God
God चा उल्लेख असलेली वचने
तुम्हाला मानवी डोळे आहेत का? मनुष्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता का?
तुमचा जीवनक्रम मनुष्यासमान आहे का, किंवा त्या बलवान मनुष्यासारखे तुमचे आयुष्य आहे,
म्हणून तुम्ही माझे दोष शोधावेत आणि माझी पापे बारकाईने तपासून पाहावी;
मी दोषी नाही हे जरी तुम्हाला माहीत आहे आणि मला तुमच्या हातून सोडविणारा कोणी नाही?
“तुमच्या हातांनी मला घडवून निर्माण केले आहे. आणि तुम्हीच फिरून मला नष्ट करणार आहात काय?
तुम्ही मला मातीच्या कलशाप्रमाणे घडविले याचे स्मरण करा, पुन्हा तुम्हीच मला धुळीत मिळविणार काय?
दुधाप्रमाणे तुम्ही मला ओतले नाही का तरी दह्यासारखे तुम्हीच विरजवले आहे,
तुम्ही मला जीवन देऊन दया दाखविली, आणि तुमच्या निगेत माझा आत्मा सुरक्षित राहिला.
“परंतु हे तुम्ही तुमच्या हृदयात गुप्त ठेवले, आणि मला माहीत आहे की हे तुमच्या मनामध्ये होते:
मी जर पातक केले, तर तुमची नजर माझ्यावर आहे आणि माझ्या पापांबद्दल शिक्षा दिल्यावाचून राहणार नाही.
जर मी दोषी असेन; तर माझा धिक्कार असो! मी निष्पाप असलो, तरीसुद्धा मी माझे डोके उंच करू शकत नाही, कारण मी लज्जेने व्याप्त झालो आहे आणि माझ्या दुःखात बुडून गेलो आहे.
मी माझे मस्तक उंच करू लागलो, की तुम्ही सिंहासारखी मजवर झडप घालणार आणि पुन्हा तुमच्या अद्भुत शक्तीचे माझ्याविरुद्ध प्रदर्शन करणार.
तुम्ही माझ्याविरुद्ध नवीन साक्षीदार आणता, आणि आपला क्रोध माझ्याविरुद्ध वाढविता; तुमचे सामर्थ्य माझ्याविरुद्ध लाटांप्रमाणे एका पाठोपाठ येतात.
“मग तुम्ही मला गर्भाशयातून बाहेर का आणले? कोणीही मला पाहण्यापूर्वी मला मरण आले असते तर बरे झाले असते.
तू परमेश्वराला म्हणतोस, ‘माझा विश्वास अचूक आहे आणि मी तुमच्या दृष्टीने शुद्ध आहे.’
अहा, मला किती वाटते की परमेश्वराने बोलावे, आणि त्यांनी तुझ्याविरुद्ध आपले तोंड उघडावे
आणि ज्ञानाचे रहस्य तुला प्रकट करावे, कारण खर्या ज्ञानाला दोन बाजू आहेत. हे माहीत असू दे: की परमेश्वराने तुझी काही पापे सोडली आहेत.
“परमेश्वराच्या रहस्याचा तुला थांग लागेल काय? सर्वसमर्थाच्या मर्यादेचे तुला आकलन होईल का?
“जर त्यांनी येऊन तुला बंदिवान केले व न्यायसभा बोलावली, तर त्यांना कोण प्रतिबंध करू शकेल?
खरोखर ते फसविणार्यास ओळखतात; आणि जेव्हा ते दुष्टता पाहतात, तेव्हा ते दखल घेणार नाही का?
“जर तू आपले हृदय परमेश्वराकडे लावशील आणि त्यांच्याकडे आपले हात पसरशील,
“मी माझ्या मित्रांच्या चेष्टेचा विषय बनलो आहे, मी परमेश्वराचा धावा केला आणि त्यांनी मला उत्तर दिले— नीतिमान आणि निर्दोष असूनही मी केवळ चेष्टेचा विषय झालो आहे!
हिंसकांचे डेरे सुरक्षित असतात, आणि जे परमेश्वराला चेतावणी देतात ते निर्भय राहतात— ते आपल्या हातच्या सामर्थ्याला आपला देव समजतात.
या सर्वापैकी कोणासही ठाऊक नाही का की याहवेहच्या हाताने हे केले आहे?
“ज्ञान आणि सामर्थ्य हे परमेश्वराचे आहेत; सल्ला आणि समज त्यांचेच आहे.