मुख्य मजकुरावर जा

Holy Spirit

251 वचने

हे नावानेही ओळखले जाते: Spirit

Holy Spirit चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ज्याने आम्हाला या उद्देशासाठीच सिद्ध केले आहे तो परमेश्वर आहे आणि अमानत म्हणून आम्हाला पवित्र आत्मा विसार म्हणून दिला आहे.

  2. शुद्धतेने, बुद्धीने, धीराने आणि दयेने; पवित्र आत्म्याने आणि खर्‍या प्रीतीने भरलेले;

  3. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हाबरोबर असो.

  4. तुमच्याकडून फक्त एकच गोष्ट समजून घेणे मला आवडेल: नियमशास्त्राप्रमाणे कार्य केल्याने तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला किंवा जे काही तुम्ही ऐकले त्यावर विश्वास ठेवल्याने?

  5. तुम्ही इतके मूर्ख आहात काय? जे आत्म्याद्वारे सुरू केले ते तुम्ही आता दैहिकरितीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहात काय?

  6. तर मी पुन्हा विचारतो, परमेश्वर त्यांचा आत्मा तुम्हाला देतात आणि चमत्काराचे कार्य तुम्हामध्ये नियमशास्त्राच्या कार्याद्वारे करतात किंवा तुम्ही जे ऐकले आहे त्यावर विश्वास ठेवण्याद्वारे?

  7. हे सर्व यासाठी की अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूंच्याद्वारे गैरयहूदीयांनाही प्राप्त व्हावा, म्हणजे विश्वासाद्वारे अभिवचन दिल्याप्रमाणे आपल्याला आत्म्याचे दान प्राप्त व्हावे.

  8. कारण तुम्ही त्यांचे पुत्र आहात, म्हणूनच परमेश्वराने त्यांचा आत्मा आमच्या हृदयात पाठविला आहे, त्याद्वारेच आपण, “अब्बा, पिता अशी त्यांना हाक मारतो.”

  9. त्यावेळेस दैहिकरित्या जन्मलेल्या पुत्राने आत्म्याच्या शक्तीने जन्मलेल्या पुत्राचा छळ केला तसेच आताही होत आहे.

  10. आम्ही पवित्र आत्म्याद्वारे नीतिमत्व प्राप्त करावे या विश्वासाने आशा धरून वाट पाहत आहोत.

  11. मी तुम्हाला सांगतो, आत्म्याच्या प्रेरणेने चला, मग तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही.

  12. दैहिक इच्छा आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहाविरुद्ध आहे. ते आपसात विरोधी आहेत, यासाठी की ज्यागोष्टी तुम्ही केल्या पाहिजे त्या तुम्ही करू नये.

  13. जर तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालता तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही.

  14. परंतु आत्म्याचे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा,

  15. जर आपण आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो, तर आत्म्याच्या प्रेरणेने चालावे.

  16. जो देहाकरीता पेरतो, त्याला देहापासून नाशाचे पीक मिळेल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याला संतुष्ट करण्यासाठी पेरतो त्याला पवित्र आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल.

  17. जेव्हा तुम्ही सत्याचा संदेश ऐकला, आणि तारणाच्या शुभवार्तेवर विश्वास ठेवला, तेव्हा तुमचा ख्रिस्तामध्ये समावेश झाला व तुम्हावरही वचनदत्त पवित्र आत्म्याचा शिक्का मारला गेला,

  18. कारण त्यांच्याद्वारे आम्हा दोघांनाही एकाच आत्म्याद्वारे पित्याजवळ येण्याचे स्वातंत्र्य आहे.

  19. त्याचप्रमाणे तुम्हीही पवित्र आत्म्याद्वारे एकत्र बांधले गेले असताना परमेश्वराचे वसतिस्थान झाला आहात.

  20. हे रहस्य इतर पिढींच्या लोकांना प्रकट केले गेले नव्हते, पण आता त्यांनी आपल्या पवित्र प्रेषित व संदेष्टे यांना परमेश्वराच्या आत्म्याद्वारे प्रकट केले आहे.

  21. मी प्रार्थना करतो की आपल्या गौरवशाली संपत्तीनुरूप आपल्या पवित्र आत्म्याचे सामर्थ्य देऊन त्यांनी तुम्हाला अंतर्यामी शक्तिसंपन्न करावे.

  22. शांतीच्या बंधनात व पवित्र आत्म्याद्वारे ऐक्य टिकविण्यास झटावे.

  23. जसे एक शरीर व एक आत्मा, तसेच आपल्याला एकाच गौरवी आशेसाठी पाचारण करण्यात आले होते.

  24. परमेश्वराच्या पवित्र आत्म्याला दुःखी करू नका, कारण त्याच्याद्वारे तुम्ही खंडणीच्या दिवसासाठी शिक्का मारलेले आहात.

  25. (प्रकाशाचे फळ सर्वप्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता यामध्ये आहे.)