मुख्य मजकुरावर जा

Holy Spirit

251 वचने

हे नावानेही ओळखले जाते: Spirit

Holy Spirit चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यानंतर पौल आणि त्याचे सहकारी यांनी फ्रुगिया आणि गलातीया प्रांतातून सगळीकडे प्रवास केला, कारण आशिया प्रांतात जाऊन परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करू नये असे पवित्र आत्म्याकडून त्यांना सांगण्यात आले होते.

  2. मुसियाच्या सरहद्दीवर आल्यानंतर, ते बिथुनिया प्रांतामध्ये प्रवेश करावयास निघाले, तेव्हा येशूंच्या आत्म्याने त्यांना तशी परवानगी दिली नाही.

  3. त्याने त्यांना विचारले, “तुम्ही विश्वास ठेवला त्यावेळी, तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय?” त्यांनी उत्तर दिले, “नाही, पवित्र आत्मा काय आहे हे आम्ही ऐकले देखील नाही.”

  4. मग पौलाने आपले हात त्यांच्यावर ठेवले, त्यावेळी पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते अन्य भाषेत बोलू लागले आणि भविष्यवाणी करू लागले.

  5. मला माहीत आहे की प्रत्येक शहरामध्ये तुरुंगवास व यातना यांना मला तोंड द्यावे लागणार आहे, असा इशारा पवित्र आत्मा मला देत आहे.

  6. तुम्ही स्वतःवर आणि सर्व कळपावर लक्ष ठेवा, कारण पवित्र आत्म्याने तुम्हाला देखरेख करण्यासाठी नेमले आहे. परमेश्वराने स्वतःच्या रक्ताने ज्या मंडळीला विकत घेतले आहे, त्या परमेश्वराच्या मंडळीचे तुम्ही मेंढपाळ व्हा.

  7. तिथे आम्ही शिष्यांना शोधून काढले, मग तिथे त्यांच्याबरोबर आम्ही सात दिवस राहिलो. त्यांनी आत्म्याद्वारे पौलाला यरुशलेमकडे न जाण्याचा आग्रह केला.

  8. आम्हाकडे येऊन त्याने पौलाचा कमरबंद घेतला व स्वतःचे हातपाय बांधून तो म्हणाला, “पवित्र आत्मा म्हणतो, ‘हा कमरबंद ज्या मनुष्याचा आहे त्याला यरुशलेममधील यहूदी पुढारी असेच बांधून गैरयहूदीयांच्या हाती देतील.’ ”

  9. त्यांचे एकमेकात एकमत होत नव्हते व पौलाचे शेवटचे निवेदन ऐकल्यावर ते उठून जाऊ लागले: पवित्र आत्म्याद्वारे यशायाह संदेष्ट्याने तुमच्या पूर्वजांना सत्य सांगितले ते असे:

  10. आशेमुळे आपण लज्जित होणार नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वराची प्रीती आपल्या अंतःकरणात ओतली गेली आहे.

  11. यास्तव, जे आता ख्रिस्त येशूंमध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाही.

  12. कारण ख्रिस्त येशूंच्याद्वारे आत्म्याच्या नियमाने जे तुम्हाला जीवन देतात, त्यांनी तुम्हाला पापाचे नियम व मरण यातून मुक्त केले आहे.

  13. यासाठी की जे देहाने नव्हे तर पवित्र आत्म्याप्रमाणे जीवन जगतात, त्यांच्यामध्ये नियमांसाठी आवश्यक असणारे नीतिमत्व पूर्ण व्हावे.

  14. जे आपल्या शारीरिक स्वभावाला अनुसरून जीवन जगतात, त्यांची मने दैहिक गोष्टींकडे असतात, परंतु जे पवित्र आत्म्याला अनुसरून जीवन जगतात त्यांची मने आत्म्याच्या इच्छेप्रमाणे करण्याकडे असतात.

  15. तुम्ही देहाच्या सत्तेखाली नाही, परंतु जर परमेश्वराचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो तर तुम्ही आत्म्याच्या सत्तेखाली आहात, जर कोणामध्ये ख्रिस्ताचा आत्मा वास करीत नाही, तर तो ख्रिस्ताचा नाही.

  16. जर ख्रिस्त तुम्हामध्ये आहे, आणि पापामुळे तुमचे शरीर मरण पावले; पण नीतिमत्वामुळे तुमचा आत्मा जिवंत राहील.

  17. आणि ज्यांनी येशूंना मेलेल्यातून उठविले, त्यांचा आत्मा जर तुम्हामध्ये वास करीत असेल, तर ज्यांनी ख्रिस्ताला मरणातून उठविले ते तुमच्यामध्ये राहत असणार्‍या त्याच पवित्र आत्म्याद्वारे तुमची मर्त्य शरीरे जिवंत करतील.

  18. कारण तुम्ही देहस्वभावाप्रमाणे वागत राहिला, तर मराल. पण पवित्र आत्म्याच्या शक्तीने दैहिक कुकर्मे नष्ट केलीत, तर जगाल.

  19. कारण ज्यांना परमेश्वराचा आत्मा चालवितो, ती परमेश्वराची लेकरे आहेत,

  20. पुन्हा भीती बाळगावी असा दास्यतेचा आत्मा तुम्हाला मिळालेला नाही; याउलट असा आत्मा मिळाला आहे की ज्यामुळे तुम्ही दत्तकपुत्र झाला आहात आणि, “अब्बा, बापा” अशी हाक मारू शकता.

  21. कारण पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण परमेश्वराची मुले आहोत.

  22. ज्या आपणाला आत्म्याचे प्रथमफळ मिळाले आहे, ते आपणही कण्हत आहोत, आपण देखील त्या परमेश्वराची दत्तक मुले म्हणून आपल्या शरीराचा उद्धार होईल त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत,

  23. त्याच प्रकारे, पवित्र आत्माही आपल्या अशक्तपणात आपणास साहाय्य करतो. कारण प्रार्थना कशासाठी करावी हे आपल्याला समजत नाही, पण पवित्र आत्मा आपल्यासाठी शब्दाविना कण्हण्याने मध्यस्थी करतो.

  24. आणि जो आपली अंतःकरणे शोधतो तो आत्म्याचे मन जाणतो, कारण आत्मा परमेश्वराच्या इच्छेनुसार परमेश्वराच्या लोकांसाठी मध्यस्थी करतो.

  25. मी ख्रिस्तामध्ये सत्य बोलतो, असत्य नाही, पवित्र आत्मा माझ्या विवेकबुद्धीला पुष्टी देतो.