारखे याहवेह याकोबाचे वैभव पुनर्स्थापित करणार आहेत.

  18. याहवेह म्हणतात, “मी तुमच्यावर नितांत प्रेम केले आहे.” पण यावर तुम्ही विचारता, “हे प्रेम तुम्ही कसे केले?” याहवेह जाहीर करतात, “एसाव याकोबाचा सख्खा भाऊ नव्हता काय? तरी देखील मी याकोबावर प्रीती केली.

  19. ज्याने अशी गोष्ट केली आहे, मग तो कोणीही असो, तो सर्वसमर्थ याहवेहस अर्पणे वाहत असेल तरीही याहवेह त्याला याकोबाच्या तंबूमधून काढून टाको.

  20. “मी याहवेह बदलत नाहीत. म्हणून तुम्ही, याकोबाचे वंशज नष्ट झाला नाहीत.

  21. अब्राहाम इसहाकाचा पिता होता, इसहाक याकोबाचा पिता, याकोब यहूदाह व त्याच्या भावांचा पिता होता,

  22. मी तुम्हाला सांगतो की, अनेकजण पूर्व आणि पश्चिमेकडून येतील, आणि स्वर्गीय राज्यात चाललेल्या मेजवानीत, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याबरोबर आपल्या जागा घेतील.

  23. ‘मी अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर आहे,’ तो मृतांचा परमेश्वर नसून जिवंतांचा आहे.”

  24. हे शेत विकत घेण्याच्या घटनेने यिर्मयाह संदेष्ट्याची भविष्यवाणी पूर्ण झाली. ती अशी: “त्यांनी चांदीची तीस नाणी घेतली आणि इस्राएली लोकांनी त्याचे मोल ठरविले,

  25. पण आता मृतांच्या पुनरुत्थानासंबंधी, मोशेच्या पुस्तकात जळत्या झुडूपांच्या संदर्भात वाचले नाही काय? परमेश्वराने त्याला असे सांगितले, ‘मी अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर आहे?’