मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु जर तू मनःपूर्वक परमेश्वराला शोधशील आणि सर्वसमर्थाकडे विनवणी करशील,

  2. जर तू शुद्ध व सरळ आहेस, आतासुद्धा ते तुझ्या वतीने उभे राहतील आणि तुला तुझ्या समृध्‍दीच्या स्थितीत पुनर्स्थापित करतील.

  3. जे सर्व परमेश्वराला विसरतात त्यांचा शेवट असाच होतो; देवहीन मनुष्याची आशा नष्ट होते.

  4. “परंतु पाहा! जो निर्दोष आहे, अशाचा परमेश्वर धिक्कार करत नाही, किंवा दुष्कर्म्‍याचा हातही सबळ करत नाही.

  5. परमेश्वर अजूनही तुझे मुख हास्याने, व तुझे ओठ आनंद घोषाने भरतील.

  6. “खरोखर, हे सत्य आहे हे मी जाणतो. परंतु सामान्य मनुष्य परमेश्वरासमोर आपली निर्दोषता कशी सिद्ध करेल?

  7. त्याने जरी परमेश्वराशी वाद करण्याचे ठरविले, तरी हजारातून एकाचेही उत्तर त्याला देता येणार नाही.

  8. त्यांचे ज्ञान अगाध व त्यांचे सामर्थ्य विशाल आहे. त्यांच्याशी विरोध करून कोण टिकला आहे?

  9. ते पर्वतांना त्यांना नकळत त्यांच्या ठिकाणातून हलवितात, आणि आपल्या रागात त्यांना उलथून टाकतात.

  10. ते माझ्या जवळून जातात; पण मी त्यांना पाहू शकत नाही; ते निघून जातात तरी मला आकलन होत नाही.

  11. जर त्यांनी हिसकावून घेतले तरी त्यांना कोण थांबवेल? ‘तुम्ही काय करता,’ असे त्यांना कोण विचारणार?

  12. परमेश्वर आपला क्रोध आवरत नाहीत; राहाबाच्‍या सैन्याची टोळी सुद्धा त्यांच्यापुढे गुडघे टेकते.

  13. “तर मी त्यांच्याशी कसा वाद घालणार? त्यांच्याशी वाद घालण्यास शब्द मी कसे शोधू?

  14. मी धावा केला असता तर त्यांनी प्रतिसाद दिला असता; तरी ते माझे ऐकतीलच अशी मला खात्री नाही.

  15. वादळाने ते मला चेंगरून टाकतात आणि विनाकारण माझ्या जखमा वाढवतात.

  16. जर बळाविषयी म्हटले तर, तेच बलवान आहेत! आणि जरी न्यायासंदर्भात म्हटले तर त्यांना कोण आव्हान देईल?

  17. जेव्हा एखादी पीडा अचानक मरण आणते, निरपराध्यांच्या निराशेचा ते उपहास करतात.

  18. जेव्हा पृथ्वी दुष्टाच्या हाती जाते, ते न्यायाधीशांचे डोळे झाकतात. जर ते नाहीत, तर मग कोण?

  19. तरी माझ्यावर आणखी मोठी दुःखे येतील; कारण हे परमेश्वरा, मला ठाऊक आहे की तुम्ही मला निर्दोष ठरविणार नाही.

  20. तरी देखील तुम्ही मला चिखलाच्‍या खड्ड्यात टाकाल, आणि माझी वस्त्रे सुद्धा माझा तिरस्कार करतील.

  21. “कारण ते माझ्यासारखे मानव नाहीत की मी त्यांना उत्तर द्यावे, किंवा न्यायालयात आम्ही समोरासमोर येऊन वाद घालू.

  22. कोणीतरी परमेश्वराचा दंड माझ्यावरून काढावा, म्हणजे त्यांचा धाक मला अजून भयभीत करणार नाही.

  23. मग मी त्यांच्याशी निर्भयपणे बोलेन, पण या घटकेला, मी ते करू शकत नाही.

  24. मी परमेश्वराला म्हणेन: मला दोषी ठरवू नका, पण माझ्याविरुद्ध काय आरोप आहेत ते मला सांगा.

  25. माझा छळ करण्यात तुम्हाला आनंद वाटतो का, दुष्टांच्या योजना पाहून तुम्ही हास्य पावता, आणि मी तुमची हस्तकृती आहे, त्या मला तुम्ही झिडकारून देता?