मुख्य मजकुरावर जा

Holy Spirit

251 वचने

हे नावानेही ओळखले जाते: Spirit

Holy Spirit चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परमेश्वराचे राज्य खाणे व पिणे यात नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद यात आहे.

  2. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळे आशेचे परमेश्वर तुम्हाला सर्व आनंदाने आणि शांतीने भरो, यासाठी की तुमच्यामध्ये असणार्‍या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात विपुल आशेमध्ये तुम्ही वाढत जावे.

  3. की गैरयहूदीयांसाठी मी ख्रिस्त येशूंचा सेवक व्हावे. त्यांनी मला परमेश्वराची शुभवार्ता जाहीर करण्यासाठी याजकपण सोपविले आहे, यासाठी की गैरयहूदीयांना पवित्र आत्म्याने वेगळे केलेले व परमेश्वराला ग्रहणीय यज्ञ म्हणून अर्पण करावे.

  4. चिन्हे आणि झालेली अद्भुते पवित्र आत्म्याच्या शक्तीने झाली. अशा रीतीने मी यरुशलेमपासून तो इल्लूरिकमापर्यंत सर्वत्र ख्रिस्ताच्या शुभवार्तेची घोषणा पूर्णपणे केली आहे.

  5. बंधूंनो व भगिनींनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आणि आत्म्याच्या प्रीतीद्वारे, मी तुम्हाला विनंती करतो की, माझ्या संघर्षात सहभाग म्हणून परमेश्वराजवळ माझ्यासाठी प्रार्थना करावी.

  6. माझे संदेश व उपदेश ज्ञान किंवा शहाणपणाच्या शब्दाचे नव्हते, तरी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचे प्रमाण देणारे होते.

  7. परमेश्वराने आपल्याला त्यांच्या आत्म्याद्वारे या गोष्टी प्रकट केल्या आहेत. कारण परमेश्वराचा आत्मा हा सर्व गोष्टींचा, परमेश्वराच्या अत्यंत गहन गोष्टींचा देखील शोध घेतो.

  8. एखाद्या व्यक्तीचे विचार त्या व्यक्तीच्या आत्म्याशिवाय इतर कोणाला समजतात का? त्याचप्रमाणे परमेश्वराचे विचार परमेश्वराच्या आत्म्याशिवाय कोणालाही माहीत नाहीत.

  9. आम्ही असे बोलतो हे मानवी ज्ञानाने शिकविलेले शब्द नव्हे, तर आत्म्याने शिकविलेले शब्द म्हणजे आत्मिक गोष्टींचे स्पष्टीकरण करण्याकरिता आम्ही आत्म्याने शिकविलेले शब्द वापरतो.

  10. परंतु जो मनुष्य आत्मिक नाही, तो परमेश्वराच्या आत्म्यापासून आलेल्या गोष्टी स्वीकारीत नाही, कारण त्याला त्या मूर्खपणाच्या वाटतात, त्याला त्या समजणार नाहीत, कारण त्या गोष्टी परमेश्वराच्या आत्म्यानेच पारखल्या जाऊ शकतात.

  11. तुम्ही स्वतः परमेश्वराचे मंदिर आहात आणि परमेश्वराचा आत्मा तुम्हामध्ये वस्ती करतो हे तुम्हाला माहीत नाही का?

  12. तुमच्यापैकी काहीजण अशा प्रकारचे होते, पण आता तुम्हाला धुऊन स्वच्छ करून पवित्र केलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आणि परमेश्वराच्या पवित्र आत्म्याने तुम्हाला नीतिमान केले आहे.

  13. तुमचे शरीर परमेश्वराने तुम्हाला दिलेल्या पवित्र आत्म्याचे मंदिर आहे आणि ते तुमच्यामध्ये राहतात, हे तुम्हाला माहीत नाही काय? तुम्ही स्वतःचे नाही;

  14. पण माझ्या मते ती जशी आहे तशी राहिली तर ती अधिक सुखी होईल—आणि मला असे वाटते की माझ्यातही परमेश्वराचा आत्मा वास करतो.

  15. याच कारणासाठी तुम्हाला हे समजावे की परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने बोलणारा कोणीही “येशू शापित असो” असे म्हणणार नाही आणि कोणी मनुष्य पवित्र आत्म्याशिवाय, “येशू प्रभू आहे” असेही म्हणणार नाही.

  16. निरनिराळ्या प्रकारची दाने आहेत, परंतु ती दाने वाटून देणारा पवित्र आत्मा एकच आहे.

  17. आता प्रत्येकाला आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक कल्याणासाठी होते.

  18. एकाला आत्म्याद्वारे ज्ञानाचा संदेश, तर तोच दुसर्‍याला बुद्धीचा संदेश एकाच आत्म्याद्वारे देतो.

  19. त्याच आत्म्याद्वारे एकाला विश्वास, तर त्या एका आत्म्याद्वारे दुसर्‍याला रोग बरे करण्याची दाने मिळतात.

  20. ही सर्व कार्ये एक आणि एकच आत्मा करतो आणि आपल्या निर्धारानुसार प्रत्येकाला वाटून देतो.

  21. काही यहूदी किंवा गैरयहूदी, काही गुलाम किंवा स्वतंत्र, आपण सर्व एकाच आत्म्याद्वारे एक शरीर होण्यासाठी बाप्तिस्मा पावलेलो आहोत आणि आपल्या प्रत्येकाला एक आत्मा प्यावयास दिला आहे.

  22. त्यांच्या मालकीहक्काचा शिक्का आमच्यावर मारला आहे आणि आमच्या अंतःकरणात पवित्र आत्मा ठेव म्हणून ठेवला आहे, जे येणार आहे त्याची हमी देत आहे.

  23. तुम्ही ख्रिस्ताकडून आलेले पत्र आहात, आमच्या सेवेचा परिणाम, जे शाईने लिहिलेले नाही परंतु जिवंत परमेश्वराच्या आत्म्याने, दगडी पाटीवर नसून, मानवी हृदयाच्या पाटीवर कोरलेले आहे हे दाखवा.

  24. प्रभू आत्मा आहे आणि जिथे प्रभूचा आत्मा तिथे स्वातंत्र्य आहे.

  25. आपण जे सर्व, मुखावर आच्छादन नसलेले; ते आपण प्रभूचे वैभव प्रतिबिंबित करणारे आहोत. ते आपण वाढत जाणार्‍या तेजासह त्यांच्या प्रतिमेप्रमाणे बदलत जात आहोत. हे सर्व प्रभूपासून आहे जे आत्मा आहेत.